
भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? (Photo Credit- X)
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी सलग नववा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित करतील. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी विविध काळात सादर केलेल्या १० अर्थसंकल्पांच्या विक्रमाशी निर्मला सीतारमण बरोबरी करतील. देसाई यांनी १९५९-१९६४ दरम्यान अर्थमंत्री म्हणून एकूण सहा आणि १९६७-१९६९ दरम्यान चार अर्थसंकल्प सादर केले. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात अनुक्रमे नऊ आणि आठ अर्थसंकल्प सादर केले. महत्त्वाचे म्हणजे, २०१९ मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीतारमण यांना भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्त केले. त्यानंतर, २०२४ मध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. आतापर्यंत, सीतारमण यांनी फेब्रुवारी २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पासह एकूण आठ सलग अर्थसंकल्प सादर केले आहेत.
भारतात अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी ‘हलवा सेरेमनी’ची परंपरा आहे. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही गोड मेजवानी असते. या कार्यक्रमानंतर बजेट छपाईच्या कामाला वेग येतो आणि कमालीची गोपनीयता पाळली जाते. यावेळेसच्या समारंभात अर्थमंत्र्यांसह अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव उपस्थित होते. तसेच, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांचे सचिव आणि अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेले इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतात १ फेब्रुवारीला बजेट मांडले जाते, तर मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये अर्थसंकल्प जून महिन्याच्या सुरुवातीला सादर केला जातो. कारण, भारतात आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असते, तर पाकिस्तानमध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात १ जुलै पासून होते. पाकिस्तानमध्ये बजेटची कोणतीही एक निश्चित तारीख नसते. तिथे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर नॅशनल असेंब्लीमध्ये (संसद) अर्थसंकल्प सादर केला जातो.
तसेच माहितीनुसार पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बजेट सत्राचा दिवस ठरवण्याचा अधिकार तिथल्या ‘स्पिकर’ला असतो. तिथे कोणत्याही सदस्याला प्रस्तावित रक्कम कमी करण्यासाठी प्रस्ताव मांडण्याचा अधिकार आहे. अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा आणि मतदानानंतर तिथे बजेट मंजूर केले जाते.
जर तुम्हाला माहिती नसेल, तर भारताचे बजेट पाकिस्तानपेक्षा आठ पट मोठे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४-२५ साठी भारताचे बजेट ₹४७.६५ लाख कोटी आहे, जे पाकिस्तानच्या ₹५.६५ लाख कोटी बजेटपेक्षा जवळजवळ आठ पट जास्त आहे. एकट्या भारतासाठी, कर्ज वगळता एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च अनुक्रमे ₹३४.९६ लाख कोटी आणि ₹५०.६५ लाख कोटी असल्याचा अंदाज आहे.
Budget 2026 : सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे दिग्गज कोण? सीतारामन यांच्या नावे नवा विक्रम