Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमिताभ बच्चन यांच्याकडे ‘या’ कंपनीचे 298545 शेअर्स; लिस्टिंगपासून शेअरने केलीये उत्तम कामगिरी!

अनेक शेअर्स सेलिब्रिटी गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. यामधील एक शेअर बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याही पोर्टफोलिओमध्ये आहे. या शेअरने गेल्या काही वर्षांत उत्तम कामगिरी केली आहे. 5 ऑक्टोबर 2017 रोजी 75 रुपये दराने सूचीबद्ध झालेला हा शेअर आज मंगळवारी 424 रुपयांवर बंद झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 15, 2024 | 09:07 PM
अमिताभ बच्चन यांच्याकडे 'या' कंपनीचे 298545 शेअर्स; लिस्टिंगपासून शेअरने केलीये उत्तम कामगिरी!

अमिताभ बच्चन यांच्याकडे 'या' कंपनीचे 298545 शेअर्स; लिस्टिंगपासून शेअरने केलीये उत्तम कामगिरी!

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत. जे सेलिब्रिटी गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. यामधील एक शेअर्स बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याही पोर्टफोलिओमध्ये आहे. या शेअर्सने गेल्या काही वर्षांत उत्तम कामगिरी केली आहे. हा शेअर्स वायर कंपनी डीपी वायर्स लिमिटेडचा आहे. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सप्टेंबर 2018 पासून या कंपनीचे शेअर्स घेतले आहे. 5 ऑक्टोबर 2017 रोजी 75 रुपये दराने सूचीबद्ध झालेला हा शेअर आज मंगळवारी 424 रुपयांवर बंद झाला आहे. त्यामुळे या शेअरमुळे अमिताभ बच्चन चांगलेच मालामाल झाले आहे.

1500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा

डीपी वायर्सच्या शेअर्सनी गेल्या तीन वर्षांत 1500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स 3 एप्रिल 2020 रोजी केवळ 41 रुपयांवर होते. तर हा शेअर 17 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर 677.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. मात्र या वर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग दिसून येत आहे. कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 25 टक्के घसरले आहेत. मुंबई शेअर बाजाराला (बीएसई) दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्याकडे डीपी वायर्सचे 2,98,545 शेअर्स आहेत. त्यांचा कंपनीत एकूण 1.93 टक्के हिस्सा आहे.

हे देखील वाचा – कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण..! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? वाचा… सविस्तर

मुंबई शेअर बाजाराला (बीएसई) दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी सप्टेंबर 2018 पासून या कंपनीचे शेअर्स घेतले. त्यानंतर त्यांची हिस्सेदारी घटली. परंतु, तरीही आता त्यांचा 1 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा आहे. मध्य प्रदेशातील ही कंपनी तेल आणि वायू, ऊर्जा, पर्यावरण, नागरी, ऊर्जा, ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा यांसारख्या उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टील वायर आणि प्लॅस्टिक फिल्म्सचे उत्पादन आणि पुरवठा करते.

आयपीओ 2017 मध्ये आला

डीपी वायर्सने 21 सप्टेंबर 2017 रोजी त्यांचा आयपीओ आणला होता. तो 5 ऑक्टोबर रोजी प्रति शेअर 75 रुपये दराने सूचीबद्ध झाला होता. डीपी वायर्सचा शेअर आज मंगळवारी 424 रुपयांवर बंद झाला आहे. शेअर्समध्ये त्याच्या सूचीबद्ध किंमतीपासून 487 टक्क्यांची वाढ झाली आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Amitabh bachchan holds 298545 shares d p wires ltd company shares have performed well since listing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 09:07 PM

Topics:  

  • Share Market Today

संबंधित बातम्या

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण
1

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देतील फायदा? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या
2

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देतील फायदा? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या

Stock Market Today: असं असणार आज शेअर बाजारातील वातावरण, तज्ज्ञांनी दिला ‘हे’ स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला
3

Stock Market Today: असं असणार आज शेअर बाजारातील वातावरण, तज्ज्ञांनी दिला ‘हे’ स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला

Stock Market Today: मार्केट ओपनिंग अलर्ट! आज शेअर बाजारात सकारात्मक संकेत, गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला
4

Stock Market Today: मार्केट ओपनिंग अलर्ट! आज शेअर बाजारात सकारात्मक संकेत, गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.