Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Banking Sector Mass Layoffs : अरे देवा… बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार! तब्बल 70% काम यंत्र करणार; अहवालाने खळबळ

Banking Sector Mass Layoffs : AI आणि ऑटोमेशनच्या वेगाने विस्तारणाऱ्या युगात आता बँकिंग क्षेत्रालाही मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका नव्या अहवालानुसार, आगामी काळात बँकांमधील 70 टक्क्यांहून अधिक काम मानवाऐवजी AI द्वारे केले जाईल, ज्यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर छंटनी होण्याचे संकेत मिळाले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 11, 2026 | 08:21 AM
बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार!
  • तब्बल 70% काम यंत्र करणार
  • अहवालाने खळबळ
Banking Sector Mass Layoffs : AI तंत्रज्ञान जगतात वरदान ठरत आहे असं म्हणताना मात्र नोकऱ्यांच्या जगतात कात्री बनून काम करतंय हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. याचा सगळ्यात मोठा फटका आयची क्षेत्रातील लोकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता याचा प्रभाव बँकिंग क्षेत्रात वाढतोय का असाही प्रश्न उभा राहत आहे. याचं मोठं कारण म्हणजे नुकताच आलेला अहवाल. बँकिंग क्षेत्रातही नजीकच्या भविष्यात मोठा बदल होण्याची शक्यता वाटत आहे. ( Banking Sector Mass Layoffs ) 

Instant Loan Apps Risk : पैशांची तातडीची गरज? 10 मिनिटांत मिळणारे इन्स्टंट लोन घ्यावे की नाही? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

McKinsey च्या एका अहवालानुसार, सध्या कर्मचाऱ्यांकडून हाताने केली जाणारी ६०% ते ७०% जोखीम व्यवस्थापनाची कामे AI स्वयंचलित करू शकते असं स्पष्ट केले आहे. या अहवालामुळे बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बँकांमध्ये AI चा वाढता प्रभाव उपयुक्त ठरेल?

बँकांमधील जोखीम व्यवस्थापनामध्ये ग्राहक किंवा कंपनीला कर्ज देण्यामधील जोखमी तपासण्यासाठी समाविष्ट आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना विविध माहिती गोळा करणे आणि कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक असते. AI च्या साहाय्याने, ग्राहक आणि कंपन्यांविषयी आर्थिक माहिती गोळा करणे, कर्जाची कागदपत्रे तयार करणे व त्यांची पडताळणी करणे, नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासणे, बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे आणि बँकांमधील फसवणुकीवर लक्ष ठेवणे यांसारखी कामे सहजपणे पूर्ण केली जाऊ शकतात.

हा बदल का केला जातोय?

AI मुळे, बँकांचा वेळ आणि खर्च आता कमी होईल. तसेच, कर्मचारी अधिक महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोकळे होतील. पण, याचा अर्थ असा नाही की ७०% बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील. अहवालात कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याऐवजी, हाताने केली जाणारी कामे स्वयंचलित करण्याची शिफारस केली आहे.

कर्मचाऱ्यांची भूमिका काय असेल?

McKinsey च्या मते, AI मुळे वाचलेला वेळ आणि संसाधने बँका अधिक महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकतात. अहवालात म्हटले आहे की, बँका उर्वरित क्षमतेपैकी अंदाजे अर्धी क्षमता उत्तम विश्लेषण, जोखमीवर आधारित सल्ला आणि जलद निर्णय घेण्यासाठी वापरू शकतात. उर्वरित संसाधने AI तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, डेटाचे संरक्षण करण्यासाठी आणि नवीन तांत्रिक प्रणाली तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. याचा अर्थ असा की, बँकेच्या कर्मचाऱ्यांना केवळ कागदपत्रे तपासण्याऐवजी अधिक आव्हानात्मक कामांमध्ये तैनात केले जाऊ शकते.

नोकऱ्या जातील का?

AI च्या आगमनामुळे बँकिंग क्षेत्राच्या कार्यपद्धतीत मोठे बदल घडू शकतात. ज्या कामांमध्ये पुनरावृत्तीच्या प्रक्रियांची आवश्यकता असते, त्या कामांमध्ये AI चा वापर वाढू शकतो. पण, अहवालानुसार, गुंतागुंतीच्या प्रकरणांचे मूल्यांकन करणे, महत्त्वाचे निर्णय घेणे आणि जोखमीशी संबंधित सल्ला देणे यांसारख्या कामांमध्ये मानव महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील. बँकांना अशा कर्मचाऱ्यांची गरज भासेल ज्यांना बँकिंग आणि एआय दोन्हीची समज असेल. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान शिकणे आणि आपली कौशल्ये सुधारणे महत्त्वाचे ठरेल.

बँकांना फायदा होईल

अहवालात म्हटले आहे की, ज्या बँका AI चा लवकर अवलंब करतील, त्यांना इतरांपेक्षा फायदा मिळू शकतो. एआयमुळे बँका कमी वेळात चांगले निर्णय घेऊ शकतील आणि आपला खर्च कमी करू शकतील. पण, मोठ्या प्रमाणावर एआय लागू करण्यासाठी, बँकांकडे मजबूत तांत्रिक प्रणाली, प्रशिक्षित कर्मचारी आणि डेटा सुरक्षेसाठी स्पष्ट नियम असणे आवश्यक आहे.

Control Rice Prices : वाढत्या महागाईला लागणार लगाम! तांदळाचे भाव उतरणार; सरकार खुल्या बाजारात 50 लाख टन तांदूळ विकणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: बँकिंग क्षेत्राबाबत नुकत्याच आलेल्या रिपोर्टमध्ये काय दावा करण्यात आला आहे?

    Ans: रिपोर्टनुसार, बँकांमधील बहुतांश कार्यप्रणालीमध्ये एआयचा वापर वाढणार असून, तब्बल ७० टक्क्यांहून अधिक बँकिंग कामे एआय आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून केली जातील.

  • Que: एआयच्या या वाढत्या वापरामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर काय परिणाम होईल?

    Ans: ग्राहकांची कामे, डेटा प्रोसेसिंग, आणि रिस्क असेसमेंट यांसारखी बऱ्याच भागातील कामे यंत्राद्वारे होणार असल्याने बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात (Mass Layoffs) होण्याची दाट शक्यता आहे.

  • Que: बदलामुळे बँक कर्मचाऱ्यांनी स्वतःमध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे?

    Ans: बदलामुळे बँक कर्मचाऱ्यांनी स्वतःमध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे?

Web Title: Banking sector mass layoffs ai will do 70 percent work report marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • ai
  • Bank
  • layoffs

संबंधित बातम्या

Company Layoffs : AI चा वाढता दणका! IT क्षेत्रात खळबळ; ‘या’ प्रसिद्ध कंपनीत तब्बल 850 कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी
1

Company Layoffs : AI चा वाढता दणका! IT क्षेत्रात खळबळ; ‘या’ प्रसिद्ध कंपनीत तब्बल 850 कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी

IIT BHU Physical AI Course: आयआयटी बीएचयूमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणार ‘फिजिकल एआय’चा बीटेक कोर्स, जाणून घ्या याबद्दल सविस्तर
2

IIT BHU Physical AI Course: आयआयटी बीएचयूमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणार ‘फिजिकल एआय’चा बीटेक कोर्स, जाणून घ्या याबद्दल सविस्तर

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश
3

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश

Bank Job: बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे का? परीक्षा क्रॅक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
4

Bank Job: बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे का? परीक्षा क्रॅक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.