Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरी करायची तर ‘या’ कंपन्यांमध्येच! आशियातील Best Workplaces 100 कंपन्यांत भारतीय ब्रँड्सचे नाव; जाणून घ्या यादीत कोण?

Best Workplaces In Asia : आशिया खंडात कर्मचाऱ्यांसाठी नोकरीचे सर्वोत्तम वातावरण पुरवणाऱ्या 'सर्वोत्कृष्ट १०० कंपन्यांची' नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय कंपन्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत अव्वल स्थानांवर बाजी मारली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 12, 2026 | 06:50 PM
टॉप १०० मध्ये भारतीय कंपन्यांचा डंका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

टॉप १०० मध्ये भारतीय कंपन्यांचा डंका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • नोकरी करायची तर ‘या’ कंपन्यांमध्येच!
  • आशियातील Best Workplaces 100 कंपन्या
  • भारतीय ब्रँड्सचे नाव आहे का?
Best Workplaces In Asia : जगभरात लहान-मोठ्या अशा अनेक कंपन्या कार्यरत आहेत. पण कोणती कंपनी सर्वोत्तम आहे हे आपण कसे ठरवू शकतो? हे ठरते ते अहवाल आणि अभ्यासांवरून काढलेल्या माहितीवरुन. उदाहरणार्थ, ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ने अलीकडेच कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम कामाचे वातावरण प्रदान करणाऱ्या आशियाई कंपन्यांची २०२६ ची यादी प्रसिद्ध केली आहे. ही क्रमवारी कर्मचाऱ्यांच्या अभिप्रायावर आधारित होती. पण या यादीत कोणाचा नंबर कितवा लागला? आणि भारतातील कोणती कंपनी आहे बेस्ट? ( Best Workplaces In Asia )

Farmer Government Schemes : शेतकऱ्यांनो… फक्त 7/12 दाखवा अन् खात्यात पैसे मिळवा; सरकारच्या 3 खास योजना ठरतील फायदेशीर

या अभ्यासात आशिया आणि मध्य पूर्वेतील अंदाजे ८९ लाख कर्मचाऱ्यांच्या अनुभवांचा समावेश होता. कर्मचाऱ्यांना कंपनीवरील विश्वास, नेतृत्व, कामाचे वातावरण, नवीन कल्पनांना प्रोत्साहन, कंपनीची मूल्ये आणि त्यांच्या एकूण अनुभवाबद्दल विचारण्यात आले. याच्या आधारे, जगातील सर्वोत्तम १०० कंपन्यांची यादी तयार करण्यात आली.

कोणत्या आहे बेस्ट कंपन्या?

‘ग्रेट प्लेस टू वर्क’नुसार, या यादीत समावेशाचे निकष कंपनीचा आकार किंवा महसूल नसून, कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. या यादीनुसार, मोठ्या कंपन्यांच्या श्रेणीतील शीर्ष १० कंपन्या खालीलप्रमाणे आहेत:

हिल्टन
मॅरियट इंटरनॅशनल
सिस्को
अॅबव्ही
डीएचएल
इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुप
मायक्रो टेक्नॉलॉजीज
टीपी
अॅक्सेन्चर
कॅपेला

या भारतीय कंपन्यांचाही यादीत समावेश

या संपूर्ण क्रमवारीमध्ये भारताची कामगिरी खूपच दमदार होती. मोठ्या कंपन्यांच्या टॉप १०० यादीत भारताच्या ३४ कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त, लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या यादीत सहा भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.
प्रमुख भारतीय कंपन्यांमध्ये फ्लिपकार्ट ग्रुप, इन्फोसिस, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, एयू स्मॉल फायनान्स बँक, रिलायन्स रिटेल, बजाज फायनान्स, मॅक्स हेल्थकेअर, एवायई फायनान्स, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, झेनसार टेक्नॉलॉजीज, एक्सपेरियन, एडलवाईस लाईफ आणि एचपी इंक. यांचा समावेश आहे.

लहान आकाराच्या भारतीय कंपन्यांचाही समावेश

याव्यतिरिक्त, लहान आणि मध्यम आकाराच्या सहा भारतीय कंपन्यांचाही यादीत समावेश आहे. यामध्ये एनआयए इन्स्टिट्यूशन्स, वाहदम इंडिया, शॅले हॉटेल्स, सर्व्हेंटिका रिन्यूएबल इंडिया, किम्बल आणि एलएमएस यांचा समावेश आहे.

कर्मचाऱ्यांना काय आवडत?

या यादीतील कंपन्यांमधील जवळपास ९३% कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांची कंपनी काम करण्यासाठी एक उत्तम जागा आहे. सरासरी विश्वास निर्देशांक गुण ९१% होता. कर्मचाऱ्यांनी सुरक्षित कार्यालयीन वातावरण, नवीन कर्मचाऱ्यांचे स्वागत करणे आणि सर्वांना समान वागणूक देणे यांसारख्या घटकांबद्दल विशेषतः सकारात्मक मते व्यक्त केली. किमान ९५% कर्मचाऱ्यांनी या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक मते व्यक्त केली.

SBI ची खास ऑफर! UPI पेमेंटच्या आधारे मिळणार Loan; फक्त हिस्ट्रीवरुन बँक खात्यात जमा होणार रक्कम

Web Title: Best companies as workplaces in asia top 100 list indian companies dominate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Employees
  • workplace

संबंधित बातम्या

Government Salary & Grade Pay: सरकारी नोकरीत ”ग्रेड-पे’चा अर्थ काय? जाणून घ्या बेसिक सॅलरी आणि इन-हैंड पगाराचे गणित!
1

Government Salary & Grade Pay: सरकारी नोकरीत ”ग्रेड-पे’चा अर्थ काय? जाणून घ्या बेसिक सॅलरी आणि इन-हैंड पगाराचे गणित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.