Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DMart चा बाजारात धुमाकूळ! एका तिमाहीत कमावला 935 कोटींचा नफा; उभारणार 1000 कोटींचे फंड, आता नवा प्लॅन…

DMart कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कमालीचा नफा कमावला आहे. कंपनीने ९३५.७७ कोटी रुपयांचा स्टँडअलोन नफा नोंदवण्यासोबतच भविष्यातील विस्तारासाठी तब्बल ₹१,००० कोटींचे कर्ज भांडवल उभारण्यास मंजुरी दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 12, 2026 | 01:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • DMart चा बाजारात धुमाकूळ!
  • एका तिमाहीत कमावला 935 कोटींचा नफा
  • उभारणार 1000 कोटींचे फंड
DMart: दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स म्हणजेच DMart कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कमालीचा नफा कमावला आहे. नुकताच त्यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत मजबूत आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफा आणि महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. देशभरातील DMart रिटेल स्टोअर साखळीचे संचालन याच कंपनीमार्फत केले जाते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी बरीच चांगली राहिली आहे.

नफा आणि महसुलात मोठी वाढ

आकडेवारीनुसार, कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ₹८२९.७३ कोटींवरून १९३५.७७ कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच नफ्यात सुमारे १२.८ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, कंपनीचा एकूण महसूल ₹१५,९३२.१२ कोटींवरून ₹१८,३४३.४९ कोटींवर वाढला असून, महसुलातही उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

“आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत PAT मार्जिन ४.६% होता, तर आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत तो ४.७% होता,” असे कंपनीने शनिवारी संध्याकाळी आपल्या कमाईच्या निवेदनात म्हटले आहे.जून तिमाहीत ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सचा एकूण खर्च १५.११ टक्क्यांनी वाढून ₹१७,६३७.१७ कोटी झाला. इतर उत्पन्नासह, कंपनीचे एकूण उत्पन्न ₹१८,८२०.३१ कोटी होते, जे जून तिमाहीच्या तुलनेत १४.९ टक्क्यांनी वाढले आहे.

विस्तारासाठी ₹१,००० कोटी उभारणार

कंपनीच्या संचालक मंडळाने व्यवसाय विस्तारासाठी निधी उभारण्यासही मंजुरी दिली आहे. Avenue Supermarts प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स जारी करून ₹१,००० कोटींपर्यंत निधी उभारणार असल्याचं समोर येत आहे. ही रक्कम एक किंवा अधिक टप्प्यांत उभारली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

व्यवस्थापनात मोठे बदल

कंपनीने वरिष्ठ व्यवस्थापनात काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. ललित आहुजा यांची १३ जुलै २०२६ पासून मुख्य कार्यकारी संचालन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना फिलिप्स, डाबर आणि अॅपल यांसारख्या कंपन्यांमध्ये २८ वर्षांचा अनुभव आहे. तसेच, भास्करन एन यांची पुन्हा एकदा पूर्णवेळ संचालक आणि COO म्हणून नियुक्ती करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यांचा नवीन कार्यकाळ १७ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मे २०२८ असा असेल.

Web Title: Dmart takes market by storm earns profit 935 crore a single quarter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • Marathi News

संबंधित बातम्या

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध
1

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक
2

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
3

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले
4

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.