Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कुंटूंबाने दिला लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट; वाचा… कितीये किंमत!

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या २० किलो सोन्याचा मुकूट लालबागच्या राजाला चढवला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी लाल बागच्या राजाच्या मुर्तीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. त्यावेळी हा मुकूट चढवण्यात आला आहे. याबाबत सध्या चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 06, 2024 | 05:40 PM
'या' कुंटूंबाने दिला लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट; वाचा... कितीये किंमत!

'या' कुंटूंबाने दिला लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट; वाचा... कितीये किंमत!

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. अशातच आता मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची बहुप्रतिक्षीत मुर्तीची पहिली झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. अशातच गणेशोत्सवातील विशेष बाब म्हणजे यावेळी लाल बागच्या राजासाठी अंबानी कुंटूंबाने तब्बल २० किलोचा सोन्याचा मुकूट दान केला आहे. या सोन्याच्या मुकूटाची किंमत तब्बल १५ कोटी रुपये इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोने वापरून, तयार केलेला मुकूट लालबागच्या राजाला परिधान करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत सध्या चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

लालबागच्या राजासाठी २० किलोचा सोन्याचा मुकूट

मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची मुर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने हा २० किलोचा सोन्याचा मुकूट लालबागच्या राजाला चढवला आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे संपुर्ण कुटूंब मागील काही काळापासून लालबागच्या राजाच्या मंडळासोबत जोडले गेले आहे. विशेष म्हणजे अंबानी परिवार हा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत देखील सहभागी होत असतो.

हे देखील वाचा – ज्या कॉलेजने प्रवेश नाकारला, त्याच कॉलेजने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले; वाचा… गौतम अदानी यांच्या शालेय जीवनातील रंजक किस्सा

काय म्हटलंय मंडळाने याबाबत

याबाबत बोलताना लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले आहे की, लालबागच्या राजाच्या मुर्तीचे अनावरण करण्यात आले असून, अंबानी कुटूंबाने तब्बल २० किलो सोन्याचा मुकूट बाप्पाला दान केला आहे. अंबानी कुटूंबाकडून हा मुकूट मंडळाकडे देण्यात आला असून, हा मुकूट लाल बागच्या राजाला चढवण्यात आला आहे. अंबानी कुटूंब हे अनेक वर्षांपासून, लालबागचा राजा मंडळासोबत जोडले गेले आहे. अंबानी कुंटूंबाची गणपती बाप्पांच्या प्रति असलेली भक्ती पाहता, गर्व वाटतो. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

खुप धार्मिक आहे अंबानी कुटूंब 

अनंत अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जगातील महत्वाचे व्यापारी कुटुंब असूनही, आपले कुटूंब अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक आहे. आपल्या कुटूंबाचा सनातन धर्मावर विश्वास आहे. ‘माझा भाऊ (आकाश अंबानी) शिवभक्त आहे. माझे वडील गणेशाची पूजा करतात. माझी आई नवरात्रीत नऊ दिवस उपवास करते. माझी आजी देखील श्रीनाथजींची भक्त आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण देवाचा भक्त आहे. आपल्याकडे जे काही आहे ते देवानेच दिले आहे. देव सर्वत्र आहे, तुमच्यात आणि माझ्यात आहे, असा आमचा विश्वास आहे. माझे संपूर्ण कुटुंब सनातन धर्मावर विश्वास ठेवते.

Web Title: Ambani family gave 20 kg gold crown to lalbaug raja know the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • Anant Ambani
  • Lalbaug Raja
  • Mukesh Ambani

संबंधित बातम्या

2025 मधील Top 10 भारतीय कौटुंबिक व्यवसायात ठरले भारी, संपत्ती भारताच्या GDP ला टाकेल मागे; संपत्ती वाचून व्हाल अवाक्
1

2025 मधील Top 10 भारतीय कौटुंबिक व्यवसायात ठरले भारी, संपत्ती भारताच्या GDP ला टाकेल मागे; संपत्ती वाचून व्हाल अवाक्

Mukesh Ambani : अमेरिकेत असीम मुनीर यांचे धाडस, मुकेश अंबानीचा फोटो दाखवून भारताला अणुहल्ल्याची धमकी
2

Mukesh Ambani : अमेरिकेत असीम मुनीर यांचे धाडस, मुकेश अंबानीचा फोटो दाखवून भारताला अणुहल्ल्याची धमकी

Reliance मध्ये होणार मोठे बदल! कंपनीने भविष्यातील रोडमॅप केला जाहीर, ‘या’ महत्वाच्या क्षेत्रात करणार गुंतवणूक
3

Reliance मध्ये होणार मोठे बदल! कंपनीने भविष्यातील रोडमॅप केला जाहीर, ‘या’ महत्वाच्या क्षेत्रात करणार गुंतवणूक

Mahadevi Elephant: ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहिमेला वेग; वनताराचे CEO कोल्हापुरात दाखल
4

Mahadevi Elephant: ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहिमेला वेग; वनताराचे CEO कोल्हापुरात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.