Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील ‘या’ नेत्याने ‘हिंदू विरोधी बजेट’ सादर केल्यानंतर मिळवला पाकिस्तानातील पहिला पंतप्रधान होण्याचा मान

लवकरच भारतीय बजेट सादर होणार आहे. याच पाश्वभूमीवर आज आपण पाकिस्तानातील पहिल्या प्रधानमंत्री आणि त्यांनी सादर केलेल्या 'हिंदू विरोधी बजेट' बद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 13, 2025 | 08:28 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वर्ष 2025-26 चे बजेट 1 फेब्रुवारी 2025 ला सादर होणार आहे. हा बजेट सकाळी 11 वाजता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की भारतात असा बजेट देखील सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये हा बजेट सादर करणारी व्यक्ती नंतर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनले.

खरंतर, आपण १९४६ च्या भारताच्या बजेटबद्दल बोलत आहोत. याला “गरीब माणसाचे बजेट” असे देखील म्हणतात. तथापि, त्या काळातील काही मोठ्या नेत्यांनी आणि उद्योगपतींनीही याला ‘हिंदूविरोधी अर्थसंकल्प’ म्हटले होते. हे बजेट २ फेब्रुवारी १९४६ रोजी लियाकत अली खान यांनी सादर केले होते, जे त्यावेळी अंतरिम सरकारमध्ये अर्थमंत्री होते. या अर्थसंकल्पाचा भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होणार होता आणि त्यामागे अनेक वाद होते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

कोण होते लियाकत अली खान?

लियाकत अली खान हे मुहम्मद अली जिना यांचे जवळचे सहकारी होते आणि नंतर त्यांनी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान मिळवला होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून केली, परंतु नंतर ते मुस्लिम लीगमध्ये सामील झाले. जेव्हा अंतरिम सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांना पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद देण्यात आले. स्वातंत्र्यापूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने त्यांनी सादर केलेले अर्थसंकल्प हा एक ऐतिहासिक क्षण ठरला होता.

मागील 20 वर्षाचा काळ, 6 कुंभमेळे आणि प्रत्येक वेळी भारतीय शेअर बाजारात पडझड, नेमके कनेक्शन काय?

या बजेटच्या खास गोष्टी

लियाकत अली खान यांनी हे बजेट “समाजवादी बजेट” म्हणून सादर केले होते. त्यात अनेक महत्त्वाचे प्रस्ताव होते. उदाहरणार्थ, लियाकत अली खान यांनी व्यापाऱ्यांवर एकूण १ लाख रुपयांच्या नफ्यावर २५ टक्के कर लादण्याचा प्रस्ताव मांडला. याशिवाय, कॉर्पोरेट कर दुप्पट करण्याचाही प्रस्ताव होता. या अर्थसंकल्पात समाजकल्याण योजनांवर भर देण्यात आली.

शिक्षण आणि आरोग्य सेवांसाठी अधिक निधीची तरतूद करावी, असे देखील त्यावेळी खान यांनी सांगितले होते. लियाकत अली खान यांनी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी विविध योजना आणल्या, परंतु उद्योगपतींनी या प्रस्तावांना विरोध केला.

Mahakumbh 2025: 45 दिवसरात्र होणार UP मधला व्यापार तगडा, 5000 रूपयांपासून 2 लाख कोटींपर्यंत भरणार खिसे

बजेटवर सूर झाले होते वादविवाद

लियाकत अली खान यांच्या अर्थसंकल्पाबाबत अनेक वाद झाले. त्यांच्या अर्थसंकल्पाला “हिंदूविरोधी अर्थसंकल्प” म्हटले गेले कारण त्यांच्या प्रस्तावांवर हिंदू व्यावसायिकांना नुकसान पोहोचवण्याचा आरोप होता. अनेक मोठ्या नेत्यांनी आरोप केला की लियाकत अली खान हे जाणूनबुजून हिंदू उद्योगपतींवर कारवाई करत आहेत. या अर्थसंकल्पाविरुद्ध व्यापाऱ्यांनी व्यापक निदर्शने केली. उद्योगपती घनश्याम दास बिर्ला आणि जमनालाल बजाज यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध केला. त्यांच्या मते, हे बजेट भारतीय उद्योगांच्या विकासात अडथळा आणणार होते.

या बजेटवर सुरु झाला होता वादविवाद

लियाकत अली खान यांच्या बजेटबाबत अनेक वाद झाले. त्यांच्या अर्थसंकल्पाला “हिंदू विरोधी बजेट” म्हटले गेले कारण त्यांच्या प्रस्तावांवर हिंदू व्यावसायिकांना नुकसान पोहोचवण्याचा आरोप होता. अनेक मोठ्या नेत्यांनी आरोप केला की लियाकत अली खान हे जाणूनबुजून हिंदू उद्योगपतींवर कारवाई करत आहेत.

या अर्थसंकल्पाविरुद्ध व्यापाऱ्यांनी व्यापक निदर्शने केली. उद्योगपती घनश्याम दास बिर्ला आणि जमनालाल बजाज यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी बजेटचा तीव्र निषेध केला. त्यांच्या मते, हे बजेट भारतीय उद्योगांच्या विकासात अडथळा आणणार होते.

Web Title: Budget 2025 know about liaquat ali khan who presented anti hindu budget who later became first prime minister of pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • pakistan

संबंधित बातम्या

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक
1

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा
2

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर
3

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
4

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.