फोटो सौजन्य सोशल मिडिया
मुंबईच्या जुहू येथे तब्बल 712 कोटींमध्ये ही खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी देशातील सर्वात किंमतीची आणि सर्वात मोठी डील मानली जात आहे. या मध्ये एम्बेसी टेराझा प्रकल्पातील 63,000 हजार कारपेट चा एरिया असून या टॉवर मध्ये लक्झरी सुविधा आहे. मुंबई रिअल इस्टेटमधील ही खरेदी ऐतिहासिक मानली आहे.
‘एंजेल वन’ चे संस्थापक दिनेश ठक्कर यांनी मुंबईतील जुहू तारा रोड येथील ‘एम्बेसी टेराझा’ या अलिशान टॅावर मध्ये तब्बल 712 कोटी मध्ये इमारत खरेदी केली असून या खरेदीचे मुख्य तपशील खालीलप्रमाणे आहेत.
दिनेश ठक्कर हे स्वता:हा एक भारतीय व्यवसायिक असून ते वित्तीय व शेअर मार्केट आणि ब्रोकिंग कंपनीचे ते संस्थापक आहेत. त्यांची ‘एंजेल वन’ नावाची कंपनी असून त्या कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्याचा प्रवास अधिक प्रेरणादायी आहे. सामान्य कापड व्यावसायिक कुटुंबातून येतात.
त्यांनी 90 च्या दशकात शेअर मार्केट बाजारात पाऊल ठेवले, त्यांनी पारंपारिक ब्रोकिंगचे रूपांतर डिजिटल तंत्रज्ञानात केले. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना स्वतःचे व्यावसायिक साम्राज्य उभे केले आहे.
Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
‘एंजेल वन’ संस्थापक दिनेश ठक्कर यांनी मुंबईतील जुहू तारा रोड येथील ‘एम्बेसी टेराझा’ या अलिशान टॅावर मध्ये तब्बल 712 कोटींची इमारत खरेदी केली असून ही खरेदी त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी केली आहे. जी देशातील सर्वात महागड्या निवासी व्यवहारांपैकी एक आहे.
या इमारती मध्ये एकूण कारपेट एरिया 63,000 स्क्वेअर फूट असून याची रचना तळमजल्यापासून ते 07 मजल्यापर्यंत त्यांनी खरेदी केले. त्यांच्या साठी ही एक प्रकारची, त्यांची स्वता:ची अशी खासगी वास्तू आहे.
मुंबईच्या जुहू तार रोड या परिसरात प्रामुख्याने बॉलीवूड सेलिब्रिटी आणि मोठ्या उद्योगपतींची घरे आहेत. या इमारतीमध्ये अत्याधुनिक सुरक्षा, प्रायव्हेट पार्किंग, लक्झरी डिझाइन आणि अनेक जागतिक दर्जाच्या सुख-सुविधा उपलब्ध आहेत.
मुंबईच्या रिअल इस्टेट मध्ये प्रीमियम आणि लक्झरी घरांची मागणी किती वेगाने वाढत आहे. हेच या ऐतिहासिक डीलवरून दिसून येते.






