Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीस मंत्रिमंडळाची मंजुरी; नोव्हेंबरच्या पगारात वाढून मिळणार पैसे?

Dearness Allowance DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली असून, केंद्रातील मोदी सरकारने महागाई भत्त्यात DA ३ टक्क्यांच्या वाढीला अधिकृत मंजुरी दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 28, 2026 | 04:16 PM
महागाई भत्त्यात 3% वाढीस मंत्रिमंडळाची मंजुरी ( सौजन्य - सोशल मीडिया )

महागाई भत्त्यात 3% वाढीस मंत्रिमंडळाची मंजुरी ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर!
  • महागाई भत्त्यात 3% वाढीस मंत्रिमंडळाची मंजुरी
  • नोव्हेंबरच्या पगारात वाढून मिळणार पैसे?
Dearness Allowance DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या अगदी आधी, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना या बातमीमधून दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA DR Hike 2026 ) आणि महागाई सवलत (DR) मध्ये ३% वाढीस अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. यामुळे नेमकं काय बदलणार? पगारावर याचा कसा परिणाम होणार? जाणून घेऊयात. ( Dearness Allowance DA Hike ) 

Microsoft VEO Voluntary : नोकरी सोडल्यास मिळणार तब्बल11 लाख! मायक्रोसॉफ्टच्या योजनेची जगभरात चर्चा; नेमकं कारण आहे VEO पॅकेज?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने बुधवारी एकूण २९,२६७ कोटी रुपयांच्या विकास आणि कल्याणकारी पॅकेजेसना मंजुरी दिली. या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

३% वाढीनंतर महागाई भत्ता ६०% वर

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारने महागाई भत्ता ३% ने वाढवला आहे. त्यामुळे आता हा आकडा ६०% वरून ६३% केला आहे. हे वाढीव दर १ जुलै २०२६ पासून लागू होतील. याव्यतिरिक्त, सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्यांसाठी महागाई भत्ता २६२% वरून २६९% वर म्हणजेच +७% वाढला आहे.

महागाई भत्त्याच्या वाढीवर सरकार ₹१०,०१६ कोटी खर्च करणार

पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत ४८३% वरून ४९७% वर म्हणजेच +१४% इतकी वाढ झाली आहे. या संपूर्ण महागाई भत्त्याच्या वाढीवर सरकार ₹१०,०१६ कोटी खर्च करणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा अंदाजे ४९ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. ही संपूर्ण वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्थापित केलेल्या सूत्रावर आधारित असणार आहे.

१ कोटींहून अधिक लोकांना लाभ

महागाई भत्ता ही सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना वाढत्या महागाईच्या परिणामांपासून संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचे राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी दिली जाणारी एक अतिरिक्त रक्कम आहे.

GST Registration Process Simplified : व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त 3 दिवसांत मिळणार नवीन GST नंबर; झाले 5 मोठे बदल

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ करण्यात आली आहे?

    Ans: केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ केली असून, यामुळे मूळ वेतनावरील डीए ६० टक्क्यांवरून वाढून ६३ टक्के झाला आहे.

  • Que: वाढीव महागाई भत्त्याचा फायदा कोणाकोणाला मिळणार आहे?

    Ans: या निर्णयाचा थेट फायदा केंद्र सरकारच्या सुमारे १.१६ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे.

  • Que: वाढलेला महागाई भत्ता नोव्हेंबरच्या पगारात मिळणार का?

    Ans: मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, सुधारित डीएनुसार वाढीव रक्कम आणि मागील महिन्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांना आगामी नोव्हेंबर महिन्याच्या पगारात मिळण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Central government employees da hike 3 percent cabinet approval november salary ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • central goverment
  • Dearness Allowance

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.