(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
आज पेट्रोलआणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल अजूनही जुन्या दरातच उपलब्ध आहेत. फक्त नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. नायराने पेट्रोलच्या दरात ५ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय, इतर कंपन्यांनी अद्याप कोणतीही दरवाढ केलेली नाही.
मुंबईत पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लिटर, बंगळूरुमध्ये १०२.९६ रुपये, कोलकातामध्ये १०३.५४ रुपये, हैदराबादमध्ये १०७.४६ रुपये, भुवनेश्वरमध्ये १००.९४ रुपये, चेन्नईमध्ये १०१.२३ रुपये, गुडगावमध्ये ९५.३६ रुपये, नोएडामध्ये ९४.७४ रुपये, लखनौमध्ये ९४.६९ रुपये आणि पोर्ट ब्लेअरमध्ये ८८.१६ रुपये दराने विकले जात आहे. आज कोहिमामध्ये पेट्रोलचा दर ९७.७० रुपये प्रति लिटर इतका आहे.
लखनौमध्ये आज एक लिटर डिझेल ८७.८१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर, पोर्ट ब्लेअरमध्ये हा दर ७८.०५ रुपये आहे. हैदराबादमध्ये आज डिझेल ९५.७० रुपये, भुवनेश्वरमध्ये ९२.६९ रुपये, चेन्नईमध्ये ९२.३९ रुपये, कोलकातामध्ये ९२.०२ रुपये, बंगळूरमध्ये ९०.९९ रुपये, मुंबईमध्ये ९०.०३ रुपये, नोएडामध्ये ८७.८१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तुम्हाला हा दर जिओ-बीपी, एचपीसीएल, आयओसीएल आणि बीपीसीएलच्या पंपांवर मिळेल. नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपावर तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने गेल्या आठवड्यात प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹2 ने, तर कमर्शियल डिझेलच्या दरात प्रति लिटर ₹22 ने वाढ केली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून तेल कंपन्यांना दिलासा दिला आहे. सरकारने उत्पादन शुल्क प्रत्येकी ₹10 ने कमी केले आहे. परिणामी, आता डिझेलवर शून्य कर, तर पेट्रोलवर ₹3 कर आकारला जाणार आहे.






