Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला सक्षमीकरणसाठी नामांकित शीतपेय कंपनी पुढे; 1 दशलक्ष महिलांना मिळणार रोजगारसंधी!

देशातील एका आघाडीच्या कंपनीने महिला सक्षमीकरणासाठी महत्वाचा उप्रक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे कंपनीने देशभरातील १ दशलक्ष महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 21, 2024 | 01:31 PM
महिला सक्षमीकरणसाठी नामांकित शीतपेय कंपनी पुढे, १ दशलक्ष महिलांना मिळणार रोजगारसंधी!

महिला सक्षमीकरणसाठी नामांकित शीतपेय कंपनी पुढे, १ दशलक्ष महिलांना मिळणार रोजगारसंधी!

Follow Us
Close
Follow Us:

देशातील अन्नप्रक्रिया आणि शीतपेय क्षेत्रातील एका आघाडीच्या कंपनीने महिला सक्षमीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने ‘क्रांती नारी – नारीसाठी क्रांती’ उपक्रमाची सुरुवात केली आहे. कंपनीच्या उपक्रमाद्वारे देशातील जवळपास 1 दशलक्ष महिलांना सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. कंपनीच्या या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या करिअरबाबत महत्वाचे निर्णय घेण्यास मदत होणार आहे. याशिवाय महिलांना रोजगारसंधी निर्माण होण्यास देखील मदत होणार आहे.

काय आहे हा उपक्रम?

कंपनीचा हा उपक्रम देशातील महिलांना करिअरसह रोजगार उपलब्ध होण्यासाठी महत्वाचा उपक्रम आहे. याद्वारे महिलांना अन्नप्रक्रिया उद्योग, कृषी उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याशिवाय कंपनीकडून महिलांना या क्षेत्रामध्ये सामावून घेणे हा देखील यामागील मुख्य उद्दिष्ट असणार आहे. इतकेच नाही तर देशभरातील कंपन्यांमध्ये स्त्री-पुरूष असमानतेमधील अंतर दूर होण्यास देखील यामुळे मदत होणार आहे.

स्त्री-पुरुष समानतेला बळकटी मिळणार

याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जागृत कोटेचा यांनी म्हटले आहे की, कंपनीने आपल्या ‘क्रांती नारी – नारीसाठी क्रांती’ उपक्रम तीन वर्षांसाठी राबवण्यासाठी तीन वर्षांचे धोरण निश्चित केले असून, या धोरणाद्वारे, देशभरातील अपारंपरिक क्षेत्रामध्ये महिलांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ज्याद्वारे शाश्वत विकास आणि सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये लैंगिक समानता येण्यास बळकटी मिळणार आहे. याशिवाय कंपनीने देशातील महिलांसाठी केलेली गुंतवणूक ही देशाच्या सर्वसमावेशक भविष्यासाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महिलांच्या जीवनात बदल घडवून आणणे

’क्रांती नारी – नारीसाठी क्रांती’ उपक्रम कंपनीच्या वैविध्य, समानता आणि समावेशकता या तत्वांसाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कंपनीने देशभरात 1 दशलक्ष महिलांना त्यांच्या सर्वांगीण विकासाची सोय करण्याचे निश्चित केले आहे. ज्यामुळे देशातील महिलांच्या सक्षमीकरणास मोठी मदत होणार आहे. केवळ महिला सक्षमीकरण हे कंपनीचे उद्दिष्ट नसून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. असे कंपनीच्या सीएचआरओ पवित्रा सिंग यांनी म्हटले आहे.

कंपनीच्या ’क्रांती नारी – नारीसाठी क्रांती’ उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी https://in-pepsicoredesign-global-stage.pepext.com/our-impact/diversity-equity-inclusion/revolutionari या संकेतस्थळाला भेट द्या.

Web Title: Beverage company women empowerment 1 million women will get employment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

Zomato-Blinkit चा मोठा निर्णय! ६,००० हून अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना मिळणार सरकारी योजनांचे फायदे
1

Zomato-Blinkit चा मोठा निर्णय! ६,००० हून अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना मिळणार सरकारी योजनांचे फायदे

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून
2

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून

४८ तासाच्या आत फ्लाईट तिकिट रद्द केल्यास लागणार नाही चार्ज! DGCA च्या नव्या प्रस्तावामुळे प्रवाशांना मोठा दिलासा
3

४८ तासाच्या आत फ्लाईट तिकिट रद्द केल्यास लागणार नाही चार्ज! DGCA च्या नव्या प्रस्तावामुळे प्रवाशांना मोठा दिलासा

GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?
4

GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.