

PM Kisan Yojana 24th Installment : देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २३ वा हप्ता वितरित झाल्यानंतर, शेतकरी आता २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ताज्या माहितीनुसार, सरकार दरवर्षीप्रमाणे पुढील हप्ता ठरलेल्या वेळेत वितरित करणार आहे. पण या योजनेचा लाभ ठरावीक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. नेमके कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील सविस्तर जाणून घेऊयात.
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ₹६,००० दिले जातात, म्हणजेच दर चार महिन्यांनी ₹२,००० थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात.
पीएम किसान योजनेचा लाभ केवळ त्या शेतकऱ्यांनाच मिळतो जे सरकारने ठरवलेले निकष पूर्ण करतात.
तुम्ही ही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास, 24 व्या हफ्त्यास विलंब होऊ शकतो:
पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होतो. केवळ 23 व्या हप्त्यात 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे या सरकारी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होऊन शेतकऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या संकटातून त्यांची सुटका व्हावी यासाठीच ही कल्याणकारी योजना राबवण्यात येते.