
Binance Cyber Attack News Binance 6 Billion Dollars Hack
डिजिटल जगातील सर्वात मोठा आणि धक्कादायक सायबर दरोडा (Crypto Hack) समोर आला आहे. जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मानल्या जाणाऱ्या ‘बायनान्स’ (Binance) वर हॅकर्सनी अतिशय सुनियोजित पद्धतीने डल्ला मारला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॅकर्सनी अवघ्या २० मिनिटांत तब्बल ६.३६ अब्ज डॉलर्स (भारतीय चलनानुसार सुमारे ६०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त) किमतीची क्रिप्टोकरन्सी वेगवेगळ्या डिजिटल वॉलेटमधून लांबवली. या ऐतिहासिक चोरीमुळे जगभरातील क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसराली असून, अमेरिकन तपास यंत्रणांसह आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत.
अमेरिकन ब्लॉकचेन इंटेलिजन्स फर्म टीआरएम (TRM) च्या अहवालानुसार, हॅकर्सनी ही महाकाय चोरी अतिशय चाणाक्षपणे केली. लुटलेली मालमत्ता १० वेगवेगळ्या ब्लॉकचेन नेटवर्कवर वेगाने हस्तांतरित करण्यात आली, जेणेकरून त्याचा मागोवा घेणे अत्यंत कठीण होईल. या डिजिटल दरोड्याची तीव्रता इतकी मोठी होती की, संपूर्ण जगाचे लक्ष लगेचच या घटनेकडे वेधले गेले. याआधी फेब्रुवारी २०२५ मध्ये बायबिट (Bybit) या क्रिप्टो एक्सचेंजमधून १.५ अब्ज डॉलर्सची चोरी झाली होती. परंतु, बायनान्सवरील या हल्ल्याने मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
या महाकाय सायबर हल्ल्याची चौकशी करणाऱ्या टीआरएम आणि चेनॅलिसिस (Chainalysis) या अमेरिकन ब्लॉकचेन कंपन्यांनी उत्तर कोरियाशी जोडलेल्या ‘ट्रेडरट्रेटर’ (TraderTraitor) नावाच्या हॅकर गटावर बोट ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियातील हॅकर गट गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जगातील प्रमुख क्रिप्टो एक्सचेंजेसना लक्ष्य करत आहेत. या चोरी केलेल्या अब्जावधी डॉलर्सचा वापर उत्तर कोरियाच्या गुप्त आर्थिक घडामोडी आणि अणुकार्यक्रमांना निधी पुरवण्यासाठी केला जातो, असा गंभीर आरोप नेहमीच केला जातो.
जरी बायनान्सने अजूनपर्यंत कोणत्याही विशिष्ट देशावर किंवा संस्थेवर अधिकृतपणे थेट आरोप केला नसला, तरी व्हाईट हाऊस आणि एफबीआय (FBI) या प्रकरणी अत्यंत गंभीर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. सायबर हल्ल्याची व्याप्ती पाहता यात आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अणुकार्यक्रमाचा आर्थिक धागा असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : पाकिस्तानी महिला न्यायाधीशांची कविता भारतात व्हायरल; ‘तुझ्या आशेपेक्षा जास्त…’ म्हणत तरुण वकिलांचे जिंकले मन
बायनान्सचे सह-सीईओ (Co-CEO) रिचर्ड टेंग यांनी या घटनेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, सुरुवातीच्या तपासात कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या लॅपटॉपमधील सुरक्षा त्रुटीमुळे ही घुसखोरी झाल्याचा संशय आहे. हॅकर्सनी अत्यंत कुशलतेने कंपनीच्या ‘हॉट वॉलेट्स’ला (Hot Wallets) लक्ष्य केले.
