Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 

भारती एअरटेल कंपनीच्या नेतृत्वबदलाची घोषणा केली आहे. शाश्वत शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारणार आहेत. तर, गोपाळ विठ्ठल यांची पदोन्नती होऊन उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी..

  • By Priti Hingane
Updated On: Dec 19, 2025 | 01:15 PM
Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 

Follow Us
Close
Follow Us:
  • भारती एअरटेल कंपनीच्या नेतृत्वबदलाची घोषणा
  • मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शाश्वत शर्मा पदभार स्विकारणार
  • भारती एअरटेल लिमिटेडच्या उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल यांची पदोन्नती
 

Bharti Airtel New CEO: गेल्या १३ वर्षांपासून गोपाळ विठ्ठल यांनी भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या सुनियोजित उत्तराधिकार प्रक्रियेचा भाग म्हणून गोपाळ विठ्ठल यांची भारती एअरटेल लिमिटेडच्या उपाध्यक्षपदीदेखील नियुक्ती करण्यात आली होती. या बदल पक्रियेचा भाग म्हणून आता कंपनीच्या नेतृत्वात बदल करण्यात आले आहेत. गोपाल विठ्ठल यांच्याजागी शाश्वत शर्मा यांची कंपनीचे नियोजित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या वर्षांत शर्मा या नव्या पदाचा कार्यभार स्विकारतील.

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वीरित्या काम पाहणा-या गोपाल विठ्ठल यांची पदोन्नती झाल्याचे कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२६ पासून गोपाळ विठ्ठल कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्ष पदाची सूत्रे सांभाळतील. गोपाळ विठ्ठल यांच्याकडे भारती एअरटेल कंपनीसह सर्व उपकंपन्यांच्या कामकाजाचे नेतृत्व आणि देखरेख करण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल.

हेही वाचा: AI Economic Growth: लहान उद्योगांसाठी मोठी संधी! AI मुळे MSME क्षेत्रात 500 अब्जची संधी

गोपाळ विठ्ठल डिजिटल व तंत्रज्ञानासंबंधीच्या कामकाजांसह विविध निर्णय प्रक्रियेत सहभागी असतील. यात नेटवर्क धोरण, विविध कामकाजांविषयीची खरेदी प्रक्रिया तसेच मानव संसाधन या विविध विभागांच्या कामकाजांचे समन्वय साधणे तसेच या सर्व प्रक्रियेत समूहाची एकात्मता वाढवणे आदी कामकाजांचा समावेश असेल. समूहाची धोरणात्मक दिशा ठरवणे आणि संस्थेला भविष्यातील बदलांसाठी सक्षम तसेच सज्ज करणे यावर त्यांचा विशेष भर देतील. भविष्यकालीन नवकल्पना, तांत्रिक प्रगती आणि दीर्घकालीन वाढ हे सुनिश्चित करण्यासाठी गोपाळ विठ्ठल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

येत्या नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसापासूनच शाश्वत शर्मा हे भारती एअरटेल इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धूरा सांभाळतील. गेल्या वर्षभरापासून शर्मा नव्या जबाबदारीच्या पूर्वतयारीचा सखोल अभ्यास करत आहेत. शर्मा हे नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदनामासह गोपाळ विठ्ठल यांच्यासोबत आगामी नियुक्त पदाची संपूर्ण माहिती घेत आहेत. शर्मा यांनी पूर्वतयारी प्रक्रियेतच कंपनीच्या विविध कामकाजांचा जवळून अनुभव घेतला आहे. नवीन पदभार स्विकारल्यानंतर ते गोपाळ विठ्ठल यांना कामकाजाचा अहवाल देत राहतील.

