Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या Anil Ambani यांना आणखी एक धक्का! RCom Spectrum रद्द; पाहा केंद्राने का दिला निर्णय?

Anil Ambani RCom Spectrum : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दूरसंचार विभागाने थकीत शुल्क आणि परवान्याच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिलायन्स कम्युनिकेशन्सचा स्पेक्ट्रम परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 07, 2026 | 07:32 PM
अनिल अंबानींना केंद्र सरकारचा मोठा झटका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

अनिल अंबानींना केंद्र सरकारचा मोठा झटका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अनिल अंबानींना केंद्र सरकारचा मोठा झटका!
  • रिलायन्स कम्युनिकेशन्सचा स्पेक्ट्रम परवाना रद्द
  • पाहा केंद्र सरकारने नेमका काय दिला निर्णय?
Anil Ambani RCom Spectrum : अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ होतच आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स RCOM संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. दूरसंचार विभागाने DoT कंपनीला आणि तिची पूर्ण मालकीची उपकंपनी, रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड RTL यांना वाटप केलेला स्पेक्ट्रम तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. याचा अर्थ, कंपनी यापुढे या स्पेक्ट्रमचा वापर करून दूरसंचार सेवा चालवू शकणार नाही. या निर्णयामुळे अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ( Anil Ambani RCom Spectrum ) 

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक

नुकतंच कंपनीने शेअर बाजारांना कळवले आहे की, त्यांना दूरसंचार विभागाकडून DoT ५ ऑक्टोबर २०२६ रोजीची पत्रे मिळाली आहेत, ज्यात २०१०, २०१३, २०१४, २०१५ आणि २०१६ मध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावांतर्गत वाटप केलेला स्पेक्ट्रम रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

स्पेक्ट्रम रद्द का करण्यात आले?

दूरसंचार विभागाच्या मते, रिलायन्स कम्युनिकेशन्स काही स्पेक्ट्रम-संबंधित अटींचे पालन करण्यात निष्फळ ठरली आहे. जसे की नेटवर्क सुरू करण्याशी संबंधित रोलआउट अटी आणि स्पेक्ट्रमसाठी मान्य केलेले पेमेंट या गोष्टींच्या यामध्ये समावेश होतो. विभागाने पुढे स्पष्ट म्हटले आहे की कंपनीने स्पेक्ट्रमचे हप्ते, स्पेक्ट्रम वापर शुल्क म्हणजेच SUC आणि इतर काही थकीत देयके देखील भरलेली नाहीत. २०१० मध्ये लिलाव झालेल्या स्पेक्ट्रमसाठीच्या रोलआउट अटींची पूर्तता देखील झाली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत कंपनीने काय स्पष्ट केलं?

आपल्या स्पष्टीकरणात, कंपनीने दिवाळखोरी आणि नादारी संहिता ICRP आणि दिवाळखोरी आणि नादारी कायद्यांतर्गत मिळालेल्या संरक्षणाचा हवाला दिला. पण दूरसंचार विभागाने हे युक्तिवाद स्वीकारले नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही परिणाम

दूरसंचार विभागाची ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या १३ फेब्रुवारी, २०२६ रोजीच्या निर्णयानंतर झाली आहे. कंपनीने या निर्णयाविरुद्ध एक पुनर्विलोकन याचिका देखील दाखल केली होती, परंतु दूरसंचार विभागाच्या मते, सर्वोच्च न्यायालयाने ७ ऑगस्ट, २०२६ रोजी ही पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली.

कंपनीवर काय परिणाम होईल?

दूरसंचार विभागाने रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स टेलिकॉमला त्या स्पेक्ट्रमवर आधारित सर्व वायरलेस नेटवर्क आणि सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचा कंपन्यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. आरकॉम सध्या दिवाळखोरी निवारण प्रक्रियेतून जात आहे. कंपनीच्या प्रस्तावित निवारण योजनेत स्पेक्ट्रमची मालमत्ता म्हणून विक्री करण्याचा समावेश होता. हा प्रस्ताव सध्या मुंबई येथील एनसीएलटीसमोर विचाराधीन आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! विमान प्रवाशांनो इथे लक्ष्य् द्या… Mumbai Airport वरून 265 International Flights शिफ्ट होणार नाहीत!

Web Title: Anil ambani reliance communications spectrum cancelled by govt marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • anil ambani
  • Reliance

संबंधित बातम्या

Anant Ambani यांची मोठी घोषणा! Reliance आंध्र प्रदेशमध्ये करणार 1 लाख कोटींची महागुंतवणूक;  काय आहे मास्टरप्लॅन?
1

Anant Ambani यांची मोठी घोषणा! Reliance आंध्र प्रदेशमध्ये करणार 1 लाख कोटींची महागुंतवणूक; काय आहे मास्टरप्लॅन?

Reliance Jio IPO : तयार ठेवा पैसा… मिळणार कमाईची मोठी संधी! Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली? ‘या’ दिवशी बोलीची शक्यता
2

Reliance Jio IPO : तयार ठेवा पैसा… मिळणार कमाईची मोठी संधी! Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली? ‘या’ दिवशी बोलीची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.