
Share Market Today: शेअर बाजारात गॅप-अप ओपनिंगचे संकेत! स्विगीसह 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष, तज्ज्ञांनी दिला सल्ला
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात एसीएमई सोलर होल्डिंग्ज, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अशोका बिल्डकॉन, ऑरोबिंदो फार्मा, अरविंद, बर्जर पेंट्स, ब्लू डार्ट एक्सप्रेस, कोहॅन्स लाईफ सायन्सेस, जीएमआर एअरपोर्ट्स, इंडियन बँक, इंडो काउंट इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, एनएचपीसी, प्रीमियर एक्सप्लोझिव्ह्ज, रेल विकास निगम, रेमंड, टाटा स्टील, टेक्समॅको रेल, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, वारी एनर्जीज, वेल्सपन लिव्हिंग या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
आनंद राठी येथील इक्विटी रिसर्चचे एव्हीपी, गणेश डोंगरे यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी स्विगी, टाटा केमिकल्स आणि अंबर एंटरप्रायझेस या शेअर्सची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी १०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी आयडीएफसी फर्स्ट बँक, जयस्वाल नेको इंडस्ट्रीज आणि सॅजिलिटी या शेअर्सची निवड केली आहे.
तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना प्रेस्टीज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड., CEAT लि., बालू फोर्ज इंडस्ट्रीज लि., अलिकॉन कॅस्टालॉय लि., वेल्सपन लिव्हिंग लि., सिटी युनियन बँक लि. हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.