Coca-Cola India साऊथवेस्ट एशियाकडून कस्टमर अँड कमर्शियल लीडरशीपच्या नवीन उपाध्यक्षाची घोषणा
कोका-कोला इंडिया साऊथवेस्ट एशिया (आयएनएसडब्ल्यूए) ऑपरेटिंग युनिटने आज कस्टमर अँड कमर्शियल लीडरशीप (सीअँडसीएल)चे नवीन उपाध्यक्ष म्हणून डेसमंड निखिल डिसूझा यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ते १ फेब्रुवारी २०२५ पासून पदभार स्वीकारतील. ते ग्रीष्मा सिंग यांची जागा घेतील, ज्या नुकतेच मार्केटिंगच्या उपाध्यक्ष बनल्या आहेत.
”एफएमसीजी उद्योगामध्ये धोरणात्मक दृष्टीकोन आणि उत्तम नेतृत्वाच्या प्रख्यात ट्रॅक रेकार्डसह डेसमंड यांच्याकडे मोठा अनुभव आणि नाविन्यपूर्ण संकल्पना आहेत, ज्या ग्राहक समाधान व व्यावसायिक सर्वोत्तमतेला चालना देण्याच्या आमच्या मिशनशी परिपूर्णपणे संलग्न आहेत, ”बाजारपेठ गतीशीलता आणि ग्राहक सहभागाबाबत त्यांना असलेले ज्ञान आमची विकास ध्येये संपादित करण्यासाठी साह्यभूत ठरेल. असे कोका-कोला इंडिया साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष संकेत राय यांनी सांगितले.
नवीन पदभारासह डेसमंड यांच्यावर आयएनएसडब्ल्यूएमधील सीअँडसीएल कार्यसंचालनाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल, जेथे ते मूल्य वाढीला चालना देण्यावर, आमचा ग्राहक सहयोग अधिक दृढ करण्यावर आणि दीर्घकालीन व्यावसायिक परिवर्तनासाठी धोरणांशी संलग्न असण्यावर लक्ष केंद्रित करतील. डेसमंड माँडेलीझमधून कोका-कोलामध्ये सामील होत आहेत, जेथे त्यांनी सेल्सचे उपाध्यक्ष म्हणून सेवा दिली. त्यांच्या नेतृत्वांतर्गत माँडेलीझ इंडियाने फूटप्रिंटचा विस्तार करत, सेल्समधील डिजिटल नाविन्यतेला चालना देत आणि विकासाला गती देण्यासाठी नवीन व्यावसायिक क्षमता निर्माण करत व अंतर्भूत करत मोठ्या प्रमाणात प्रगती केली. माँडेलीझमधील कार्यकाळापूर्वी डेसमंड यांनी पेप्सीको येथे परिवर्तनीय उपक्रम आणि विक्री नेतृत्वामध्ये प्रमुख भूमिका बजावली. झोमॅटोमध्ये त्यांनी ग्राहक सबस्क्रिप्शन धोरणाप्रती योगदान दिले. यामधून विविध क्षेत्रांमध्ये व कार्यसंचालनांमध्ये कार्यरत राहण्याची त्यांची क्षमता दिसून येते.डेसमंड यांनी एक्सएलआरआय जमेशदपूर येथून पदव्युत्तर व्यवस्थापन पदवी शिक्षण आणि विश्वेश्वराय टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) येथून इंजीनिअरिंग (बीई)मध्ये स्नातक पदवी शिक्षण घेतले आहे.