Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India NZ Trade : स्वस्त होणार कीवी अन् सफरचंद! भारत-न्यूझीलंडने FTA कराराने उद्योजकांसाठी उघडले संधींचे महाद्वार

STEM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूझीलंडचे पंतप्रधान रिटायर्ड माननीय क्रिस्टोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे 'हा' करार (FTA) यशस्वी आणि ऐतिहासिक झाल्याची घोषणा केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 22, 2025 | 12:29 PM
India-New Zealand announce FTA $20 million investment shock to Trump

India-New Zealand announce FTA $20 million investment shock to Trump

Follow Us
Close
Follow Us:
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी अवघ्या ९ महिन्यांच्या विक्रमी वेळेत भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार (FTA) पूर्ण झाल्याची घोषणा केली.
  •  या करारानुसार न्यूझीलंड पुढील १५ वर्षांत भारतात २० अब्ज डॉलर्स (सुमारे १.६ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करणार असून, द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  •  अमेरिकेने लादलेल्या वाढीव सीमाशुल्काच्या (Trump Tariffs) पार्श्वभूमीवर भारताने स्वदेशी व्यापाराला बळ देण्यासाठी उचललेले हे एक अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल मानले जात आहे.

India-New Zealand Free Trade Agreement 2025 : जागतिक राजकारणात आणि व्यापार क्षेत्रात (Trade Agreement) आज भारताने एक मोठी झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधत भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर (FTA) शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, ज्या करारासाठी अनेकदा वर्षे उलटतात, तो करार भारताने अवघ्या ९ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करून जगाला आपली राजकीय इच्छाशक्ती दाखवून दिली आहे.

काय आहे हा ‘ऐतिहासिक’ करार?

या करारांतर्गत न्यूझीलंडमधून भारतात येणाऱ्या ९५% उत्पादनांवरील सीमाशुल्क (Tariffs) एकतर पूर्णपणे रद्द केले जाईल किंवा लक्षणीयरीत्या कमी केले जाईल. यामुळे भारतीय ग्राहकांना न्यूझीलंडची दर्जेदार उत्पादने स्वस्त मिळतील, तर दुसरीकडे भारताच्या आयटी (IT), औषधनिर्माण (Pharmaceuticals) आणि कापड (Textiles) क्षेत्रातील उद्योजकांना न्यूझीलंडची बाजारपेठ खुली होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट

२० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि रोजगाराची संधी

या कराराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूक. न्यूझीलंडने पुढील १५ वर्षांत भारतात २० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची वचनबद्धता व्यक्त केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने तंत्रज्ञान, शिक्षण, कृषी-तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये केली जाईल. याशिवाय, भारतीय तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी न्यूझीलंडने आपल्या व्हिसा नियमात शिथिलता दिली असून, STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) मधील पदवीधरांना ३ ते ४ वर्षांचा पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा दिला जाणार आहे.

ट्रम्प यांच्या धोरणांना ‘मास्टरस्ट्रोक’ उत्तर!

अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर कर लादण्याची घोषणा केल्यामुळे जागतिक व्यापारात अस्थिरता निर्माण झाली होती. अशा वेळी भारताने न्यूझीलंड, ओमान आणि ब्रिटन यांसारख्या देशांशी व्यापार करार करून आपली अर्थव्यवस्था सुरक्षित केली आहे. भारताने अमेरिकेवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यायी बाजारपेठा शोधण्यासाठी हा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Crisis: ‘भारतासोबतच्या संबंधांवरच अवलंबून आहे आपली समृद्धी’ Sheikh Hasina यांनी Yunus ला हिंसेवर सुनावले खडे बोल

शेतकरी आणि उद्योजकांसाठी ‘विंन-विंन’ परिस्थिती

या करारामुळे भारताच्या कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी न्यूझीलंडचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (Centres of Excellence) मदत करतील. सफरचंद, कीवी आणि मधाच्या उत्पादनात भारतीय शेतकऱ्यांना न्यूझीलंडचे तंत्रज्ञान मिळेल. त्याच वेळी, भारतीय औषधे आणि अभियांत्रिकी वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य सीमाशुल्कासह प्रवेश मिळेल, ज्यामुळे देशाच्या निर्यातीला मोठी चालना मिळेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-न्यूझीलंड FTA मुळे सर्वसामान्यांना काय फायदा होईल?

    Ans: यामुळे न्यूझीलंडमधील दर्जेदार फळे (कीवी, सफरचंद) आणि दुग्धजन्य पदार्थ स्वस्त होतील, तसेच तंत्रज्ञान देवाणघेवाणीमुळे भारतात नवीन रोजगार निर्माण होतील.

  • Que: भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नियमात काय बदल झाले आहेत?

    Ans: या करारानुसार, STEM पदवीधरांना ३ वर्षे आणि डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४ वर्षांपर्यंतचा पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा न्यूझीलंडमध्ये मिळेल.

  • Que: भारताने हा करार इतक्या घाईत (९ महिन्यात) का केला?

    Ans: जागतिक व्यापार युद्ध आणि अमेरिकेच्या वाढीव सीमाशुल्कापासून भारतीय निर्यातदारांचे रक्षण करण्यासाठी भारताने हा करार 'फास्ट ट्रॅक' मोडवर पूर्ण केला आहे.

Web Title: India new zealand announce fta 20 million investment shock to trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • Business News
  • india
  • New Zealand

संबंधित बातम्या

India Bangladesh: फेक न्यूजचा पर्दाफाश! बांगलादेशी मीडियाविरुद्ध MEA Randhir Jaiswal यांचा ‘नो नॉन्सेन्स’ वार, दिले सडेतोड उत्तर
1

India Bangladesh: फेक न्यूजचा पर्दाफाश! बांगलादेशी मीडियाविरुद्ध MEA Randhir Jaiswal यांचा ‘नो नॉन्सेन्स’ वार, दिले सडेतोड उत्तर

Multibagger Small Cap Stock : हे ५ स्मॉल-कॅप स्टॉक्स २०२५ चे ‘धुरंधर’ ठरले, ज्यांनी ४९० टक्क्यांपर्यंत दिला परतावा
2

Multibagger Small Cap Stock : हे ५ स्मॉल-कॅप स्टॉक्स २०२५ चे ‘धुरंधर’ ठरले, ज्यांनी ४९० टक्क्यांपर्यंत दिला परतावा

Upcoming IPOs: शेअर बाजारात येत आहेत नवीन 11 IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण यादी
3

Upcoming IPOs: शेअर बाजारात येत आहेत नवीन 11 IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण यादी

Nuclear Deal: अणुशक्तीचे महाद्वार उघडले! भारताचा ‘SHANTI’ कायदा गेमचेंजिंग; अमेरिकन आणि फ्रेंच कंपन्यांना गुंतवणुकीचे वेध
4

Nuclear Deal: अणुशक्तीचे महाद्वार उघडले! भारताचा ‘SHANTI’ कायदा गेमचेंजिंग; अमेरिकन आणि फ्रेंच कंपन्यांना गुंतवणुकीचे वेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.