
Airtel Recharge Plan: एकाच रिचार्जमध्ये चालणार, कंपनी घेऊन 11 बेनिफिट्सवाला जबरदस्त प्लॅन! जाणून घ्या किंमत
कंपनीने लाँच केलेल्या या फॅमिली प्लॅनची किंमत 699 रुपये आहे. याव्यतिरिक्त GST चार्ज देखील आकारला जाईल. हा एक मंथली पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दोन सिम कार्ड्सचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटूंबातील दोन मेंबर्सना या प्लॅनमध्ये जोडू शकता. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर कंपनी हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगची सुविधा देते. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीच्या या फॅमिली प्लॅनमध्ये यूजर्सना 105GB मंथली डेटा मिळणार आहे. ज्यामध्ये 75GB प्रायमरी सिमसाठी आणि 30GB सेकेंडरी सिमसाठी दिले जाणार आहे. या प्लॅनसोबत कंपनी काही जास्तीचे फायदे देखील ऑफर करत आहे. यूजर्सना या प्लॅनमध्ये सहा महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राईमचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. यासोबतच यामध्ये जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन 1 वर्षांसाठी ऑफर केले जाते. फॅमिली प्लॅन अंतर्गत, एयरटेल त्यांच्या यूजर्सना 100GB गूगल क्लाउड स्टोरेज ऑफर करत आहे. यासोबतच यूजर्सना एका वर्षासाठी अॅडोब एक्सप्रेस आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाणार आहे. एअरटेल आपल्या सर्व यूजरना फ्रॉड डिटेक्शन आणि स्पॅम प्रोटेक्शन ऑफर करते. त्यामुळे, एअरटेलच्या 36 करोड यूजर्सना या योजनेचे महत्त्वपूर्ण फायदे मिळतील.
एकाच रिचार्ज प्लॅनमध्ये चालणार दोन सिम कार्ड, त्यामुळे यूजर्सना वेगवेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही. संपूर्ण देशात अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाणार आहे. यामध्ये फ्री नॅशनल रोमिंग आणि डेली 100 फ्री एसएमएस मिळणार आहे. 75GB प्राइमरी सिम आणि 30GB सेकेंडरी सिम असा एकूण 105GB डेटा मिळणार आहे. अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन (6 महिने), गुगल वन (100GB क्लाउड स्टोरेज), जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन (1 वर्ष), एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम सबस्क्रिप्शन, अॅडोब एक्सप्रेस प्रीमियम (12 महिने) सारखे फायदे यूजर्सना मिळणार आहेत.