
China Company News: कर्मचाऱ्यांना लागली 'लॉटरी', नोकरीसोबत मिळणार आता घरही
China Company News: विविध कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना जोडून ठेवण्यासाठी नवं नवीन उपाययोजना कराव्या लागतात. जेणेकरून कर्मचारी कंपनीशी जोडून राहतील. असाच काहीसा प्रयत्न चीनच्या कंपनीनं केला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी त्या कंपनीने भन्नाट योजना आखली आहे. या कंपनीने त्यांच्या १८ सर्वात जुन्या कर्मचाऱ्यांना नोकरीसोबत घर देखील दिले आहे. या घरांची किंमत सुमारे १ कोटी ते १.५ कोटी रुपयांच्या दरम्यान असून साऊथ चायना मॉर्निंगच्या वृत्तानुसार, ही भेट ‘झेजियांग गुओशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ या कंपनीची आहे. ऑटोमोबाईलचे सुटे भाग बनवण्याचं ही कंपनी काम करते.
या कंपनीमध्ये जवळपास ४५० पेक्षा जास्त कर्मचारी असून २०२४ मध्ये या कंपनीचे उत्पादन मूल्य तब्बल ७० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५८० कोटी रुपये होते. याच दरम्यान, कंपनीने आता पुढील ३ वर्षांत कर्मचाऱ्यांना घर भेट देण्याचे ठरवले आहे. जोडलेले कर्मचारी जास्त काळ सोबत राहावे आणि प्रतिभावान लोक कंपनीशी कायम जोडले जावे असा यामागचा उद्देश आहे.
वांग जियायुआन या कंपनीचे जनरल मॅनेजर यांनी सांगितले की, ही योजना विशेषतः अशा कर्मचऱ्यांसाठी आहे जे दुसऱ्या शहरातून येऊन काम करतात. एक हक्काचं आणि कायमस्वरूपी राहायला ठिकाण मिळावं म्हणून टेक्निकल आणि मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी ही घोषणा केली. वांग यांनी स्पष्ट केले, या वर्षी त्यांनी ५ फ्लॅट्स दिले असून पुढील वर्षी आणखी ८ फ्लॅट्स वाढवून दिले जातील. अशा प्रकारे येत्या ३ वर्षांत एकूण १८ फ्लॅट्स देण्याचे कंपनीचे नियोजन आहे. या मागचा थेट उद्देश उत्कृष्ट टॅलेंटला आकर्षित करण्यासह मुख्य मॅनेजमेंट टीमला टिकवून ठेवणं हा आहे.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत एका हाऊसिंग करारावर सही करावी लागणार असून कंपनीने फ्लॅटचे नूतनीकरण केल्यानंतरच ते तिथे राहायला जाऊ शकतात. नोकरीला ५ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांच्या मालकीचे घर करण्यात येईल. कर्मचाऱ्यांना मात्र केवळ घराचे नूतनीकरणाचा स्व: खर्चातुन करावे लागतील. या वर्षी ५ फ्लॅट्स ज्यांना मिळाले त्यातील २ जण अगदी सुरुवातीच्या पदावरून प्रगती करत व्यवस्थापन स्तरापर्यंत पोहोचले आहेत. ही योजना कंपनीचा खर्च कमी करून गुणवत्ता सुधारण्याच्या एक प्रयत्न आहे.
कंपनीच्या इंडस्ट्रीयल एरियापासून हे सर्व फ्लॅट फक्त ५ किलोमीटर अंतरावर असून त्या फ्लॅट्स साईज १०० ते १५० चौरस मीटर पर्यंत आहेत. तर, त्या भागातील रीसेल फ्लॅटची किंमत सरासरी प्रति चौरस मीटर अंदाजे ८९,००० ते १ लाख रुपये आहे.