Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

Mumbai News : युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टरच्या अध्यक्षपदी प्रवीण दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली. नवउद्योजकांना प्रशिक्षण, आर्थिक मार्गदर्शन, बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्यासह महिला आणि तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 30, 2026 | 09:36 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन
  • बँका आणि शासकीय योजनांशी जोडणार
  • महिला आणि तरुण उद्योजकांसाठी विशेष प्रयत्न
Mumbai News : उद्योजकता विकासाला चालना देण्यासह नव्या व्यावसायिकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संस्थेच्या मुंबई चॅप्टरच्या अध्यक्षपदी प्रवीण दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा जगताप यांच्या हस्ते दाभाडे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

या बैठकीला उद्योग, व्यापार, कृषी आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्तीनंतर प्रवीण दाभाडे यांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा जगताप, संचालक मंडळ आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. संस्थेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

मुंबईसारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणणे हे मुंबई चॅप्टरचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. विशेषतः नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना तसेच लघु आणि मध्यम उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

व्यवसाय सुरू करण्यापासून त्याचा विस्तार करण्यापर्यंत आवश्यक असलेले कौशल्य, बाजारपेठेची माहिती, व्यवसाय व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळा, उद्योजकता विकास कार्यक्रम आणि व्यावसायिक संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Ashokkumar Rankhamb: मुंबई-ठाणे कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर; वसई-विरार परिवहन समितीच्या सभापतीपदी रणखांब विराजमान

बँका आणि शासकीय योजनांशी जोडणार

नवीन उद्योजकांना आर्थिक अडचणींवर मात करता यावी, यासाठी बँका, वित्तीय संस्था आणि शासकीय योजनांमधील उपलब्ध आर्थिक सहाय्याच्या संधींपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय उद्योग आणि कृषी क्षेत्रातील उद्योजकांमध्ये समन्वय वाढविणे, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यावर भर राहणार आहे.

Prabhu Yeshu Janmotsav 2026: गिरगाव चौपाटीवरील ‘प्रभू येशू जन्मोत्सव २०२६’ कार्यक्रम वादात; आयोजकांना कायदेशीर नोटीस

महिला आणि तरुण उद्योजकांसाठी विशेष प्रयत्न

महिला आणि तरुण उद्योजकांना व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून सक्षम व्यावसायिक परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. मुंबईतील उद्योजकांना केवळ व्यासपीठ उपलब्ध करून न देता त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी प्रत्यक्ष सहकार्य आणि नवीन संधी निर्माण करण्यावर भर देणार असल्याची भूमिका प्रवीण दाभाडे यांनी व्यक्त केली.

Web Title: Pravin dabhade appointed mumbai chapter president commerce agriculture cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

ABVP Mumbai : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभाविप आक्रमक; प्रशासनाला ११ दिवसांचा अल्टिमेटम!
1

ABVP Mumbai : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभाविप आक्रमक; प्रशासनाला ११ दिवसांचा अल्टिमेटम!

US News : ट्रम्प यांचा डेमोक्रॅट्सना इशारा;मध्यावधी निवडणुका जिंकल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल ?
2

US News : ट्रम्प यांचा डेमोक्रॅट्सना इशारा;मध्यावधी निवडणुका जिंकल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल ?

Iran News : होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांवर नवा हल्ला; लिम्पेट माईन्सचा वापर; छोट्या स्पीडबोट्समुळे समुद्रात दहशत
3

Iran News : होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांवर नवा हल्ला; लिम्पेट माईन्सचा वापर; छोट्या स्पीडबोट्समुळे समुद्रात दहशत

Vatican News :पोप लिओ चौदावेंचा ऐतिहासिक विक्रम :अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मतदान करणारे पहिले पोप ठरले
4

Vatican News :पोप लिओ चौदावेंचा ऐतिहासिक विक्रम :अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मतदान करणारे पहिले पोप ठरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.