
बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, RBI ने 27 सप्टेंबर रोजी बँक शाखा, कार्यालये, ATM-लिंक शाखा आणि करन्सी चेस्ट पूर्णपणे कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना रविवार असूनही सार्वजनिक क्षेत्रातील आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये नियमित बँकिंग सेवा मिळतील.
Mumbai Real Estate Market : तब्बल 711 कोटींची डील! फ्लॅट नव्हे तर अख्खा टॉवरच केला खरेदी…
26 सप्टेंबर हा चौथा शनिवार आणि 27 सप्टेंबर रविवार असल्याने सामान्य परिस्थितीत बँकांना सलग दोन दिवस सुट्टी असती. त्यानंतर 28 ते 30 सप्टेंबर असा तीन दिवसांचा प्रस्तावित संप असल्यामुळे शाखांमधील प्रत्यक्ष बँकिंग सेवा सलग पाच दिवस प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे ग्राहकांच्या आवश्यक बँकिंग व्यवहारांवर दीर्घकाळ परिणाम होऊ नये म्हणून 27 सप्टेंबरला बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
UFBU ने 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी तीन दिवसांचा देशव्यापी संप प्रस्तावित केला आहे. पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 22 सप्टेंबरच्या सलोखा बैठकीनंतरही ठोस प्रगती न झाल्याने संप मागे न घेण्याची भूमिका UFBU ने मांडली होती.
दरम्यान, केंद्र सरकार आणि बँक व्यवस्थापनांनी संघटनांना प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
27 सप्टेंबरला सार्वजनिक क्षेत्रातील आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू असल्याने रोख रक्कम जमा करणे, शाखेशी संबंधित महत्त्वाचे व्यवहार, चेकसंबंधी कामे किंवा इतर आवश्यक बँकिंग व्यवहार पूर्ण करता येतील. त्यानंतर प्रस्तावित संपामुळे 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान शाखांमधील सेवा प्रभावित होऊ शकतात. डिजिटल बँकिंग, UPI, इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगसारख्या सेवा मात्र सामान्यतः उपलब्ध राहण्याची अपेक्षा आहे.
Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही