अमेरिकन बॉर्बन व्हिस्की होणार स्वस्त! सरकारने आयात शुल्क केले कमी
American Bourbon Whisky Marathi News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘टिट फॉर टॅट’ कर लादण्याच्या घोषणेनंतर, भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अमेरिकन दारू बर्बन व्हिस्कीवरील शुल्क कमी केले आहे. बर्बन व्हिस्कीवरील कर आता १००% पर्यंत कमी करण्यात आला आहे. यापूर्वी या व्हिस्कीवर १५० टक्के कर आकारला जात होता.
भारताने बर्बन व्हिस्कीवरील सीमाशुल्क ५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. अमेरिकेसोबत व्यापक व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्याच्या योजनांच्या घोषणेदरम्यान हे पाऊल उचलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेच्या अगदी आधी, १३ फेब्रुवारी रोजी बोर्बन व्हिस्कीवरील सीमाशुल्क कमी करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली.
मात्र इतर मद्यांच्या आयातीवरील मूळ सीमाशुल्कात कोणतीही कपात केलेली नाही. त्यांच्यावर १०० टक्के शुल्क आकारले जाईल. अमेरिका हा भारतात बर्बन व्हिस्कीचा आघाडीचा निर्यातदार आहे आणि भारतात आयात होणाऱ्या सर्व मद्यांपैकी जवळजवळ एक चतुर्थांश मद्य अमेरिकेतून येते.
टॅरिफच्या घोषणेनंतर ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. टॅरिफबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की भारत इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त कर आकारतो. त्यांनी हार्ले डेव्हिडसनचे उदाहरण दिले. त्याबाबत त्यांनी सांगितले की, भारतात जास्त कर आकारत असल्याने हार्ले डेव्हिडसनला भारतातच उत्पादन प्रकल्प उभारावा लागला. जेणेकरून त्याला कर भरावा लागू नये. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर १००% कर लादण्याचा इशाराही दिला, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर, भारत सरकारने अमेरिकन बर्बन व्हिस्कीवरील टॅरिफ १००% कमी केला आहे. पूर्वी सरकार बोर्बन व्हिस्कीवर १५० टक्के कर आकारत असे, परंतु आता कंपनीला व्हिस्कीच्या आयातीवर ५०% कर आणि ५०% लेव्ही शुल्क भरावे लागेल. याचा अर्थ असा की आता बोर्बन व्हिस्कीवर १०० टक्के कर लागू होईल. इतर बँडवरील टॅरिफमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
या निर्णयामागे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापक व्यापार करारावरील चर्चेचीही मोठी भूमिका आहे. दोन्ही देश २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी काम करत आहेत.