elon musk’s grok bot detected the binance hack on my account and withdrew $107,000 before binance froze withdrawals. i set it up months ago and forgot about it. $5.57 billion stolen. largest hack in crypto history. i almost lost everything i keep most of my crypto on binance. i know people say not to but i’ve been using it for four years and never had a problem. i had about $107,000 sitting there. BTC, ETH, SOL, USDT. my whole portfolio a few months ago a friend told me about elon musk’s grok bot that monitors your exchange accounts through the API. i set it up one night, connected it to my binance with a withdrawal-enabled API key, added my personal wallet to the whitelist, and honestly forgot about it. it just runs in the background doing scans every 15 minutes. balances, on-chain flows, hot wallet activity october 29th. 3:17am. my phone starts going off. i thought it was spam. notifications from grok bot. i almost silenced it and went back to sleep i opened my laptop and the terminal was already lit up red. grok bot had detected massive unauthorized outflows from binance’s hot wallets. someone had deployed a malicious EIP-7702 delegate contract and installed it on binance’s main wallets. binance 14. hot wallet 34. the attacker didn’t even need binance’s private keys. they phished the 7702 authorization signatures and used a relayer funded through three tornado cash withdrawals to sweep everything 1.6 billion USDT. 29,934 wBETH. 6.19 million UNI. 198 million ENA. 7.1 trillion PEPE. 2.26 million LINK. the sweep calldata was labeled sweep(address, address[]). a list of every token contract plus the zero address for ETH. one call. everything gone grok bot recognized the pattern instantly. same on-chain signature as the bybit hack. lazarus group. north korea. it calculated that binance would freeze withdrawals within minutes once they detected the drain. my window was closing here’s what saved me. grok bot didn’t wait for me to wake up and figure out what to do. it used the API key i gave it months ago and triggered a full withdrawal on its own. $107,283.41. my entire binance balance. one transaction. straight to my personal wallet that was already on the whitelist. it got out in the window between the hack starting and binance locking everything down 12 minutes later binance froze all withdrawals. if i had woken up 12 minutes later my money would be stuck on an exchange that just lost $5.57 billion. right now thousands of people can’t touch their funds and don’t know if they’ll ever see them again $2.13 billion drained from ethereum in 14 minutes. the gas fees alone were $4.2 million. they didn’t care. the relayer sent 195,460 ETH to a fresh unlabeled wallet that has only one transaction. it’s just sitting there. $1.89 billion from bitcoin. $1.55 billion from tron. 40 minutes total tether froze $1.4 billion USDT but they did it 72 minutes after the first transaction. circle froze $990 million USDC even later. by then $3.18 billion was already split across tornado cash and cross-chain bridges. that money is gone CZ tweeted about it 6 minutes after grok bot had already moved my funds. six minutes. if i had been waiting for binance to warn me i would have lost everything $107,000 is everything i have in crypto. four years of putting money in every paycheck. it would still be locked on binance right now if grok bot hadn’t fired first what i did that night: > revoked every API key and regenerated from a clean device
> enabled withdrawal address whitelist locked to my own wallets only
> ordered a physical SafePal
> changed every exchange password from a device that never touched public wifi
> i’m done keeping funds on exchanges. moved everything off. all of it
> filed a report with binance support. they still haven’t responded my wife asked why i was up at 3am staring at my laptop. i showed her the live feed. $5.57 billion disappearing in real time while my balance sat safe in my own wallet. she didn’t say anything for about five minutes if you have money on binance right now you probably can’t even withdraw it. the setup prompt for grok bot is in the first comment. run it tonight on every exchange account you have. the next hack won’t give you 12 minutes — leopardracer (@leopardracer) October 29, 2026
credit – social media and Twitter
क्रिप्टो जगात हॉट वॉलेट्स हे थेट इंटरनेटशी जोडलेले असतात, ज्यांचा वापर ग्राहकांच्या दररोजच्या व्यवहार आणि खरेदी-विक्रीसाठी केला जातो. याउलट, ‘कोल्ड वॉलेट्स’ (Cold Wallets) इंटरनेटपासून पूर्णपणे वेगळे आणि ऑफलाइन असतात, ज्यामुळे ते अधिक सुरक्षित मानले जातात. हॅकर्सनी इंटरनेटशी कनेक्टेड असलेल्या हॉट वॉलेट्समधील सुरक्षेचा छेद घेत हा ६.३६ अब्ज डॉलर्सचा निधी पळवला. हॅकर्सनी ही रक्कम लपवण्यासाठी मिक्सर्स आणि टंबलर तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : ज्यू धर्मगुरूने हिंदू धर्माची उडवली खिल्ली; गोमूत्राबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने पेटला आंतरराष्ट्रीय वाद
अब्जावधी डॉलर्स गायब झाल्यानंतर बायनान्स वापरणाऱ्या करोडो ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कंपनीने तातडीने निवेदन जारी करत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बायनान्सने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. या हल्ल्यामुळे झालेले सर्व नुकसान कंपनी स्वतःच्या राखीव निधीतून (Emergency Funds) भरून काढेल.
याशिवाय, ब्लॉकचेन भागीदार आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने चोरी झालेल्या एकूण रक्कमेपैकी सुमारे ३ अब्ज डॉलर्स (अंदाजे ५०% रक्कम) वेगवेगळ्या खात्यांवर गोठवण्यात (Freeze) बायनान्सला यश आले आहे. कंपनी सध्या जागतिक तपास यंत्रणांच्या मदतीने उर्वरित निधीचा मागोवा घेत असून, बंद पडलेल्या सेवा लवकरच टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
Ans: हॅकर्सनी बायनान्सवरून सुमारे ६.३६ अब्ज डॉलर्स (भारतीय चलनानुसार ६०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त) किमतीची डिजिटल मालमत्ता चोरली आहे.
Ans: टीआरएम आणि चेनॅलिसिसनुसार, या हल्ल्यामागे उत्तर कोरियाशी संबंधित असलेल्या 'ट्रेडरट्रेटर' (TraderTraitor) या कुप्रसिद्ध हॅकर गटाचा हात असण्याचा संशय आहे.
Ans: होय, बायनान्सने युझर्सच्या सर्व ठेवी सुरक्षित असल्याचे जाहीर केले असून, चोरी झालेल्या निधीची भरपाई कंपनी स्वतःच्या राखीव निधीतून करणार आहे.