भारतीय तरुणांमध्ये लठ्ठपणा चिंतेचा विषय; आर्थिक सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर!
देशातील तरुणांमध्ये लठ्ठपणा हा एक गंभीर चिंतेचा विषय बनत चालला आहे. असे आज संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. इतकेच नाही तर आज संसदेत 2019-2021 च्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा दाखला देत म्हटले आहे की, भारतातील तरुण किंवा प्रौढांमधील लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट वाढले आहे.
संतुलित आहाराकडे वळणे गरजेचे
जागतिक लठ्ठपणा फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, व्हिएतनाम आणि नामिबियाच्या मुलांमध्ये लठ्ठपणाची वाढ जगात सर्वाधिक आहे. परिणामी, भारताला आपल्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा फायदा घ्यायचा असेल, तर लोकसंख्येच्या आरोग्याचे मापदंड पाळत संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहाराकडे वळणे गरजेचे आहे. ज्यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर संकट; आर्थिक सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर!
‘या’ कारणांमुळे वाढतोय लठ्ठपणा
आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने, एप्रिल 2024 मध्ये भारतीयांसाठीच्या नवीनतम आहारविषयक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतातील एकूण आजारांपैकी 56.4 टक्के आजार हे अस्वास्थ्य खाण्याच्या सवयींना कारणीभूत ठरत आहेत. इतकेच नाही तर आत आर्थिक सर्वेक्षण अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, साखर आणि चरबीयुक्त उच्च प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या वाढत्या वापरामुळे, शारीरिक हालचाली कमी झाली आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या मर्यादिततेमुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आणि जास्त वजन, लठ्ठपणाच्या समस्या वाढत आहे.
शहरी भागात अधिक लठ्ठपणा
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार, 18-69 वयोगटातील लठ्ठपणा अनुभवणाऱ्या पुरुषांची टक्केवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 4 मधील 18.9 टक्क्यांवरून 22.9 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर महिलांसाठी हे प्रमाण 20.6 टक्क्यांवरून 24.0 टक्क्यापर्यंत वाढले आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार, देशातील ल०ठ्ठपणाचे प्रमाण ग्रामीण भारताच्या तुलनेत शहरी भारतात लक्षणीयरीत्या अधिक आहे. काही राज्यांमध्ये वृद्ध लोकांमध्ये देखील लठ्ठपणाची चिंताजनक परिस्थिती आहे. परिणामी, नागरिकांना निरोगी जीवनशैली अंगीकारता यावी, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले जाणे गरजेचे आहे.