Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स वित्तीय सेवा यांची डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी

एक अशी अनोखी भागीदारी जी वित्तीय सेवांच्या शेवटच्या टप्प्यातील वितरणात बदल घडवून आणणार असून डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन देणार आहे. याचा कसा आणि कोणाला होणार फायदा घ्या जाणून

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 20, 2025 | 02:25 PM
भारती एअरटेल आणि बजाज फायनान्सचे मोठे पाऊल

भारती एअरटेल आणि बजाज फायनान्सचे मोठे पाऊल

Follow Us
Close
Follow Us:

भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठ्या दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक आहे आणि बजाज फायनान्स ही देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) आहे. या दोघांनी वित्तीय सेवांसाठी भारतातील सर्वात मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील वितरणात बदल करण्यासाठी एक धोरणात्मक भागीदारी करण्याचे जाहीर केले आहे. 

या अनोख्या भागीदारीमुळे एअरटेलचे 370 मिलियन, 12 लाख+ भक्कम वितरण नेटवर्क आणि बजाज फायनान्सचे 27 उत्पादन श्रेणींचे वैविध्यपूर्ण समूह आणि 5,000+ शाखा आणि 70,000 फील्ड एजंट्सचे वितरण प्रभाव एकत्र येत आहेत. 

ग्राहकांसाठी अनुभव 

एअरटेल सुरुवातीला आपल्या एअरटेल थँक्स ॲपवर बजाज फायनान्सची किरकोळ वित्तीय उत्पादने सुलभ व सुरक्षित ग्राहक अनुभवासाठी देऊ करणार आहे आणि नंतर स्टोअर्सच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे प्रदान करणार आहे. वित्तीय उत्पादने आणि सेवांमध्ये लक्षणीय वाढ करणे कंपन्यांच्या डिजिटल मालमत्तेच्या एकत्रित सामर्थ्यामुळे एअरटेल व बजाज फायनान्सला शक्य होणार आहे. 

डोनाल्ड ट्रम्पनंतर पत्नीच्या मीम कॉईनचा जलवा, लाँच झाल्यावर 24,000% ची $MELANIA मध्ये उसळी

गोपाल विठ्ठळ, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारती एअरटेल म्हणाले, “एअरटेल आणि बजाज फायनान्स या देशातील दोन विश्वासार्ह कंपन्या आहेत आणि कोट्यवधी भारतीयांना विविध प्रकारच्या आर्थिक गरजा असलेला पोर्टफोलिओ देऊन सबल करण्याची सामायिक दृष्टी त्यांनी ठेवलेली आहे. दोन्ही कंपन्यांची एकत्रित पोहोच, प्रमाण आणि वितरण शक्ती या भागीदारीचा पाया म्हणून काम करणार आहे व आम्हाला बाजारपेठेत सफलता गाठण्यास मदत करणार आहे. आम्ही एअरटेल फायनान्सला समूहासाठी धोरणात्मक मालमत्ता म्हणून तयार करीत आहोत आणि व्यवसायात गुंतवणूक आणि वाढ करत राहू. आज आमच्यावर 1 मिलियन पेक्षा जास्त ग्राहक विश्वास ठेवत असून एअरटेल फायनान्सला आमच्या ग्राहकांच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वन-स्टॉप शॉप बनविण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे.”   

डेटावर आधारित क्रेडिट हमी 

राजीव जैन, व्यवस्थापकीय संचालक, बजाज फायनान्स म्हणाले, “डेटावर आधारित क्रेडिट हमी (अंडररायटिंग) आणि वित्तीय समावेशनाच्या केंद्रस्थानी भारतातील डिजिटल परिस्थितीक व्यवस्था आहे. एअरटेल बरोबरची आमची भागीदारी सर्वसमावेशक विकासासाठी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचा फायदा तर घेतेच आणि त्याचसोबत भारतातील दोन आघाडीच्या आणि सर्वात विश्वासार्ह ब्रँड्सचे कौशल्य आणि पोहोच यांचा सुद्धा संयोग साधते. एअरटेल सोबत एकत्र काम करून आम्ही भारताचा पसंतीचा वित्तदाता बनू इच्छितो आणि दुर्गम भागातही लाखो लोकांना वित्तीय सेवांचा लाभ घेण्यास समर्थ बनवू इच्छितो. आम्ही अशा वेळी एअरटेलशी हातमिळवणी करण्यास उत्सुक आहोत जेव्हा बजाज फायनान्स एआयच्या शक्तीचा वापर करून कार्यक्षमता वाढवित आहे आणि ग्राहकांचा अनुभव वाढवित आहे.”

Budget 2025: देशात कोण आणि कसे तयार करते बजेट, कशी मिळते मंजुरी; जाणून घ्या एका क्लिकवर

लोनचाही समावेश 

आतापर्यंत बजाज फायनान्सची दोन उत्पादने एअरटेल थँक्स ॲपवर प्रयोगात्मक दृष्टीने देण्यात आली आहेत. मार्चपर्यंत बजाज फायनान्सची चार उत्पादने एअरटेल थँक्स ॲपवर ग्राहकांना उपलब्ध होतील. यामध्ये गोल्ड लोन, बिझनेस लोन, को-ब्रँडेड इन्स्टा ईएमआय कार्ड आणि पर्सनल लोनचा समावेश आहे. बजाज फायनान्सची जवळपास 10 आर्थिक उत्पादने या कॅलेंडर वर्षात एअरटेल द्वारे हळूहळू सादर केली जाणार आहेत. 

एअरटेल ग्राहकांना एअरटेल-बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्डसाठी एअरटेल थँक्स ॲपद्वारे आणि नंतर आपल्या देशव्यापी स्टोअर नेटवर्कद्वारे अर्ज करण्याची संधी मिळते. बजाज फायनान्स ग्राहकांना एअरटेल-बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्डवर विविध ऑफर्स उपलब्ध आहेत. 4,000 हून अधिक शहरांमधील 1.5 लाखांहून अधिक भागीदार स्टोअर्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि किराणा यांच्यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी लवचिक ईएमआय पर्याय आणि पेमेंट प्लॅनसचा लाभ वापरकर्त्यांना उचलता येणार आहे. याव्यतिरिक्त, को-ब्रँडेड कार्ड अनेक प्लॅटफॉर्मवरील ई-कॉमर्स व्यवहारांसाठी लागू आहे.

एअरटेल थँक्स ॲपमुळे आता ग्राहकांना गोल्ड लोन मिळविता येईल आणि त्यायोगे क्रेडिटच्या बाबतीत नवीन ग्राहकांना वित्तचा वापर करता येईल आणि औपचारिक वित्तीय प्रणालीशी एकरूप होता येईल. भागीदारीचा एक भाग म्हणून, भक्कम नियामक अनुपालन, डेटा गोपनीयता आणि सुरक्षा व सुलभ ग्राहक सेवेची बांधिलकी या दोन्ही कंपन्यांनी स्वीकारलेली आहे.

Web Title: Bharti airtel and bajaj finance enter into a strategic partnership to create one of india s largest digital platforms for financial services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा
1

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

Ola Electric च्या शेअर्समध्ये दोन दिवसांत २३ टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का?
2

Ola Electric च्या शेअर्समध्ये दोन दिवसांत २३ टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का?

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या
3

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
4

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.