Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Update: कोट्यवधी यूजर्सना झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर

भारती एअरटेलने फ्री perplexity Pro प्लॅनची ऑफर आता हटवली आहे. त्यामुळे आता यूजर्स ही ऑफर क्लेम करू शकणार नाहीत. ज्या यूजर्सनी आधीच ऑफर क्लेम केली आहे, ते या सर्विसचा फायदा घेऊ शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 02, 2026 | 11:43 AM
Airtel Update: कोट्यवधी यूजर्सना झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी 'ही' खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Airtel Update: कोट्यवधी यूजर्सना झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी 'ही' खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • भारती एअरटेलने एक मोठी घोषणा केली
  • यूजर्सना मोफत मिळणार एक खास बेनेफिट बंद
  • फ्री perplexity Pro प्लॅनची किंमत 17000 रुपये
देशातील दुसरी मोठी आणि आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या या घोषणेमुळे सर्व यूजर्स हैराण झाले आहेत. कंपनीने यूजर्सना मोफत मिळणार एक खास बेनेफिट आता बंद केला आहे. कंपनीने अधिकृतपणे अशी घोषणा केली आहे की, आता यूजर्सना Perplexity Pro चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार नाही. टेलिकॉम कंपनी एअरटेलने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व युजर्स नाराज झाले आहेत.

माणसांना नो एंट्री? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Moltbook चर्चेत! फक्त AI Agents तयार करू शकतात अकाऊंट

कंपनीने जेव्हा या ऑफरची घोषणा केली होती तेव्हा सुरुवातीच्या अटी जाहीर करताना कंपनीने सांगितले होते की, ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे आणि ही दीर्घकाळ चालणारी मोफत ऑफर नाही. त्यामुळे युजर्सना या ऑफरचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे. मात्र आता कंपनीने ही मोफत ऑफर हटवली असून यामुळे युजर्सना मोठा धक्का बसला आहे. या फ्री perplexity Pro प्लॅनची किंमत 17000 रुपये होती. मात्र टेलिकॉम कंपनी एअरटेल ही सुविधा त्यांच्या युजर्सना मोफत उपलब्ध करून देत होती ही ऑफ मर्यादित काळासाठी उपलब्ध असल्याने आता कंपनीने हा प्लॅन बंद केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एअरटेलने बंद केली perplexity Pro

एअरटेलने perplexity Pro ऑफर 2025 मध्ये लाँच केली होती. ही एक तात्पुरती ऑफर होती. जेव्हा ऑफर लाँच करण्यात आली होती त्यावेळी कंपनीने स्पष्टपणे या ऑफरमधील अटी आणि शर्ती जाहीर केल्या होत्या. ही ऑफर 16 जानेवारी 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे, असं कंपनीने स्पष्टपणे सांगितलं होतं. कंपनीने घोषणा केल्याप्रमाणे Perplexity Pro ऑफर आता प्रीपेड प्लॅनमधून ही ऑफर हटवण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी आणि यूजर्सनी Perplexity Pro प्लॅन क्लेम केला आहे आणि तो वापरत आहेत ते भविष्यात देखील ते वापरू शकतात. मात्र ज्यांनी ही संधी गमावली, त्यांचा मात्र आता तोटा होणार आहे.

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

ज्या यूजर्सना कालावधी संपण्यापूर्वी Perplexity Pro प्लॅन रिडीम केला आहे, ते यूजर्स पूर्वीप्रमाणेच या सर्विसेजचा आनंद घेऊ शकणार आहेत. हा प्लॅन सक्रिय झाल्यानंतर एक वर्षापर्यंत त्यांना हा अ‍ॅक्सेस मिळू शकेल. तथापि, आता ही ऑफर नवीन ग्राहकांसाठी नाही आणि ज्यांनी आधी ती रिडीम केलेली नाही त्यांच्यासाठी देखील नाही. खरं तर या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 17,000 रुपये आहे आणि हे एयरटेलचे सर्वात महागडे डिजिटल एड-ऑन्सपैकी एक आहे.

Perplexity Pro यूजर्सना बिलिंग नोटिस

Perplexity Pro यूजर्सना आता हा प्लॅन अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी बिलिंग सूचना भरावी लागणार आहे. जर फ्री ट्रायल कालावधी संपल्यानंतर सब्सक्रिप्शन रद्द झाले नाही, तर प्लॅन शुल्क आकारून आपोआप रिन्यू होईल. ज्या ग्राहकांना या सुविधेवर पैसे खर्च करायचे नाहीत त्यांनी ही सेवा वेळीच काळजीपूर्वक रद्द करावी.

Web Title: Airtel closed this free service users are shocked after company decision tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.