Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CEAT ऑफ-हायवेचा मोठा टप्पा, कॅम्सो ब्रँड कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसाय आता ‘या’ प्रवासात सहभागी

सीएटने श्रीलंकेत 171 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली असून, त्यामुळे 1483 नोकऱ्या सुरक्षित राहणार आहेत आणि श्रीलंकेची भूमिका जागतिक OHT हब म्हणून अधिक मजबूत होणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 03, 2025 | 07:47 PM
सीएटची कामगिरी

सीएटची कामगिरी

Follow Us
Close
Follow Us:

सीएटने मिशेलिन ग्रुपच्या कॅम्सो कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईन व्यवसायाचे अधिग्रहण केले असून, यात श्रीलंकेतील मिडिगामा प्लांट व कोटुगोडा कास्टिंग प्रॉडक्ट प्लांट यांचा समावेश आहे. या पावलामुळे सीएटने आपल्या ऑफ-हायवे टायर्स (OHT) धोरणात कॅम्सो ब्रँडचे एकत्रीकरण केले आहे.

युरोप व उत्तर अमेरिकेत कॅम्सो ब्रँडच्या मजबूत उपस्थितीमुळे सीएटला आता 40 हून अधिक जागतिक OEMs आणि प्रीमियम डिस्ट्रीब्युटर्स पर्यंत थेट प्रवेश मिळणार आहे. यामुळे कंपनीच्या जागतिक ऑफ-हायवे मोबिलिटी क्षेत्रातील अग्रगण्य स्थानाच्या दृष्टीकोनाला गती मिळेल.

जागतिक पातळीवर नाव 

सीएट लिमिटेडने आपल्या ऑफ-हायवे टायर्स (OHT) वाढ धोरणात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, मिशेलिन ग्रुपचा कॅम्सो कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईन व्यवसाय अधिकृतरीत्या अधिग्रहित केला आहे. यामध्ये श्रीलंकेत असलेले मिडिगामा प्लांट व कोटुगोडा कास्टिंग प्रॉडक्ट प्लांट यांचा समावेश आहे. या व्यवहारामुळे सीएटला कॅम्सो ब्रँडचे जागतिक पातळीवर मालकी मिळवून दिली असून, पुढील तीन वर्षांच्या लायसन्सिंग कालावधीनंतर कायमस्वरूपी विविध श्रेणींमध्ये हस्तांतरित होईल.

Zomato Share Price: उत्सवात नफा वाढवण्यासाठी झोमॅटोने उचलले ‘हे’ पाऊल, ग्राहकांना महागात पडणार

महत्त्वाचा टप्पा 

कॅम्सो ब्रँडचे हे अधिग्रहण सीएटसाठी उच्च-नफा देणाऱ्या OHT क्षेत्रात जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी होण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या दशकभरात सीएटने मजबूत कृषी पोर्टफोलिओ उभारला आहे आणि कॅम्सोच्या कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट ट्रॅक्स व टायर्स विषयक कौशल्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित बळकटीमुळे सीएटला 40 हून अधिक जागतिक OEMs व प्रीमियम आंतरराष्ट्रीय OHT वितरकांपर्यंत प्रवेशाचे नवे दरवाजे उघडतील. या व्यवहारानंतर मिशेलिन कंपनी कॉम्पॅक्ट लाईन बायस टायर्स व कन्स्ट्रक्शन ट्रॅक्स संबंधित व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडणार आहे.

काय म्हणाले उच्चायुक्त 

भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त एच.ई. संतोष झा म्हणाले : “श्रीलंकेत सीएट लिमिटेडच्या गुंतवणुकीबद्दल मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या काही वर्षांत भारत हा श्रीलंकेतील सर्वात मोठा एफडीआय (विदेशी थेट गुंतवणूक) स्रोत राहिला आहे आणि हा प्रवाह पुढेही कायम असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वामुळे गुंतवणूक-आधारित भागीदारी अधिक दृढ होत आहे. हे आमच्या नागरिकांसाठी सामायिक समृद्धीचे भविष्य उभारण्याच्या दृष्टीकोनाला बळ देते. भारताचा खासगी क्षेत्र श्रीलंकेत गुंतवणूक करत असल्यामुळे मला विश्वास आहे की दोन्ही देशांतील आर्थिक व व्यापारी संबंध अधिकाधिक मजबूत होत राहतील.”

GST Council: जीएसटीमध्ये सूट देण्याचा निर्णय कोण घेतं, केंद्र सरकार की राज्य? जाणून घ्या जीएसटी कौन्सिलची संपूर्ण निर्णय प्रणाली

सीएटचे म्हणणे 

सीएट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णब बॅनर्जी म्हणाले : “कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसायाचे एकत्रीकरण व कॅम्सो ब्रँडचे अधिग्रहण ही सीएटच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला पुढे नेणारी आणि ऑफ-हायवे मोबिलिटी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कंपनी होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे. उत्पादनं, क्षमता आणि बाजारपेठेतील आमच्या वाढलेल्या सामर्थ्यामुळे आम्हाला नव्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये प्रवेश करता येईल, पोर्टफोलिओ वाढवता येईल आणि आगामी काळात शाश्वत वाढ साधता येईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

सीएट स्पेशॅलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित तोलानी म्हणाले : “कॅम्सोच्या प्रीमियम ब्रँडचे व कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईनच्या उत्पादन क्षमतांचे सीएटमध्ये एकत्रीकरण हा आमच्या प्रवासातील परिवर्तन घडवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. आमचा तातडीचा भर हा सुगम संक्रमण, ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करणे आणि श्रीलंकेत आमच्या कार्यपद्धती अधिक मजबूत करणे यावर आहे.”

कॅम्सोच्या कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसायाचा समावेश आपल्या पोर्टफोलिओत करून सीएट आता आत्मविश्वासाने पुढे जात आहे आणि जगभरातील ऑफ-हायवे टायर्स व ट्रॅक्स क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह नाव बनण्याच्या दृष्टीकोनाला अधिक वेग देत आहे.

Web Title: Ceat off highway s big milestone camso brand compact construction equipment business now joins different journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • Business
  • Business News

संबंधित बातम्या

GST Council: जीएसटीमध्ये सूट देण्याचा निर्णय कोण घेतं, केंद्र सरकार की राज्य? जाणून घ्या जीएसटी कौन्सिलची संपूर्ण निर्णय प्रणाली
1

GST Council: जीएसटीमध्ये सूट देण्याचा निर्णय कोण घेतं, केंद्र सरकार की राज्य? जाणून घ्या जीएसटी कौन्सिलची संपूर्ण निर्णय प्रणाली

पंडित नेहरूंच्या दिल्लीतील पहिल्या बंगल्याची विक्री, 1,100 कोटी मध्ये झाला सौदा; कोण आहे नवा मालक?
2

पंडित नेहरूंच्या दिल्लीतील पहिल्या बंगल्याची विक्री, 1,100 कोटी मध्ये झाला सौदा; कोण आहे नवा मालक?

GST Council 56th Meeting: टूथपेस्ट, शँपू, कार, सिमेंट? काय होणार स्वस्त, GST कौन्सिलचा निर्णय लवकरच
3

GST Council 56th Meeting: टूथपेस्ट, शँपू, कार, सिमेंट? काय होणार स्वस्त, GST कौन्सिलचा निर्णय लवकरच

Stocks To Watch: 12 शेअर्सवर आज राहणार नजर, इंट्राडेमध्ये दिसू शकतो कमालीचा धडाका
4

Stocks To Watch: 12 शेअर्सवर आज राहणार नजर, इंट्राडेमध्ये दिसू शकतो कमालीचा धडाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.