
BMW India Record Sales: BMW Group India ची विक्रमी वार्षिक कामगिरी; 18,001 कार विक्रीसह 14% वाढ
BMW India Record Sales: सातत्यासह उच्च प्रगतीशील गतिमान व्यवसायिक वातावरणामध्ये, BMW Group India ने पुन्हा एकदा सर्वोत्तम वार्षिक कार विक्रीची नोंद प्रस्थापित केली. कंपनीद्वारे 2025 चा वर्षामध्ये 18,001 कार्सची विक्री केली गेली, ज्यामुळे एका वर्षातील विक्रीची तुलना केल्यास यावर्षी सर्वोत्तम अशी 14% वाढ झाली. BMW चे 17,271 युनिट्स आणि MINI चे 730 युनिट्स मिळून विकले गेले आहे. BMW Motorrad ने देखील 5,841 मोटरसायकलची विक्री केली आहे.
भारतीय ग्राहकांमध्ये भक्कम अशी मुलभूत तत्वं आणि उच्च ब्रॅन्ड प्रशांसा मिळवत, BMW Group India ने सातत्याने गेली चार वर्ष सर्वोत्तम विक्रीचे प्रदर्शन केले आहे. 2025 मध्ये, तर प्रत्येक महिन्यात आणि त्रैमासिकात सर्वोत्तम विक्रीची नोंद झाली, ज्यामध्ये त्रैमासिकातील वाढ तर भारतातील सरासरी लक्झरी विभागातील त्रैमासिकातील सर्वोत्तम वाढी पेक्षा जास्त ठरली. ऑक्टोबर-डिसेंबर या काळात कारची विक्री ही एकूणच उच्चस्तरीय राहिली, वार्षिक विक्रीचा तुलनात्मक अभ्यास केला तर लक्षात येते 6,023 युनिट्सचा विक्रीसह 17% वाढ झालेली आहे.
BMW Group India चे अध्यक्ष आणि सीईओ, श्री. हरदिप सिंग ब्रार यावेळी बोलताना म्हणाले, “2025 हे BMW Group India साठी रेकॉर्ड-ब्रेक वर्ष ठरले आहे कारण आज पर्यंतची सर्वाधिक विक्री या वर्षात झालेली आहे. आपण कार विक्रीमध्ये 18,000 युनिट्सचा आकडा पार केला आहे आणि आपण लक्झरी विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 14% विकसित होतो आहोत, याचाच अर्थ असा की आपल्या मौल्यवान असलेल्या ग्राहकांना आपला ब्रॅन्ड महत्वाकांशी असल्याचे भासते आणि त्यावर त्यांचा विश्वास देखील आहे. सगळ्याच विभागातून विक्रीमध्ये वाढ दिसून येते आहे, मग ते इंटरनल कंबशन इंजिन असो किंवा इलेक्ट्रिक वाहने, एसएव्ही किंवा सेदान असो, वा लॉन्ग व्हील-बेस मॉडेल्स असोत. आपली लक्झरी इलेक्ट्रिक विभागात फ़क्त शाश्वत गतिशील पद्धतीने प्रगती होत नसून या विभागाची भारतातील लक्झरी कार मार्केट मधील संभाव्य मागणी देखील वाढताना दिसून येते आहे. पुढे जात असताना आम्ही – शीअर ड्रायविंग प्लेझर, असमांतर असे ग्राहक केंद्रिकरण आणि मजबूत अशा डिलर नेटवर्कवरती लक्ष केंद्रित करू ज्यामुळे आम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरू आणि ग्राहकांशी संपर्क साधताना प्रत्येक पाऊलावर आम्ही JOY डिलिवर करू.”
BMW Group India ने ॲग्रेसिव प्रोडक्ट ऑफ़ेन्सिव उपक्रम 2025 राबविला, ज्यामध्ये BMW, MINI, आणि BMW Motorrad ब्रॅन्ड्स अंतर्गत 20 नवीन उत्पादने लॉन्च करण्यात आली. या वैविध्यतेने लक्झरी पोर्टफ़ोलियो हा अधिक आकर्षक ठरला ज्यामध्ये नवीन पिढीचे लॉन्च देखील होते जसे की BMW iX1 Long Wheelbase, BMW X3, BMW 2 Series Gran Coupe, MINI JCW Countryman All4 आणि MINI Convertible. मोटरसायकल विभागात तर भक्कम अशा BMW R 1300 GS Adventure आणि हाय पर्फ़ॉर्मन्स BMW S 1000 RR चे सादरीकरण करण्यात आले.
हेही वाचा: एटीएममधून पैसे काढणे महागले; एसबीआय ग्राहकांकडून वसूल करणार अतिरिक्त शुल्क आणि जीएसटी
इलेक्ट्रिक वेहिकल्स (EV)
सस्टेनेबल मोबिलिटी मध्ये अग्रस्थानी राहत, BMW Group India हा 2025 मध्ये देखील सर्वात आवडीचा luxury EV brand ठरला. 3,753 BMW आणि MINI EVs ची डिलिवरी 2025 मध्ये केली गेली, ज्यामुळे वार्षिक विक्रीची तुलना केल्यास वाढ ही 200% होती. BMW आणि MINI EVs ची मागणी ही GST 2.0 नंतर वाढलीच आहे, ज्याचे श्रेय आत्याधुनिक उत्पादन निर्मीती आणि ब्रॅन्डवरील विश्वासाला जाते.
BMW Group India चा भारतातील लक्झरी इलेक्ट्रिक सेग्मेंटमध्ये बाजारातील सर्वात मोठा वाटा आहे. मागचा वर्षाचा 8% वाढीचा विचार केला तर यावर्षी ईव्हीची विक्री ही एकूण विक्रीमध्ये 21%, एवढी खोलवर रुजली. BMW EVs विभागातील दोन्ही ठिकाणी अग्रस्थानी आहे टॉप एन्ड-– BMW i7 – आणि अगदी एन्ट्री लेवल – BMW iX1. iX1 ही फ़क्त कंपनीकरताच सर्वोत्तम खप असलेली इव्ही नसून, भारतातील प्रिमियम ईव्ही विभागत देखील याचा सर्वोत्तम खप झाल्याचे दिसून आले.
BMW Group India ने लक्झरी इलेक्ट्रिक इकोसिस्टीम ची उत्तम निर्मीती करत त्यामध्ये उत्तम उत्पादने, चार्जिंगची सोय आणि खात्रीशीर बाय-बॅक आणि मालकी मिळण्याकरिता आकर्षक किंमत असा एकत्रित धमाका तयार केला आहे. 2025 मध्ये, डेस्टिनेशन चार्जिंग, स्मार्ट ई- रूटिंग, चार्जिंग कॉन्सर्ज, हाय पर्फ़ॉर्मन्स इलेक्ट्रिक कॉरिडोर सह इतर अनेक विविध उपक्रमांच लॉन्चिंग झालं, ज्यामध्ये ग्राहक नेहमीच केंद्रस्थानी होता. या शिवाय BMW आणि MINI ग्राहकांना अग्रगण्य अशा सेवा प्रदान करणाऱ्यांकडून भागीदारीमध्ये 6,000 पेक्षा अधिक चार्जिंग पॉईंट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सगळ्यात मोठ्या EV लाईन अप लक्झरी विभागामध्ये सात कार आणि दोन स्कूटर चा समावेश होतो. BMW i7, BMW iX, BMW i5, BMW i4, BMW iX1 Long Wheelbase, MINI Countryman E, MINI Countryman SE ALL4, BMW CE 04, आणि BMW CE 02.