Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank KYC Fraud Alert: KYC अपडेटच्या नावाखाली बँक खाते साफ! एका चुकीने गमावू शकता आयुष्यभराची कमाई, ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा

Bank KYC Fraud Alert: बँक KYC अपडेटच्या नावाखाली सायबर भामटे ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे समोर येत आहे. बँक खाते बंद होईल, KYC ची मुदत संपली आहे किंवा रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील, असे खोटे मेसेज पाठवून ग्राहकांना बनावट लिंक किंवा APK डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 22, 2026 | 01:43 PM
Bank KYC Fraud Alert: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bank KYC Fraud Alert: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

बँकेत ग्राहकाला ओळखण्यासाठी गरज पडेल तेव्हा बँक KYC करायला सांगते. मुळात सुरक्षा ठेवणं हा यामागचा हेतू असतो. पण याच KYC च्या नावाने काही भामटे लोकांना लुटतायत. बँकेच्या ग्राहकांना खोटे मेसेज पाठवून त्यांना भीती दाखवून किंवा पैशांचं आमिष दाखवून लुटतायत . Bank KYC Fraud Alert:

खोटा मेसेज आला की लोक फसतात कसे?

बऱ्याचदा आपल्या मोबाईलवर बँक KYC करायचा मेसेज येतो. हा मेसेज साध्या मेसेज बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सॲपवर येतो. बऱ्याचदा या मेसेजची काहीच खात्री न करता काही लोक त्यात दिलेल्या खोट्या लिंकवर किंवा Apk वर क्लिक करतात आणि फसवणुकीला बळी पडतात. अशावेळी त्या बिचाऱ्या ग्राहकाचं बँक खातं काही मिनिटात रिकामं होऊ शकतं. बँकेत ठेवलेली आयुष्यभराची कमाई एका झटक्यात नाहीशी होऊ शकते. हे टाळण्यासाठी प्रत्येक बँक ग्राहकाने काळजी घेणं गरजेचं आहे. बँकेत KYC करणं तर गरजेचं आहेच, पण ते कधी करावं? कुठे करावं? आणि का करावं? याची आधी खात्री करून घेणं तितकंच गरजेचं आहे.

खोटा मेसेज कसा ओळखायचा?

काही बँक ग्राहकांच्या मोबाईलवर बँक खातं बंद होईल, KYC / PAN करायची शेवटची तारीख संपली आहे किंवा रिवॉर्ड पॉईंट्स संपणार आहेत असे मेसेज येत असतात. मुळात बँक आपल्या ग्राहकांना एखादं काम करून घेण्यासाठी कधीच भीती दाखवत नाही किंवा लालच देत नाही. जर बँकेच्या नावाने आपल्या मोबाईलवर एखादा मेसेज आला आणि त्यात खातं बंद होण्याची भीती दिली असेल किंवा पैशांचा लोभ दाखवला असेल तर तो मेसेज खोटा असू शकतो. अशा खोट्या मेसेजमध्ये खोटी लिंक किंवा Apk असू शकते. भीतीने जो ग्राहक त्या लिंकवर क्लिक करतो किंवा Apk डाऊनलोड करतो त्याच्या खात्यातले पैसे गायब होण्याची भीती वाढते.

Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?

बँका OTP, PIN, CVV कधीच मागत नाहीत

मुळात बँका आपल्या ग्राहकाकडे कधीच OTP, PIN नंबर तसेच CVV मागत नाहीत. जर एखाद्या मेसेजमध्ये या गोष्टी मागितल्या जात असतील तर ग्राहकाने लगेच सावध झालं पाहिजे, कारण तो मेसेज बँक KYC च्या नावाने ग्राहकाला लुटण्यासाठी आला आहे.

बँक ग्राहकांनी लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट

बँक ग्राहकांनी नेहमी लक्षात ठेवावं की KYC फक्त बँकेच्या शाखेत जाऊन किंवा बँकेच्या अधिकृत App मधूनच करता येतं. आता Video KYC ने पण ही प्रक्रिया करता येते. यासाठी कोणताही Apk डाऊनलोड करावा लागत नाही. तसेच कोणत्याही खोट्या लिंकवर जावं लागत नाही. जर KYC ऑनलाईन करता येत नसेल तर सुरक्षेसाठी बँकेच्या शाखेत जाऊन ते पूर्ण करणं कधीही चांगलं. सध्या देशातल्या बँकांच्या अधिकृत वेबसाईट शेवटी .

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किंमतीत किंचीत वाढ! तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या

bank.in ने संपतात, हे लक्षात ठेवा.

खोटा मेसेज आला तर काय करावं?जर एखाद्या ग्राहकाने चुकून खोट्या मेसेजमधली लिंक उघडली किंवा त्यातला Apk डाऊनलोड झाला तर अशावेळी थेट 1930 या नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार करा. जर एखाद्या ग्राहकाला असा खोटा मेसेज आला असेल तर लगेच संबंधित बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधून तक्रार नोंदवा. हा नंबर बँक पासबुकवर मिळून जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: KYC अपडेटच्या नावाखाली बँक फसवणूक कशी केली जाते?

    Ans: बनावट SMS किंवा WhatsApp मेसेज पाठवून ग्राहकांना खोट्या लिंकवर क्लिक करण्यास किंवा APK डाउनलोड करण्यास सांगितले जाते.

  • Que: KYC फ्रॉडचा मेसेज कसा ओळखावा?

    Ans: बँक खाते बंद करण्याची धमकी, KYC ची शेवटची तारीख किंवा रिवॉर्ड पॉईंट्सचे आमिष दाखवणारे संशयास्पद मेसेज सावधपणे तपासावेत.

  • Que: बँक KYC साठी OTP, PIN किंवा CVV मागते का?

    Ans: नाही. OTP, PIN आणि CVV कोणालाही सांगू नये. अशा माहितीची मागणी करणाऱ्या मेसेजपासून सावध राहावे.

Web Title: Bank kyc update fraud alert 4 tips to avoid cyber scam rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • bank accounts
  • e-KYC
  • KYC News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.