
Bank Holiday, Finance Ministry, Public Sector Banks, 5 Day Work Week
Bank 5 Day Work Week: केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना शनिवारी साप्ताहिक सुट्टी (Saturday Off) जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली असून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचारी संघटनांकडून सोमवार ते शुक्रवार असा ५ दिवसांचा आठवडा (5-Day Work Week) लागू करण्याची आणि शनिवार-रविवार सुट्टी देण्याची सातत्याने मागणी केली जात होती. केंद्र सरकारच्या या मंजुरीमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
५ दिवसांचा आठवडा तत्काळ प्रभावाने लागू केला जाणार आहे. आतापर्यंत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुट्टी रद्द करण्यात आली असून आता प्रत्येक शनिवारी बँका बंद राहतील. ५ दिवसांचा आठवडा लागू झाल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत (Working Hours) काही मिनिटांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या कामावर परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.
बँकांचे प्रत्यक्ष कामकाज शनिवारी बंद असले, तरी एटीएम (ATM), नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या सर्व डिजिटल सेवा २४ तास सुरळीतपणे सुरू राहतील.
कांच्या या नव्या नियमामुळे ग्राहकांना त्यांच्या बँकेशी संबंधित प्रत्यक्ष कामांचे नियोजन सोमवार ते शुक्रवार या कालावधीतच करावे लागणार आहे. धनादेश (Cheque Clearance) व खात्याशी संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी आता सोमवारचा दिवस वाट पाहावी लागेल.
सभी बैंकों में अब प्रत्येक शनिवार को साप्ताहिक अवकाश रहेगा
All banks will now have weekly holiday every Saturday. pic.twitter.com/4q7qXRcza7 — Basic News and information LIVE 🎤 (@BasicshikshakC) October 1, 2026
रविवारी (28 सप्टेंबर) रात्री उशिरा झालेल्या आयबीए (IBA) आणि यूएफबीयू (UFBU) यांच्यातील बैठकीनंतर बँकांच्या संपाचा निर्णय रद्द करण्यात आला. पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसह अनेक मुद्द्यांवरून बँक कर्मचारी तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली होती. बँक कर्मचाऱ्यांच्या या मागणीनंतर एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीत बँक व्यवस्थापन आणि बँक कर्मचारी संघटना या दोन्हींचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून बँकांमध्ये पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची मागणी केली जात होती. दरम्यान गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी बँकांना महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टीही जाही करण्यात आली होती. तर इतर शनिवारी नेहमीप्रमाणे सुरू असतात.
सोशल मीडियावर एक गॅझेट अधिसूचना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही अधिसूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने जारी केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने SBIसह सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना प्रत्येक शनिवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, असा दावा या व्हायरल दस्तऐवजात करण्यात आला आहे.
A Gazette circulating on social media , purportedly issued by the Ministry of Finance (Department of Financial Services), claims that the Central Government has declared every Saturday a public holiday for all Public Sector Banks , including SBI.#PIBFactCheck: ❌ The document… pic.twitter.com/ClCqEt2UAX — PIB Fact Check (@PIBFactCheck) October 1, 2026
मात्र, PIB Fact Checkने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेला संबंधित दस्तऐवज बनावट असल्याचे PIB Fact Checkने म्हटले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना प्रत्येक शनिवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती, मेसेज किंवा दस्तऐवज आढळल्यास नागरिकांनी त्याची सत्यता तपासण्यासाठी PIB Fact Checkकडे पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.