बाबा रामदेवांच्या पतंजलिचा विक्रमी फायदा (फोटो सौजन्य - Instagram)
दैनंदिन जीवनात उपयुक्त वस्तू बनवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स कंपनीने २०२५ च्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत पतंजलीचा निव्वळ नफा ७१.३ टक्क्यांनी वाढून ३७०.९ कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत ते २१६.५ कोटी रुपये होते. यावेळी पतंजलि फूड्स कंपनीला तेलामधून अधिक नफा मिळाला असल्याचे आता समोर आले आहे.
पतंजलि ही गेल्या अनेक वर्षांपासून अन्न, तेल, विविध आयुर्वेदिक औषधे बनविणारी कंपनी आहे. बाबा रामदेव हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून उत्तम असे उत्पादन बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः शरीराला फायदा मिळेल असे अन्नपदार्थ पतंजलिद्वारे निर्माण केली जातात आणि देशभरात बाबा रामदेव यांच्या उत्पादनाची क्रेझ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी पतंजलिने कमालीचा फायदा मिळाला असल्याचे तिसऱ्या तिमाहीत दिसून आले आहे.
कंपनीने विक्रमी नफा कमावला
कंपनीने सोमवारी शेअर बाजाराला माहिती दिली की ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न वाढून ९,१०३.१३ कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ७,९१०.७० कोटी रुपये होते. त्याच वेळी, या तिमाहीत कंपनीचा EBITDA ५७.१ टक्क्यांनी वाढून ५४०.५ कोटी रुपये झाला, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ३४४.१ कोटी रुपये होता. EBITDA मार्जिन गेल्या वर्षीच्या ४.४ टक्क्यांवरून ५.९ टक्क्यांपर्यंत वाढले. सोप्या शब्दांत सांगायचे तर, EBITDA म्हणजे कंपनीने केलेला नफा ज्यावर कर इत्यादी खर्च अद्याप भरायचा नाही.
Elon Musk Net Worth: 400 बिलियन डॉलर्सवरून घसरली खाली इलॉन मस्कची संपत्ती, काय आहे कारण
निर्यातीतूनही खूप कमाई केली
पतंजली फूड्सने १ नोव्हेंबर २०२४ रोजी पतंजली आयुर्वेदाचा गृह आणि वैयक्तिक काळजी व्यवसाय १,१०० कोटी रुपयांना विकत घेतला आहे आणि यासोबतच दंत, त्वचा, केस आणि घरगुती काळजी क्षेत्रातही त्याची व्याप्ती वाढली आहे. तथापि, महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे तिसऱ्या तिमाहीत मागणीत थोडीशी घट दिसून आली. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत निर्यातीतून ६७.२७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. कंपनीने आपला माल २९ देशांमध्ये पाठवला.
या गोष्टीतून सर्वाधिक पैसे मिळाले
कंपनीने तिसऱ्या तिमाहीत अन्न आणि इतर एफएमसीजी विभागातून २,०३७.६१ कोटी रुपयांचा नफा कमावला, जो गेल्या वर्षी २,४९८.६२ कोटी रुपये होता. कंपनीचा गृह आणि वैयक्तिक काळजी विभागातून महसूल ४२०.३६ कोटी रुपये होता. तर कंपनीने स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलापासून सर्वाधिक नफा कमावला. तिसऱ्या तिमाहीत, कंपनीने खाद्यतेलातून ६,७१७.४७ कोटी रुपयांचा नफा कमावला, जो गेल्या वर्षी ५,४८२.६४ कोटी रुपये होता.
PM Kisan 19th Installment: कधी मिळणार 19 वा हफ्ता, कशी तपासणार लाभार्थ्यांची यादी