Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

America On Russian Oil : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा निर्णय! रशियन तेलावर लादणार नवे निर्बंध..; मोदी सरकारचा नाव प्लॅन?

अमेरिका रशियन तेलावर 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याची तयारी करत आहे. रशियाच्या सुप्रसिद्ध रोसनेफ्ट व लुकोईल कंपन्यांना लक्ष्य केले जाणार असल्याने भारतासाठी ही गंभीर बाब आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 05, 2025 | 01:46 PM
donald trump on Russian oil

donald trump on Russian oil

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेची रशियन तेलावर निर्बंध लादण्याची तयारी
  • मुख्य रोसनेफ्ट आणि लुकोईल कंपन्यांवर लक्ष्य
  • भारतीय तेल कंपन्यांची रशियन तेल खरेदीत वाढ
America On Russian Oil : अमेरिका  रशियन तेलावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी करत आहे. रशियाच्या सुप्रसिद्ध तेल कंपन्यांना लक्ष्य केले जाणार असून २१ नोव्हेंबरपासून रोसनेफ्ट आणि लुकोईलवर अमेरिकेची नजर असेल. याच पार्श्वभूमीवर, भारतातील तेल कंपन्यांनी रशियन तेल खरेदीत वाढ केली आहे. रशियन पुरवठ्यावर निर्बंध घातले तर तेलाचा पुरवठा कायम राहण्यासाठी अमेरिका इराक आणि  सौदी अरेबिया या देशातून तेल खरेदी करत आहेत.

अमेरिका रशियन तेलावर निर्बंध लावणार असल्याने भारताची गोची होऊ शकते. त्यासाठी भारताकडून तेल शुद्धीकरण कंपन्यांना सुरू ठेवण्यासाठी रशियन तेलाच्या खरेदीत वाढ केली आहे. या सगळ्यामधून मार्ग काढण्यासाठी अजूनही मोदी सरकारकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नाहीये. नेमका सरकारचा काय प्लॅन आहे ते अजूनही गुलदस्त्यात आहे.

भारताने गेल्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल १६.२ लाख बॅरल रशियन खनिज तेलांची खरेदी केली आहे. अगदी सप्टेंबर इतकाच हा आकडा असला तरी अमेरिकेच्या निर्णयामुळे सुद्धा यात वाढ करण्यात येऊ शकते. नोव्हेंबरच्या अखेरीस अमेरिका रशियन तेलावर निर्बंध लावू शकते. त्यामुळे तेल शुद्धीकरण कंपन्या कच्च तेल सुरक्षित आणि घाईने मागवून घेतलं आहे. त्यामुळे आयातीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Gopichand Hinduja : हिंदुजा ग्रुपचे सर्वेसर्वा जीपी हिंदुजाची संपत्ती किती? काय आहे इतिहास..

सरकारी आणि खासगी ऑइल कंपन्या अर्थात भारत पेट्रोलियम, नायरा एनर्जी  व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या तेल पुरवठा कायम ठेवण्यासाठी रशियातून आधीच जास्तीचं तेल मागवत आहेत. ऑफिस ऑफ फॉरेन एसेट्स कंट्रोल या अमेरिकेच्या ट्रेजरी विभागाकडून रशियन तेलावर निर्बंध लागू करण्यात आले असून युक्रेनसोबत युद्ध करत असलेल्या रशियाला आर्थिक धक्का बसावा म्हणून हे निर्बंध लादण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या निर्बंधात मुख्य:त रशियन तेलाची निर्यात करत असलेल्या कंपन्याना सहभागी करण्यात आले असून त्यांच्या आर्थिक धोरणाला सुद्धा लक्ष्य केले आहे.

भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती पुरवली आहे. भारत सरकार ऊर्जा सुरक्षा व ग्राहकांच्या हिताला प्रथम प्राधान्य देत असून आमची ही भूमिका कायम असल्याचे त्यांनी सांगितले. कंपन्या तेल शुद्धीकरण यांना चालना देण्यासाठी काम करत आहेत. खनिज तेल मिळवण्यासाठी तेल शुद्धीकरण कंपन्यांना सरकारने व्यवहार्य स्रोतांकडून तेल विकत घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जर नोव्हेंबरमध्ये रशियन तेलावर निर्बंध लावले तर रशियन तेलात घट होईल. ज्याने पश्चिम आफ्रिका, सौदी अरेबिया, लॅटिन अमेरिकासह इराक, यूएई या देशांतून तेल आयात मोठ्या प्रमाणात वाढेल. भारताने अमेरिकेकडून मागच्या महिन्यात तब्बल तिप्पट खनिज तेलाची आयात केली होती ज्याने अमेरिकेचा आकडा ५,६८,००० बीपीडीवर गेला होता.

हेही वाचा : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ! Experian कडून ‘ग्रामीण स्कोअर’चे अनावरण; कर्ज उपलब्धता होणार झटपट

Web Title: Donald trumps new decision new sanctions will be imposed on russian oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • America

संबंधित बातम्या

Arunachal Pradesh : ‘ही’ India-China संबंधात फूट पडण्याचा चाल; पेंटागॉनच्या अहवालामुळे ड्रॅगन चवताळला
1

Arunachal Pradesh : ‘ही’ India-China संबंधात फूट पडण्याचा चाल; पेंटागॉनच्या अहवालामुळे ड्रॅगन चवताळला

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका
2

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो
3

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो

Donald Trump यांचा ‘किल लिस्ट’ प्लॅन? जगातील 3 शक्तिशाली राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या कटाने जागतिक राजकारणात भूकंप
4

Donald Trump यांचा ‘किल लिस्ट’ प्लॅन? जगातील 3 शक्तिशाली राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या कटाने जागतिक राजकारणात भूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.