Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार्जर विसरलात? टेन्शन नको! आता बोर्डिंग गेटवरच येईल Blinkit ची डिलिव्हरी; मुंबई विमानतळावर देशातील पहिली सुविधा सुरू!

मुंबई विमानतळावर आता ब्लिंकिटची जादू! बोर्डिंग गेटवरच मिळणार विसरलेला चार्जर आणि स्नॅक्स. अदानी एअरपोर्ट्स आणि ब्लिंकिटचा देशातील पहिलाच प्रयोग. वाचा सविस्तर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 04:20 PM
आता बोर्डिंग गेटवरच येईल Blinkit ची डिलिव्हरी (Photo Credit- X)

आता बोर्डिंग गेटवरच येईल Blinkit ची डिलिव्हरी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • चार्जर विसरलात? टेन्शन नको!
  • आता बोर्डिंग गेटवरच येईल ‘ब्लिंकिट’ची डिलिव्हरी
  • मुंबई विमानतळावर देशातील पहिली सुविधा सुरू!
मुंबई, १ एप्रिल २०२६: घाईघाईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता विसरलेला चार्जर, जलदपणे स्‍नॅक किंवा पाण्याची बाटली केवळ एका टॅपसह उपलब्‍ध होईल. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी विमानतळ ऑपरेटरने आघाडीचे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटसोबत सहयोगाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) भारतातील पहिली इन-टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या टर्मिनल २, डोमेस्टिक डिपार्चर येथे सुरू झाली आहे आणि याद्वारे विमानतळावर प्रत्‍यक्ष अॅप-आधारित डिलिव्हरीचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे.

प्रवासी आता त्यांच्या गरजेच्या वस्तू ब्लिंकिट अॅपद्वारे मागवू शकतात आणि या वस्‍तू त्यांना टर्मिनलमध्ये बोर्डिंग गेट्स, लाउंज, फूड कोर्ट आणि ठराविक भागीदार आऊटलेट्स अशा ठिकाणी पोहोचवल्या जातील. प्रवासाच्या वेळेत कोणताही अडथळा न आणता ही डिलिव्हरी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत केली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि विनाअडथळा अनुभव मिळेल.

एएएचएलचे प्रवक्ता म्‍हणाले, ”अदानी एअरपोर्ट्स डिजिटल सेवांच्या माध्यमातून विमानतळावरील अनुभव अधिक चांगला कसा करता येईल, याचा नव्याने विचार करत आहे. विमानतळ टर्मिनलमध्ये अॅप-आधारित सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या वेळेचा अधिक चांगला वापर करता येईल आणि यामुळे सेवेचा दर्जा देखील उंचावेल. हे अधिक प्रतिसाद देणारी आणि प्रवासी-केंद्रित विमानतळे उभारण्याच्या दिशेने पाऊल आहे.”

या सुविधेमध्ये प्रवासासाठी लागणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, स्‍नॅक्स, पुस्तके, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी लागणारी उत्पादने आणि वैयक्तिक गरजांच्या वस्तूंचा समावेश आहे. पॅकेज्ड वॉटर, शीतपेये आणि ज्यूस यांसारखे परवानगी असलेले द्रव पदार्थ विमानतळाच्या सुरक्षा नियमांनुसार टर्मिनलवरील मंजूर इन्व्हेंटरीमधून मिळवले जातात.

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम

ब्लिंकिटसाठी हा उपक्रम क्विक कॉमर्सला अशा ठिकाणी घेऊन जातो, जेथे मागणी आणि गरज दोन्ही जास्त आहे. यामुळे ऑनलाइन सेवेचा वापर आणि ग्राहकांपर्यंत पोहोच अधिक वाढण्यास मदत होईल. एएएचएलसाठी या सेवेमधून प्रवाशांकरिता सोयीसुविधा वाढवण्याचे, तसेच डिजिटल रिटेलच्या माध्यमातून नॉन एरो ग्रोथ वाढवण्याचे धोरणात्मक प्रयत्‍न दिसून येतात.

ही सेवा विमानतळावरील किरकोळ विक्रीमध्‍ये सुलभता आणि परवडणारे दर यांचा नवीन स्तर निर्माण करते, ज्यामुळे प्रवाशांना वेळ आणि ठिकाणाच्या मर्यादेशिवाय अधिक पर्याय उपलब्ध होतात.

टर्मिनल २ वरील प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता हा उपक्रम प्रवासादरम्यान जाणवणारी महत्त्वाची उणीव भरून काढतो आणि प्रवाशांना गरजेच्या वेळी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देतो.

सुरू करण्‍यात आलेली ही सेवा एएएचएलच्या तंत्रज्ञान-आधारित आणि प्रवासी-केंद्रित विमानतळे उभारण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे, जेथे सुविधा, सुलभता आणि विनाअडथळा डिजिटल अनुभव प्रवासाची नवी व्याख्या ठरवतात.

Petrol-Diesel Price Hike: महागाईचा ट्रिपल अटॅक, कमर्शियल सिलेंडर, ATF नंतर आता पेट्रोल डिझेलदेखील महागलं

Web Title: Blinkit delivery now arrives right at the boarding gate countrys first of its kind facility launched at mumbai airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Blinkit
  • Business News
  • mumbai airport

संबंधित बातम्या

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
1

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध
2

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
3

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
4

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.