Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SEBI Mutual Fund Rules 2026: Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून SEBI चा नवा नियम लागू

SEBI Mutual Fund Rules 2026: SEBI च्या नव्या नियमांनुसार, 1 नोव्हेंबर 2026 पासून म्युच्युअल फंड कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲपवर Direct Plan हा मुख्य किंवा डीफॉल्ट पर्याय म्हणून दाखवण्याची तरतूद असल्याचे नमूद केले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 29, 2026 | 03:40 PM
SEBI Mutual Fund Rules 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

SEBI Mutual Fund Rules 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SEBI चा म्युच्युअल फंडाबाबत नवा नियम
  • 1 नोव्हेंबरपासून Direct Plan पहिला पर्याय
  • कमी खर्चामुळे दीर्घकाळात फायदा होण्याची शक्यता

SEBI Mutual Fund Rules: तुम्ही पण म्युच्युअल फंडात पैसे गुंतवता का? मग ही बातमी तुमच्याच कामाची आहे. शेअर बाजारावर आणि SEBI लक्ष ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर नक्कीच होईल. SEBI Mutual Fund Rules 2026:

काय आहे SEBI चा नवीन नियम?

आतापर्यंत आपण जेव्हा ऑनलाईन म्युच्युअल फंड घेतो, तेव्हा अनेक वेळा आपल्याला दोन पर्याय दिसतात – डायरेक्ट आणि रेग्युलर. पण बऱ्याचदा अॅपवर रेग्युलर हा पर्याय आधीच निवडलेला असतो. त्यामुळे नवीन गुंतवणूकदार नकळत तोच पर्याय घेतात आणि त्यांचे थोडे पैसे जास्त कट होतात.

आता SEBI ने सांगितले आहे की, 1 नोव्हेंबर 2026 पासून हे चित्र बदलणार आहे. AMC कंपन्यांना आपला प्लॅन सरळ मोबाईल आणि वेबसाईटवरुन ग्राहकांपर्यंत पोहचवणार आहे.

आपल्या वेबसाईटवर आणि मोबाईल अॅपवरद्वारे डायरेक्ट प्लॅन हा मुख्य पर्याय म्हणून दाखवावा लागेल. म्हणजेच डीफॉल्ट म्हणून डायरेक्ट प्लॅनच दिसेल.

डायरेक्ट आणि रेग्युलर मध्ये फरक काय असतो?

हा प्रश्न अनेकांना पडतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दोन्हीमध्ये एकच फंड असतो, एकच फंड मॅनेजर असतो, पैसे पण एकाच ठिकाणी गुंतवले जातात. फरक फक्त कमिशनचाआहे.

रेग्युलर प्लॅन – तुम्ही हा प्लॅन एखाद्या एजंट करुन घेतला. त्यामुळे त्या एजंटला कंपनीकडून कमिशन द्यावे लागते. ते कमिशन तुमच्याच पैशातून जाते.डायरेक्ट प्लॅन – यात मध्ये कोणीही एजंट नसतो. तुम्ही थेट कंपनीकडून फंड घेता. त्यामुळे मध्ये कोणालाही कमिशन द्यावे लागत नाही. त्यामुळे तुमचा खर्च आपोआप कमी होतो.

तुमचा फायदा कसा होणार?

प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी दरवर्षी किमान खर्च घेते त्याला एक्सपेंस रेशो म्हणतात. रेग्युलर प्लॅनमध्ये कमिशन असल्यामुळे हा खर्च जास्त असतो. समजा 1.5% ते 2% पर्यंत.पण डायरेक्ट प्लॅनमध्ये हा खर्च खूप कमी असतो, फक्त 0.8% ते 1% पर्यंत. 1% असा काय फरक पडले असा आपल्याला वाटते. पण हाच 1% दीर्घ काळात खूप मोठा होतो.

समजा तुम्ही 10 वर्षांसाठी 10 लाख गुंतवले, तर डायरेक्ट प्लॅनमुळे तुम्हाला रेग्युलरच्या तुलनेत 1 ते 2 लाख रुपये जास्त मिळू शकतात. कारण कमी खर्चामुळे तुमचा परतावा वाढतो आणि चक्रवाढ व्याजाचा तुम्हाला जास्त फायदा मिळतो.

1 नोव्हेंबरपासून काय बदलणार?

सर्व मोठ्या कंपन्यांच्या अॅपवर जसे की SBI Mutual Fund, HDFC, ICICI, Nippon यांच्या अधिकृत अॅपवर आता डायरेक्ट प्लॅन हा पहिला पर्याय असेल.

Amazon layoffs 2026: सकाळी ईमेल पाहिला, अन् नोकरी गेली…; Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात, 250 कर्मचाऱ्यांना फटका

जर कोणाच्या सल्ल्याने रेग्युलर प्लॅन खरेदी करायचा असेल तर तो जाणीवपूर्वक निवडावा लागेल. यामुळे पारदर्शकता येईल. तसेच बाकींच्या गुंतवणूकदारांना समजेल की, आपण कोणत्या प्लॅनमध्ये पैसे टाकतोय आणि त्यासाठी किती खर्च येतोय.

हा नियम फक्त कंपन्यांच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मसाठी आहे. इतर थर्ड पार्टी अॅप्सवर काय होणार याबद्दल अजून माहिती येणे बाकी आहे.एकंदरीत, SEBI चा हा निर्णय सामान्य गुंतवणूकदाराच्या फायद्याचा आहे. तुमचे पैसे वाचवणारा आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन गुंतवणूक करणार असाल तर 1 नोव्हेंबरनंतर डायरेक्ट प्लॅनचा नक्की विचार करा, तुमचाच फायदा होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: SEBI चा म्युच्युअल फंडाबाबत नवा नियम कधी लागू होणार आहे?

    Ans: हा नियम 1 नोव्हेंबर 2026 पासून लागू होणार आहे.

  • Que: Direct Mutual Fund Plan म्हणजे काय?

    Ans: Direct Plan मध्ये गुंतवणूकदार थेट म्युच्युअल फंड कंपनीकडून गुंतवणूक करतो. यात वितरकाचे कमिशन समाविष्ट नसते.

  • Que: नवीन नियमामुळे Regular Plan बंद होणार आहे का?

    Ans: Regular Plan बंद होणार नसून गुंतवणूकदारांना तो जाणीवपूर्वक निवडता येईल.

Web Title: Sebi mutual fund rules 2026 direct plan default option rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Business News
  • Mutual Fund
  • SBI

संबंधित बातम्या

Google Pay, PhonePe वापरणाऱ्या SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! UPI सेवा ‘या’ दिवशी राहणार बंद?
1

Google Pay, PhonePe वापरणाऱ्या SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! UPI सेवा ‘या’ दिवशी राहणार बंद?

Reliance Industries Results: तिमाही निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार; लाभांश मिळणार का?
2

Reliance Industries Results: तिमाही निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार; लाभांश मिळणार का?

DA Hike: वाढून येणार पगार, SIP-PPF-FD उत्तम परताव्यासाठी कशात करावी गुंतवणूक?
3

DA Hike: वाढून येणार पगार, SIP-PPF-FD उत्तम परताव्यासाठी कशात करावी गुंतवणूक?

SBI Life Insurance ची दमदार कामगिरी! 20259 कोटींच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंद; नफ्यातही मोठी वाढ
4

SBI Life Insurance ची दमदार कामगिरी! 20259 कोटींच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंद; नफ्यातही मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.