Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा शेअर बाजारावर परिणाम! गुंतवणूकदारांसाठी कुठे दडली संधी? जाणून घ्या

Share Market Update: अमेरिका आणि ईराण यांच्यातील तणाव वाढल्यास जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचा परिणाम निफ्टी 50 आणि भारतीय शेअर बाजारावरही दिसू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2026 | 08:33 AM
Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा शेअर बाजारावर परिणाम! गुंतवणूकदारांसाठी कुठे दडली संधी? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा शेअर बाजारावर परिणाम! गुंतवणूकदारांसाठी कुठे दडली संधी? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास ऊर्जा आणि तेलसंबंधित शेअर्समध्ये तेजी दिसू शकते.
  • बाजारात अस्थिरता वाढल्याने सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढू शकतो.
  • संरक्षण, सोने आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष जाऊ शकते.
India Share Market Update:  गुड फ्रायडे निमित्त शुक्रवार, 3 एप्रिल 2025 रोजी भारतीय शेअर बाजार सुट्टीमुळे बंद होता. तर शनिवार आणि रविवार सुट्टीनिमित्त देखील बाजार बंद होता. त्यामुळे आज तीन दिवसांनंतर शेअर बाजारात पुन्हा सुरु होत आहे. मध्य पूर्वेतील अमेरिका-इराण युद्ध तीव्र होत आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सोमवारी ६ एप्रिल रोजी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे.

Todays Gold-Silver Price: आज सोनं महागलं की स्वस्त झालं? तुमच्या शहरातील ताजे वाचा दर एका क्लिकवर

गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी कमकुवत सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १४५ अंकांच्या सवलतीवर, २२,६२२ च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर, गुरुवारी, भारतीय शेअर बाजाराने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरत तेजीसह व्यवहार संपवला, निफ्टी ५० २२,७०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स १८५.२३ अंकांनी, म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी वाढून ७३,३१९.५५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३३.७० अंकांनी, म्हणजेच ०.१५ टक्क्यांनी वाढून २२,७१३.१० वर स्थिरावला.

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल या भारतीय शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी आजच्या व्यवहारासाठी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये सीमेक, पॉली मेडिक्युअर, विप्रो, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, गेल, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) आणि कमिन्स इंडिया यांचा समावेश आहे.

Iran – Israel युद्धाचा जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत; ‘ATF’ ला सर्वाधिक फटका; पाहा धक्कादायक आकडे

निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी ५ शेअर्सची शिफारस केली आहे. राजा व्यंकटरमण यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये अदानी पॉवर लिमिटेड, आनंद राठी वेल्थ लिमिटेड, म्फासिस लिमिटेड, टीडी पॉवर सिस्टम्स लिमिटेड आणि ॲक्मे सोलर होल्डिंग्ज लिमिटेड यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एचडीएफसी बँक, विप्रो, येस बँक, आरबीएल बँक, टाटा मोटर्स पीव्ही, हिंदुस्तान झिंक, आरव्हीएनएल, इमामी, मॅरिको, टाटा स्टील या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी इन्फोसिस, कल्याण ज्वेलर्स इंडिया, सुप्रिया लाइफसायन्स, एमएम फोर्जिंग्स आणि वेदांता या पाच शेअर्सची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: America iran tension impact on stock market where investors may find profit opportunities share market news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?
1

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?
2

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी
3

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
4

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.