सध्या सौमेन रे हे भारती एअरटेल इंडियाचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम पाहत आहे. येत्या काळात सौमेन रे यांची समूहाच्या मुख्य आर्थिक अधिकारी या पदावर नेमणूक केली जाईल. गोपाळ विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सौमेन रे नव्या पदाचे कामकाज पाहतील. सौमेन रे यांनी गेल्या चार वर्षांपासून मुख्य आर्थिक अधिकारी पदाची धूरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळली आहे. भारती एअरटेलची आर्थिक कामगिरी उंचावण्यात आणि कंपनीला आर्थिक स्थैर्यता प्राप्त करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

कंपनीचे फायनान्शिअल कंट्रोलर म्हणून काम पाहणा-या अखिल गर्ग यांची भारती एअरटेल इंडियाचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. गर्ग गेल्या १२ वर्षांपासून कंपनीच्या कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या काळात त्यांनी कंपनीच्या विविध विभागांमध्ये महत्त्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या आहेत. त्यांनी हेक्साकॉम आयपीओ यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यावसायिक प्रकल्पांचे यशस्वीरित्या नेतृत्व केले आहे. शाश्वत शर्मा आणि सौमेन रे यांच्या देखरेखीअंतर्गत अखिल गर्ग नव्या पदाचे कामकाज पाहतील.

हेही वाचा: UPI Digital Payment: भारत बनतोय कॅशलेस! ऑनलाइन पेमेंट मध्ये 33% वाढ; तर 3 महिन्यांत तब्बल ‘इतका’ अब्ज व्यवहार

सध्या रोहित पुरी हे संयुक्त कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांचीही पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे. पुरी आता कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी म्हणून सर्व कामकाज पाहतील. ग्रुप कंपनी सचिव पंकज तिवारी हे गट स्तरावर आपले नेतृत्व आणि देखरेख कायम ठेवणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या धोरणात्मक कामकाजाची प्रक्रिया सुरु राहील.

कंपनीच्या नेतृत्वबदलाबदद्ल भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी समाधान व्यक्त केले. कंपनीच्या विविध पदांच्या यशस्वी हस्तांतराबद्दल भाष्य करताना ते म्हणाले की, ‘‘एअरटेलमधील नेतृत्वाचा वारसा सोपवण्याची ही प्रक्रिया ज्या पद्धतीने पार पडली, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटत आहे. बदल आणि सातत्य हे दोन्ही एकत्रितपणे पुढे नेण्याचा यापेक्षा योग्य काळ असू शकत नाही. मला ठाम विश्वास आहे की, गोपाळ आणि शाश्वत हे दोघे भविष्यातही कंपनीच्या प्रगतीचा आणि यशाचा वेग कायम ठेवतील. मी दोघांनाही नवीन जबाबदा-यांसाठी मनापासून शुभेच्छा देतो.’’

मित्तल यांनी कंपनीच्या भविष्याची वाटचाल सुयोग्य दिशेने सुरु असल्याचेही सूतोवाच दिले. ‘‘कंपनीत अत्यंत उत्साही, कुशल आणि व्यावसायिक व्यवस्थापकीय संघ कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही नावीन्यपूर्ण उद्योजकीय कौशल्याच्या जोरावर जगभरातील कोट्यावधी ग्राहकांना सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि जागतिक दर्ज्याच्या सेवा पुरवत आहोत. मी गोपाळ तसेच संपूर्ण टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दूरसंचार कंपनी उभारण्याच्या आमच्या महत्त्वकांक्षेकडे वाटचाल करताना आम्ही हीच गुणवत्ता, सातत्या आणि नवकल्पनांची परंपरा पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे. ’’,असा निर्धार मित्तल यांनी व्यक्त केला.

Web Title: Bharti airtel new ceo shashwat sharma vice president gopal vittal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • airtel
  • Airtel news
  • Business News

संबंधित बातम्या

Airtel India चे एमडी आणि सीईओ म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार
1

Airtel India चे एमडी आणि सीईओ म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार

AI Economic Growth: लहान उद्योगांसाठी मोठी संधी! AI मुळे MSME क्षेत्रात 500 अब्जची संधी
2

AI Economic Growth: लहान उद्योगांसाठी मोठी संधी! AI मुळे MSME क्षेत्रात 500 अब्जची संधी

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय
3

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

CMA President Parth Jindal: सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या धुरा आता तरुण पिढीच्या हाती! पार्थ जिंदाल यांची अध्यक्षपदी निवड
4

CMA President Parth Jindal: सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या धुरा आता तरुण पिढीच्या हाती! पार्थ जिंदाल यांची अध्यक्षपदी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.