Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Teacher News: मुख्याध्यापकांसाठी मोठी खूशखबर! वर्षाला मिळणार अर्जित रजा; पण किती? सुधारित शासन निर्णय जारी

ZP Teacher News: जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना वर्षाला १५ दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२३ पासून निर्णय लागू होणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 01, 2026 | 01:17 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषद मुख्याध्यापकांना अर्जित रजा मंजूर 
  • हा सुधारित शासन निर्णय कोणत्या तारखेपासून लागू होणार 
  • अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या शिक्षकांचे काय?
ZP Teacher News: उन्हाळी आणि दिवाळीच्या दीर्घ सुट्टीतही शाळेची कार्यालयीन कामे, शासकीय अहवाल आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना अखेर वर्षाला १५ दिवसांची अर्जित रजा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामविकास विभागाने याबाबत सुधारित शासन निर्णय जारी केला. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून करण्यात येणार असल्याने मुख्याध्यापकांना मागील कालावधीचाही लाभ मिळणार आहे. मात्र, या रजेचे रोखीकरण करता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

वित्त विभागाच्या ६ डिसेंबर १९९६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांचे पद दीर्घ सुट्टीच्या काळातही कर्तव्यावर असणारे पद म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात कराव्या लागणाऱ्या कामाच्या मोबदल्यात अर्जित रजा मिळावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार ६ डिसेंबर २०२२ रोजी शासनाने निर्णयही काढला होता. मात्र, अर्जित रजेच्या रोखीकरणाबाबत निर्माण झालेल्या स्पष्टतेच्या अभावामुळे हा निर्णय आता अधिक्रमित करून सुधारित आदेश काढण्यात आला आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ५४ (२) (ए) नुसार प्रत्येक कॅलेंडर वर्षात १५ दिवस अर्जित रजा मंजूर करण्यात आली आहे. यासाठी दीर्घ सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापकांनी किमान ३० दिवस कार्यालयात उपस्थित राहून काम करणे अपेक्षित आहे. मात्र, काम नसताना केवळ उपस्थिती दाखवण्यासाठी शाळेत येण्याची सक्ती करता येणार नाही. तसेच उपस्थित न राहिल्यामुळे वेतन कपातही करता येणार नाही.

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक

सुट्टीच्या काळात ज्या दिवशी शालेय कार्यालयीन कामकाज केले जाईल, त्या दिवशी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ३० दिवसांपेक्षा कमी उपस्थिती असल्यास त्याच प्रमाणात अर्जित रजा मिळेल. सुट्टीच्या काळात अनुपस्थित राहिल्यास अर्जित रजा अनुज्ञेय राहणार नाही. तसेच शाळेची महत्त्वाची आणि निकडीची कामे वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी शिस्तभंगाची कारवाई करू शकतील.

रोखीकरणाला मात्र नकार

या निर्णयानुसार मिळणाऱ्या १५ दिवसांच्या अर्जित रजेचा वापर रजा म्हणूनच करता येईल. तिचे रोखीकरण करण्यास शासनाने स्पष्ट मनाई केली आहे. वित्त विभागाच्या व्यय-१५ आणि सेवा-६ या कार्यासनांची सहमती घेतल्यानंतर हा निर्णय जारी करण्यात आला आहे.

RRB ALP Admit Card 2026 Out: रेल्वे लोको पायलट परीक्षा ३ नोव्हेंबरपासून; तुमचे हॉल तिकीट असे करा डाऊनलोड

अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या शिक्षकांचे काय?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळपास ९० टक्के शाळांमध्ये पात्र मुख्याध्यापक नसल्याने सेवाज्येष्ठ शिक्षक अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. त्यांनाही पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांप्रमाणेच, किंबहुना कमी शिक्षकसंख्येमुळे अधिक काम करावे लागते. त्यामुळे या शिक्षकांनाही अर्जित रजेचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिल्हा परिषद मुख्याध्यापकांना वर्षाला किती दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे?

    Ans: ग्रामविकास विभागाने काढलेल्या सुधारित शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात १५ दिवसांची अर्जित रजा (Earned Leave) मंजूर झाली आहे.

  • Que: हा सुधारित शासन निर्णय कोणत्या तारखेपासून लागू होणार आहे?

    Ans: या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून करण्यात येणार असून, मुख्याध्यापकांना मागील कालावधीचाही लाभ मिळणार आहे.

  • Que: या १५ दिवसांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येईल का?

    Ans: नाही. या रजेचा वापर केवळ रजा म्हणूनच करता येईल, तिचे रोखीकरण करण्यास शासनाने स्पष्ट मनाई केली आहे.

Web Title: Zp teacher news headmaster earned leave 15 days gr update marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • education
  • Holiday
  • Teacher

संबंधित बातम्या

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक
1

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू
2

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!
3

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा
4

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.