फक्त 51 रुपयांत शुद्ध सोने खरेदी करता येणार, कसं ते जाणून घ्या
मुंबई : सोनं हे पारंपरिकरित्या भारतीय घरांमध्ये बचतीचे आवडते साधन मानले जाते जे सणासुदीला खरेदी केले जाते आणि पिढ्यान्पिढ्या पुढे दिले जाते. ओणम हा केरळमधील सर्वाधिक साजरा होणारा आणि उत्सुकतेने वाट पाहिला जाणारा सण आहे. तो सोनं खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो, जो समृद्धी, भरभराट आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. या ओणमला कुटुंबं पेटीएमवर फक्त ५१ रुपयांपासून आपली डिजिटल सोन्याची बचत सुरू करू शकतात.
डिजिटल पेमेंट पर्यायांद्वारे किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून शुद्ध सोने खरेदी करता येते. अगदी ५१ रुपयांपासून सोने खरेदी करता येते.सोनं विमा घेतलेल्या व ऑडिटेड व्हॉल्ट्समध्ये सुरक्षित ठेवले जाते. त्यामुळे भौतिक स्टोरेज किंवा लॉकरची गरज लागत नाही. भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह पेमेंट अॅप म्हणून पेटीएम गोल्ड शुद्धता, सुरक्षा आणि पारंपरिक सोनं खरेदीशी संबंधित लपलेल्या खर्चासारख्या चिंता दूर करते. हे २४के शुद्ध सोनं त्वरित खरेदीसाठी उपलब्ध करून देते. दीर्घकालीन बचतीसाठी पेटीएम दैनंदिन, साप्ताहिक किंवा मासिक योगदान असे लवचिक गुंतवणूक पर्याय देते. किंमती लाईव्ह मार्केट रेट्सप्रमाणे असतात आणि प्रत्येक व्यवहार डिजिटल लॉकरमध्ये नोंदवला जातो. जमा झालेलं सोनं भौतिक नाण्यांमध्ये रिडीम करता येतं किंवा पुन्हा प्लॅटफॉर्मवर विकता येतं. रिडेम्प्शन दरम्यान बीआयएस -प्रमाणित, हॉलमार्क सोन्याची डिलिव्हरी जागतिक दर्जा पूर्ण करते.
पेटीएम गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वप्रथम सर्च बारमध्ये ‘पेटीएम गोल्ड’ किंवा ‘डेली गोल्ड एसआयपी’ पर्याय शोधा. यानंतर ‘बाय मोर’ वर टॅप करून गुंतवणुकीची रक्कम टाका (५१ रुपयांपासून सुरुवात). जीएसटीसहित लाईव्ह सोन्याचा भाव पहा आणि एकरकमी खरेदी किंवा एसआयपी (दैनिक/साप्ताहिक/मासिक) पर्याय निवडा. यानंतर पेमेंट मोड निवडा (युपीआय, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड) आणि खरेदी पूर्ण करा. तुमच्या यशस्वी व्यवहारानंतर सोनं सुरक्षित व्हॉल्ट्समध्ये ठेवले जाईल आणि एमएसएस व ईमेलद्वारे याची पुष्टी मिळेल. डेली गोल्ड एसआयपी लोकांना लहान-लहान नियमित गुंतवणूक करण्याची संधी देते, ज्यामुळे कालांतराने सोप्या पद्धतीने सोनं जमा होतं. हा पद्धतशीर दृष्टिकोन शिस्तबद्ध बचतीला प्रोत्साहन देतो आणि एकरकमी खरेदी न करता किंमत सरासरीचा लाभ मिळवून देतो.