Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण सुरू ! ७% विकासदराचा केला मोठा दावा (फोटो-सोशल मीडिया)
Union Budget 2026: आज भारताचे आर्थिक वर्ष २०२६-२७ वर्षाचे अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करत असून मोदी सरकारने केलेल्या कामाचा आढावा देत आहेत. देशाचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी देशाला उद्देशून म्हणाल्या की, “माघ पौर्णिमा आणि गुरु रविदास जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मी आज अर्थसंकल्प सादर करत आहे. गेल्या वर्षी भारताची आर्थिक परिस्थिती चांगली होती.” असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांचे सरकार गेल्या १२ वर्षांपासून गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत काम करत आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. स्वावलंबन भारत किंवा ‘आत्मनिर्भर भारत’ हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य मंत्र आहे. सरकारी निर्णयांद्वारे नागरिकांना फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी देशाची अर्थव्यवस्था ७% विकास दराने वाढल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
बातमी अपडेट होत आहे..






