तिसऱ्या तिमाहीत कंपनीला मिळाला नफा
सोन्याचे दिवस असणाऱ्या BSNL कंपनीचा एक काळ असा आला होता जेव्हा असे म्हटले जायचे की बीएसएनएल आता संपले आहे. ही कंपनी सतत तोट्यात जात होती. तेही, बीएसएनएल १-२ वर्षांपासून नाही तर २००७ पासून तोट्यात चालले होते. याचेही खाजगीकरण केले जाईल अशी अटकळ बांधली जात होती. पण चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीसाठी कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने जवळजवळ १७ वर्षांनंतर नफा नोंदवला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने २६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याला बीएसएनएलसाठी “टर्निंग पॉइंट” म्हटले आणि कंपनीच्या विस्तार आणि सेवा सुधारणांचे हे परिणाम असल्याचे म्हटले. बीएसएनएलने मोबिलिटी, फायबर-टू-द-होम (एफटीटीएच) आणि लीज्ड लाइन सेवांमध्ये १४-१८% वाढ नोंदवली. सिंधिया यांच्या मते, जूनमध्ये कंपनीचा ग्राहकसंख्या ८.४ कोटी होती, जी डिसेंबरमध्ये वाढून ९ कोटी झाली. ते म्हणाले, “बीएसएनएलने १७ वर्षांनंतर तिमाही आधारावर नफा नोंदवला आहे. कंपनीने शेवटचा तिमाही नफा २००७ मध्ये कमावला होता.”
काय बदलले?
बीएसएनएलने त्यांचे आर्थिक खर्च आणि एकूण खर्च कमी केले, ज्यामुळे कंपनीला गेल्या वर्षीच्या तुलनेत १,८०० कोटी रुपयांचा तोटा कमी करण्यास मदत झाली.
Todays Gold Price: सोन्याने गाठला 87 हजारांचा टप्पा, चांदीच्या दरात मोठी वाढ! वाचा आजचे भाव
नवीन सेवा आणि 4G विस्तार
कंपनीने राष्ट्रीय वाय-फाय रोमिंग, BiTV (मोबाइल ग्राहकांसाठी मोफत मनोरंजन) आणि IFTV (FTTH ग्राहकांसाठी नवीन सेवा) सारखी वैशिष्ट्ये लाँच केली आहेत. याशिवाय, खाण क्षेत्रात पहिल्यांदाच खाजगी 5G कनेक्टिव्हिटी देखील सुरू करण्यात आली आहे.
आता पुढे काय?
बीएसएनएलचे वार्षिक उत्पन्न आणखी वाढेल, खर्च नियंत्रित होईल आणि तोटा कमी होईल अशी आशा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली. गेल्या चार वर्षांत, कंपनीचा EBITDA दुप्पट होऊन २,१०० कोटी रुपये झाला आहे. बीएसएनएलसाठी ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे, कारण आता कंपनी त्यांचे ४जी नेटवर्क वाढवण्याच्या आणि त्यांची सेवा सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या अनेक कंपन्यांच्या तुलनेत BSNL ने ही मोठी उसळी मारल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या नफ्यामुळे कंपनीच्या आशा अधिक उंचावल्या असतील हा दिलासा आता सर्वांनाच मिळालाय
एक रुपयात ‘पीक विमा’ बंद होणार का? कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले…