महाकुंभ मेळाव्यात होणार कोटींचा व्यापार, कसा ते जाणून घ्या
कुंभ संमेलनाबद्दल हिंदू धर्मात खूप श्रद्धा आहे, म्हणूनच प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभाला देश-विदेशातून लाखो लोक येत आहेत. महाकुंभ हा एक धार्मिक कार्यक्रम आहे पण उत्तर प्रदेशला त्यातून मोठा आर्थिक फायदा होणार आहे. एका अहवालानुसार, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चा अंदाज आहे की उत्तर प्रदेशातील ४५ दिवसांच्या महाकुंभाच्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. हे अशा प्रकारे समजू शकते की जर महाकुंभाला ४० कोटी पर्यटक येतात आणि प्रत्येक व्यक्ती सरासरी ५,००० रुपये खर्च करते, तर एकूण आर्थिक परिणाम या आकड्यापर्यंत पोहोचू शकतो.
CAIT ने म्हटले आहे की या आर्थिक भरभराटीत निवास आणि पर्यटन हे सर्वात मोठे योगदान देणारे असतील, स्थानिक हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि तात्पुरत्या निवासस्थानांमधून ₹४०,००० कोटी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. हे उत्पन्न कसे मिळणार याकडे आपण एक नजर टाकूया (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो अहवाल
मिंटच्या अहवालानुसार, CAIT चे सरचिटणीस आणि भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, “महाकुंभात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि व्यावसायिक घडामोडी होतील. यामध्ये हॉटेल्स, गेस्टहाऊस, तात्पुरत्या निवासस्थानावरील खर्च समाविष्ट आहे. याशिवाय, अन्न, धार्मिक वस्तू, आरोग्यसेवा आणि इतर सेवांवरही खर्च होईल.
विशेष म्हणजे अन्नपदार्थांशी संबंधित व्यवसाय २०,००० रुपयांपर्यंत असू शकतो. यामध्ये पॅकेज केलेले अन्न, पाणी, बिस्किटे, ज्यूस आणि जेवणासह इतर अन्न आणि पेये समाविष्ट आहेत. याशिवाय, तेल, दिवे, गंगाजल, मूर्ती, अगरबत्ती आणि धार्मिक पुस्तके यासारख्या धार्मिक वस्तू आणि अर्पणांच्या विक्रीतून २०,००० कोटी रुपये उत्पन्न मिळू शकते. दरम्यान, स्थानिक आणि आंतरराज्यीय सेवा, मालवाहतूक आणि टॅक्सीसह वाहतूक आणि लॉजिस्टिक्सवर ₹१०,००० कोटी खर्च होण्याची अपेक्षा आहे.
किती लोकांचा समावेश
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला ४० कोटींहून अधिक लोक येण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. ही लोकसंख्या अमेरिका आणि रशियाच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. महाकुंभमेळा हा दर १२ वर्षांनी आयोजित होणारा एक प्रमुख धार्मिक कार्यक्रम आहे. महाकुंभ २०२५ हा मेळा या महिन्यात १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे. यातून अधिकाधिक व्यापार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 40 कोटीं लोक येणार आहेत याचा अर्थ त्यांची संपूर्ण व्यवस्था आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च हा सगळा व्यापार असणं साहजिक आहे. याशिवाय कुंभ मेळाव्यातील अनेक गोष्टी ज्या विकत घेतल्या जातात आणि अनेक आठवणी जपल्या जातात त्यांचा व्यापारही नक्कीच होणार आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथे केवळ धार्मिक मेळा रंगणार नाहीये तर हा एक महा व्यापारी मेळावादेखील ठरणार आहे.
Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात हरवेलल्या लोकांना शोधणं आता होईल सोपं! AI ची ही सुविधा करणार मदत