Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupee Vs Dollar News: अमेरिका-इस्राइल-इराण युद्धाचा परिणाम होणार; युद्ध लांबलं तर सोने २ लाखांच्या पार?

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर दिसून आला आहे. सोन्याचे दर युद्धामुळे वाढत असल्याचे पाहायला मिळते.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 05, 2026 | 11:14 AM
Rupee Vs Dollar News: अमेरिका-इस्राइल-इराण युद्धाचा परिणाम होणार; युद्ध लांबलं तर सोने २ लाखांच्या पार? (फोटो-सोशल मीडिया)

Rupee Vs Dollar News: अमेरिका-इस्राइल-इराण युद्धाचा परिणाम होणार; युद्ध लांबलं तर सोने २ लाखांच्या पार? (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Rupee Vs Dollar News: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर दिसून आला आहे. सोन्याचे दर युद्धामुळे वाढत असल्याचे पाहायला मिळते. पुण्यातील ज्वेलर्सचे अतुल अष्टेकर यांनी सोन्याच्या दरांवर भाष्य केले. २७-२८ तारखेपर्यंत सोन्याचे दर १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत होते. शनिवारी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सोन्याचे दर १ लाख ६९ हजारांवर पोहोचले होते. मंगळवारी सोन्याचे दर कमी झाले होते, बुधवारी सोन्याचे दर १ लाख ६३ हजारांवर आहेत, असे अष्टेकर यांनी सांगितले.

अतुल अष्टेकर म्हणाले की, जागतिक पातळीवर अस्थिरता असल्याने सोन्याचे दर कमी जास्त होत आहे. हे युद्ध किती दिवस चालतं यावर सोन्याचे दर अवलंबून आहेत. युद्ध आठ दहा दिवसात संपलं तर परिस्थिती नॉर्मल होईल. बरेच तज्ज्ञ म्हणतात युद्ध तीन चार आठवडे लांबलं तर परिणाम तेलावर होईल. तेलाचा पुरवठा कमी झाला तर भविष्यात त्याचा महागाईवर परिणाम होतो. जेव्हा महागाईवर परिणाम होतो, त्यावेळी सोन्याचे भाव वाढलेले दिसतात. महागाई वाढली तर सोन्याचे दर वाढतील, असंही त्यांनी म्हटलं.

Hormuz Strait News: भारताचा सागरी संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय; एचएएल-रशियाचा ५,०८३ कोटींचा करार

सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होतो. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत सोन्याचे दर ८० ते ९० हजार रुपयांदरम्यान दर होते. सध्या सोन्याचा दर १ लाख ६० हजारांच्यावर आहे. भारतीय ग्राहक आहेत त्यांच्या मानसिकतेचा विचार केला तर लग्नामध्ये सोने खरेदी केले जाते. या वर्षी लग्नाच्या तारखा खूप आहेत. १५ मे पर्यंत लग्नाच्या तारखा खूप आहेत. जूनपासून डिसेंबरपर्यंत लग्नाच्या तारखा आहेत. लग्नाची खरेदी ग्राहकांना करावीच लागेल. यात आव्हान आहे की ग्राहकांच्या बजेटमध्ये दागिने बसणे हे आव्हान असेल.

ग्राहकांच्या सोने खरेदीचा कल कमी होणार नाही. दिवाळीत सोन्याचे दर वाढले तरी ग्राहकांनी खरेदी थांबवलेली नाही, असेही अष्टेकर यांनी म्हटले. सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहता तेव्हा ती शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसारखी नाही, आज घेतले आणि उद्या विकले असे नाही. आजपासून १० वर्षानंतर विचार केला तर तेव्हाचे जे दर असतील तेव्हा विकायला गेला तरी फायदा होईल. शॉर्ट टर्मचा विचार न करता लाँग टर्मचा विचार करावा. सोन्यात गुंतवणूक करायची असेल टप्प्या टप्प्याने करावी, असेही अष्टेकर म्हणाले.

जागतिक युद्धाच्या सावटाखाली भारताचा मोठा निर्णय! रशियासोबत मोठा संरक्षण करार शक्य; शत्रूची धडधड वाढली

अमेरिकन भक्कम होत आहे, डॉलर त्या तुलनेत रुपया कमजोर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले नसते आणि डॉलर जर वाढला आणि रुपया कमजोर झाल्यानं भारतात येणाऱ्या सोन्याचा खर्च वाढतो. युद्ध पुढील आठ दहा दिवसात थांबले तर सोन्याच्या दरात एक, दोन, तीन टक्के, पाच टक्के युद्धाचे दर पाहत होतो तेवढे म्हणजेच १ लाख ६० हजार रुपये होऊ शकतो. तर, युद्ध लांबलं तर सांगता येणार नाही पण सोन्याचे दर २ लाखांपर्यंत जाऊ शकतात, असे अतुल अष्टेकर म्हणाले.

Web Title: What will be the impact of the us israel iran war if the war lasts longer will gold cross 2 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • dollar
  • Gold
  • indian rupee

संबंधित बातम्या

India Forex Reserve: भारताचा परकीय चलनसाठा 1.08 अब्ज डॉलरने वाढला; पण सोन्याच्या साठ्यात का झाली घट? जाणून घ्या कारण
1

India Forex Reserve: भारताचा परकीय चलनसाठा 1.08 अब्ज डॉलरने वाढला; पण सोन्याच्या साठ्यात का झाली घट? जाणून घ्या कारण

Yavatmal News: भंडारा जिल्ह्यात सोन्याच्या खाणी! किटाळी परिसरात सर्वेक्षणाला मिळणार गती; रोजगाराच्या संधीची शक्यता
2

Yavatmal News: भंडारा जिल्ह्यात सोन्याच्या खाणी! किटाळी परिसरात सर्वेक्षणाला मिळणार गती; रोजगाराच्या संधीची शक्यता

Petrol-Diesel Rate: महागाईचा उडणार भडका, पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडणार; कच्च्या तेलाचा भाव 91 डॉलरच्या पार
3

Petrol-Diesel Rate: महागाईचा उडणार भडका, पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडणार; कच्च्या तेलाचा भाव 91 डॉलरच्या पार

IND vs ZIM: टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा; पण तिथे खिशात किती रुपये लागतील? भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?
4

IND vs ZIM: टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा; पण तिथे खिशात किती रुपये लागतील? भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.