Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Politics : ‘हे आधीही घडलं होतं…’ इराण युद्धावरून अमेरिकेच्या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली; बोल्टन यांचा ‘घरचा आहेर’

Iran-US War: अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण धोरणावर टीका केली आहे आणि म्हटले आहे की निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतले गेले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 13, 2026 | 08:47 AM
john bolton criticizes donald trump iran war strategy marathi news

john bolton criticizes donald trump iran war strategy marathi news

Follow Us
Follow Us:
  • नियोजनाचा अभाव
  • इतिहासाची पुनरावृत्ती
  • जबाबदारी ट्रम्प यांचीच

John Bolton Trump Iran War : मध्यपूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना, अमेरिकेच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘क्लॅश रिपोर्ट’ला दिलेल्या मुलाखतीत बोल्टन यांनी ट्रम्प यांच्या इराण धोरणाचे वाभाडे काढले असून, हे युद्ध अमेरिकेला मोठ्या संकटात टाकू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.

‘नियोजन शून्य, आवेश जास्त’ – बोल्टन यांचा गंभीर आरोप

जॉन बोल्टन यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही मोठ्या लष्करी कारवाईपूर्वी आवश्यक असलेली तयारी आणि धोरणात्मक विचार करत नाहीत. “ट्रम्प यांचे निर्णय आवेगावर आधारित असतात, नियोजनावर नाही,” असे बोल्टन यांनी म्हटले आहे. इराणसारख्या देशाशी युद्ध पुकारताना ज्या प्रकारच्या व्यापक नियोजनाची गरज होती, ती व्हाईट हाऊसमध्ये दिसून आली नाही. बोल्टन यांनी स्पष्ट केले की, ट्रम्प यांना कदाचित असे वाटले असावे की व्हेनेझुएलाप्रमाणे येथेही ते सहज सत्तापालट करू शकतील, पण ते तेव्हाही चुकीचे होते आणि आजही चुकीचे आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : KC-135 Tanker Crash: अमेरिकेचं महाकाय विमान कोसळलं! इराण युद्धादरम्यान मोठी दुर्घटना; 6 सैनिकांचा थरारक बचाव

ऊर्जा संकट आणि होर्मुझचा धोका

गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक सध्या ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. बोल्टन यांनी टीका करताना म्हटले की, “होर्मुझमधील धोका आधीच स्पष्ट होता. जर तुम्ही युद्धात उतरत आहात, तर तुमच्याकडे पर्यायी व्यवस्था असायला हवी होती.” इराणने या मार्गात सुरुंग पेरल्याच्या बातम्या येत असताना, अमेरिकेने यावर आधीच उपाययोजना करायला हवी होती, असे बोल्टन यांचे मत आहे.

He (Donald Trump) doesn’t know what his goals are. His goals keep changing: Ambassador John Bolton (@AmbJohnBolton), Ex-NSA to Donald Trump Listen in#Iran #Isrel #UnitedStates #WestAsiaWar #NewsToday | @sardesairajdeep pic.twitter.com/zyCdikkZUA — IndiaToday (@IndiaToday) March 12, 2026

credit – social media and Twitter

नेतान्याहू नव्हे, ट्रम्पच युद्धाचे खरे सूत्रधार?

अनेकांचे असे म्हणणे आहे की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेला या युद्धात ओढले आहे. मात्र, बोल्टन यांनी हा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, २८ फेब्रुवारी रोजी इराणच्या लष्करी आणि आण्विक तळांवर हवाई हल्ले करण्याचा निर्णय सर्वस्वी ट्रम्प यांचाच होता. या निर्णयाने मध्यपूर्वेला सर्वात घातक युद्धाच्या खाईत लोटले आहे. जरी अमेरिकन सैन्याने इराणची कमांड आणि कम्युनिकेशन सिस्टम उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले असले, तरी युद्धाचा शेवट काय असेल, हे अद्याप कोणालाच ठाऊक नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fuel Crisis: 30 दिवस तेल पुरवठा बंद! होर्मुझमध्ये इराणची प्रलयकारी सापळ्यांची उभारणी; अमेरिकन नौदलाचा ‘एस्कॉर्ट’ प्लॅन फेल

अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे कौतुक

ट्रम्प यांच्यावर टीका करत असतानाच, बोल्टन यांनी अमेरिकन सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक करण्यास विसरले नाहीत. त्यांनी सांगितले की, लष्करी कारवाईदरम्यान इराणच्या अनेक लष्करी क्षमता कमकुवत झाल्या आहेत. मात्र, केवळ लष्करी ताकदीने युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी मुत्सद्देगिरी आणि दूरदृष्टीची गरज असते, जी सध्याच्या प्रशासनाकडे नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जॉन बोल्टन यांनी ट्रम्प यांच्यावर काय टीका केली?

    Ans: बोल्टन यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी इराण युद्धाचा निर्णय कोणत्याही नियोजनाशिवाय आणि धोरणात्मक विचारांशिवाय घेतला आहे.

  • Que: इराण युद्ध कधी सुरू झाले?

    Ans: अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर हे युद्ध अधिकृतपणे सुरू झाले.

  • Que: होर्मुझच्या सामुद्रधुनीचा या युद्धात काय संबंध आहे?

    Ans: होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात मोठा तेल वाहतूक मार्ग आहे, जो इराणने रोखल्यामुळे जागतिक तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

Web Title: John bolton criticizes donald trump iran war strategy marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
1

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
2

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
4

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.