Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरवरील उपचाराबाबत अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा; सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात उपचार!

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत देशाचा अर्थसंकलप सादर करत आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी कॅन्सरवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या 3 औषधांची कस्टम ड्युटी अर्थात सीमा-शुल्क कमी होणार आहे. ज्यामुळे आता सर्वसामान्यांना कॅन्सरवर स्वस्तात उपचार मिळवण्यास मोठी मदत होणार आहे. देशातील आरोग्य क्षेत्राबाबत अर्थसंकल्पात ही मोठी घोषणा मानली जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 23, 2024 | 01:02 PM
कॅन्सरवरील उपचाराबाबत अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा; सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात उपचार!

कॅन्सरवरील उपचाराबाबत अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा; सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात उपचार!

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ च्या संपूर्ण अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. प्रामुख्याने कर्करोगाच्या (कॅन्सर) उपचारात वापरल्या जाणाऱ्या 3 औषधांची कस्टम ड्युटी अर्थात सीमा-शुल्क कमी होणार आहे. ज्यामुळे ही औषधे स्वस्तात मिळण्यास मदत होणार आहे.

3 औषधांची कस्टम ड्युटी कमी होणार

मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेची घोषणा केली होती. अशातच आता कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या 3 औषधांची कस्टम ड्युटी कमी झाल्याने, कर्करोगावर उपचार घेण्यासाठी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केलेली ही घोषणा महत्वाची मानली जात आहे.

अर्थमंत्र्यांचे भाषण सुरु होताच शेअर बाजारात उसळी; घसरणीनंतर पुन्हा सावरले शेअर मार्केट!

लाखो रुग्णांना फायदा होणार

यावेळीच्या संपूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरवर स्वस्तात उपचार मिळण्यासाठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या तीन औषधांची कस्टम ड्युटी कमी केली होणार आहे. त्यामुळे या औषधांच्या किमती कमी होतील, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. याचा थेट फायदा लाखो रुग्णांना होणार आहे. याशिवाय एक्स-रे मशीनसह अनेक वैद्यकीय उपकरणांवरही सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या अर्थसंकल्पात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत घोषणा

अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणुकीमुळे अंतरिम अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आला होता. अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस देण्याची घोषणा केली होती. याशिवाय अंतरिम अर्थसंकल्पात देशात गर्भाशयाच्या मुखावरील लसीवरील संशोधनाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. अशातच आता कर्करोगावरील (कॅन्सर) 3 औषधांची कस्टम ड्युटी कमी होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Health budget 2024 customs duty reduced on 3 cancer medicines nirmala sitharaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • Budget 2024
  • Budget Expectations
  • Finance Minister
  • Nirmala Sitharaman
  • Viksit Bharat
  • Viksit Bharat Budget 2024

संबंधित बातम्या

World Cleanup Day 2025 : भारताने ‘स्वच्छता उत्सव’ साजरा करत घेतला प्लास्टिकमुक्तीचा संकल्प
1

World Cleanup Day 2025 : भारताने ‘स्वच्छता उत्सव’ साजरा करत घेतला प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

Old Pension Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! २०२६ पासून जुनी पेन्शन पुनर्संचयित होणार
2

Old Pension Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! २०२६ पासून जुनी पेन्शन पुनर्संचयित होणार

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? CBIC अध्यक्षांनी सांगितले ‘हे’ वास्तव
3

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? CBIC अध्यक्षांनी सांगितले ‘हे’ वास्तव

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral
4

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.