Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Credit Card Rule Change : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम

१ एप्रिल २०२६ पासून, क्रेडिट कार्डबाबत अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. हे प्रस्तावित बदल आयकर कायदा २०२५ अंतर्गत लागू केले जाणार आहेत. नवीन नियमांमुळे तुमच्या क्रेडिट कार्ड वापरावरील देखरेख अधिक होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 29, 2026 | 02:33 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • १ एप्रिल २०२६ पासून, क्रेडिट कार्डबाबत अनेक मोठे बदल
  • नवीन आयकर नियमांनुसार पॅन कार्ड लिंक करण्यापासून
  • मोठ्या रकमेच्या व्यवहारांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर अधिक कडक नजर
Credit Card Rule Change : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून, म्हणजेच १ एप्रिल २०२६ पासून, क्रेडिट कार्डबाबत अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. हे प्रस्तावित बदल आयकर कायदा २०२५ अंतर्गत लागू केले जाणार आहेत. नवीन नियमांमुळे तुमच्या क्रेडिट कार्ड वापरावरील देखरेख अधिक होणार आहे. कारण नवीन आयकर नियमांनुसार पॅन कार्ड लिंक करण्यापासून ते मोठ्या रकमेच्या व्यवहारांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर अधिक कडक नजर ठेवली जाणार आहे. जरी याचा बहुतेक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांच्या दैनंदिन खर्चावर लक्षणीय परिणाम होणार नाही, परंतु जर तुम्ही जास्त खर्च करणारे असाल किंवा वारंवार परदेश प्रवास करत असाल, तर या नवीन नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होऊ शकतो.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महागलं, ‘या’ पंपांवर द्यावी लागेल अधिक किंमत

मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर नजर

१ एप्रिल २०२६ पासून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी सर्वात मोठा बदल हा असेल, जो या रकमेपेक्षा जास्त खर्च करणाऱ्यांसाठी असणार आहे. कारण मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर कठोरपणे नजर ठेवली जाणार आहे. या प्रस्तावानुसार, जर तुमचे क्रेडिट कार्ड पेमेंट एका आर्थिक वर्षात ₹१० लाख किंवा त्याहून अधिक खर्च करतंय, तर तुमची बँक आयकर विभागाला कळवू शकते. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या परदेशी खर्चावरही नजर ठेवली जाऊ शकते. जर तुमचा खर्च तुमच्या कर विवरणपत्रात दर्शविलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला स्पष्टीकरण मागवणारी नोटीस मिळू शकते.

पॅन कार्ड लिंकिंग

क्रेडिट कार्डशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे १ एप्रिलपासून क्रेडिट कार्डसाठी पॅन नंबर अनिवार्य असणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून, बँका पॅन क्रमांकाशिवाय क्रेडिट कार्ड जारी करणार नाहीत. सध्याच्या कार्डेना पॅनकार्ड क्रमांक जोडणे आवश्यक असणार आहे. याचा अर्थ असा की, तुमचे क्रेडिट कार्ड प्रभावीपणे तुमच्या कर ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनेल.

तुमच्या कंपनीचे कार्ड

जर तुम्हाला तुमच्या कंपनीकडून क्रेडिट कार्ड दिले गेले असेल, तर हा तिसरा बदल तुमच्यासाठी आहे. नवीन मसुदा नियमांनुसार, १ एप्रिलपासून, तुमच्या कंपनीच्या कार्डने केलेला वैयक्तिक खर्च करपात्र लाभ मानला जाऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुम्ही तुमच्या कंपनीचे कार्ड वैयक्तिक खरेदी, प्रवास किंवा मनोरंजनासाठी वापरले, तर ती रक्कम तुमच्या पगारात जोडली जाऊ शकते आणि त्यावर कर लागू होऊ शकतो. तो खर्च कामाशी संबंधित होता हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला बिले किंवा पुरावा सादर करण्याची आवश्यकता असणार आहे.

क्रेडिट कार्डद्वारे कर भरणे

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना आयकर भरण्यासाठी एक नवीन पर्याय दिला जाऊ शकतो. प्रस्तावित नियमांनुसार, आता नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्ड वापरून आयकर भरता येईल. कर भरण्याच्या वेळी तुमच्याकडे पुरेशी रोख रक्कम नसल्यास हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. येथे सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे, कारण कार्ड जारी करणारी बँक प्रक्रिया शुल्क आकारू शकते आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवर न भरल्यास व्याज देखील आकारले जाऊ शकते.

क्रेडिट कार्ड स्टेटमेंट

क्रेडिट कार्डशी संबंधित पुढील बदल म्हणजे, तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पॅन कार्डसाठी पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते. जर स्टेटमेंट अलीकडील असेल आणि त्यात तुमचा अचूक पत्ता असेल, तर ते एक वैध दस्तऐवज म्हणून स्वीकारले जाईल. यामुळे पॅन कार्डसाठी अर्ज करणे किंवा तपशील अद्ययावत करणे देखील सोपे होईल, विशेषतः जर तुमच्याकडे विजेची बिले किंवा प्रमाणपत्रे नसतील. याव्यतिरिक्त, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना पॅन कार्ड सादर करणे अनिवार्य होईल.

अमेरिका- इराण युद्धाचा जगावर परिणाम! तेलाचे दर वाढल्याने भारतासमोर नवे संकट, जागतिक बाजारात अस्थिरता

Web Title: Credit card rule change from 1st april pan link tax payment know every detail marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • Credit Card Rules
  • pan card

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
2

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट
4

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.