Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kandla Port: बंदर पायाभूत सुविधांना नवी चालना; डीपीए कंडला येथे एस्सार पोर्ट्स उभारणार मेगा टर्मिनल

Kandla Port: डीपीए कंडला येथे नवीन मेगा टर्मिनल उभारण्यात येणार असून, एस्सार पोर्ट्स या प्रकल्पाचा विकास ६१ रुपये प्रति टन रॉयल्टीच्या दराने करणार आहे. या प्रकल्पामुळे बंदराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला आणि मालवाहतूक क्षमतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 22, 2026 | 05:35 PM
बंदर पायाभूत सुविधांना नवी चालना; डीपीए कंडला येथे एस्सार पोर्ट्स उभारणार मेगा टर्मिनल

बंदर पायाभूत सुविधांना नवी चालना; डीपीए कंडला येथे एस्सार पोर्ट्स उभारणार मेगा टर्मिनल

Follow Us
Follow Us:
  • कंडला बंदराच्या विकासाला गती!
  • डीपीए कंडला येथे उभारणार नवीन मेगा टर्मिनल
  • एस्सार पोर्ट्स ६१ रुपये प्रति टन रॉयल्टीवर विकसित करणार
Kandla Port : भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर कंडला येथे स्थित प्रमुख मेगा पोर्ट दीनदयाल पोर्ट अथॉरिटीने (डीपीए) टूना टेकरा (गुजरात) येथे अत्याधुनिक ग्रीनफिल्ड मल्टी-पर्पज कार्गो टर्मिनल विकसित करण्यासाठी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी एस्सार पोर्ट्स लिमिटेडला औपचारिकरीत्या लेटर ऑफ अवॉर्ड प्रदान केले आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत ३० वर्षांच्या कंसेशन कालावधीसाठी बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. जागतिक स्पर्धात्मक बिडिंग प्रक्रियेदरम्यान एस्सार पोर्ट्स लिमिटेडने डीपीएला प्रति टन ६१ रुपये रॉयल्टी देण्याची सर्वाधिक बोली लावून हे कंत्राट पटकावले आहे. हे टर्मिनल टूना टेकरा येथे डीपी वर्ल्डद्वारे पीपीपी मॉडेलअंतर्गत विकसित केल्या जात असलेल्या डीपीएच्या मेगा कंटेनर टर्मिनलच्या पूर्वेला उभारले जाणार आहे. (Kandla Port)

Amazon Great Indian: अमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमध्ये लहान व्यवसायांची मोठी झेप; विक्रीत ३.५ पट वाढ

भारताच्या सागरी पायाभूत सुविधा मजबूत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’च्या व्हिजनला आणि पोर्ट-आधारित आर्थिक विकासाला पुढे नेण्याच्या अनुषंगाने हा प्रकल्प भारताच्या सागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यासाठी आणि आयात-निर्यात व्यापाराला गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या विशेष प्रसंगी डीपीएचे चेअरमन सुशील कुमार सिंह (आयआरएसएमई) यांनी एस्सार पोर्ट्सचे ऑपरेटिंग पार्टनर-इन्फ्रास्ट्रक्चर व्हर्टिकल व्ही. श्रीनिवासन आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आशीष राजगरहिया यांना औपचारिकरीत्या लेटर ऑफ अवॉर्ड सुपूर्द केले. या वेळी दीनदयाल पोर्ट अथॉरिटी आणि एस्सार पोर्ट्स लिमिटेडचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कंसेशनायरकडून १,५५२.५७ कोटी रुपये

या प्रस्तावित मेगा ग्रीनफिल्ड टर्मिनलची वार्षिक कार्गो हँडलिंग क्षमता १८.३३ मिलियन टन निश्चित करण्यात आली असून प्रकल्पाचा अंदाजित खर्च २,२७६.०६ कोटी रुपये आहे. यामध्ये कंसेशनायरकडून (एस्सार पोर्ट्स) १,५५२.५७ कोटी रुपये आणि डीपीएकडून ७२३.४९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. डीपीएकडून सर्वसाधारण वापरासाठी ॲक्सेस चॅनल, बर्थ पॉकेट्स व टर्निंग सर्कल्सचे ड्रेजिंग आणि एप्रोच रोड यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या टर्मिनलमध्ये प्रत्येकी ३०० मीटर लांबीचे चार बर्थ (एकूण लांबी १,२०० मीटर) बांधले जाणार असून त्यात १,७०,००० डीडब्ल्यूटी पर्यंतच्या कॅप-साइज जहाजांचे हँडलिंग करता येईल आणि १८ मीटरपर्यंतच्या खोल ड्राफ्टची सुविधा असेल. या टर्मिनलचे व्यावसायिक कामकाज २०३१ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

टर्मिनलचा विकास आणि संचालन भारत सरकारच्या ‘ग्रीन पोर्ट पॉलिसी’नुसार व लागू पर्यावरणीय नियमांचे पालन करून केले जाईल, ज्यामध्ये बांधकाम आणि संचालनात शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर समाविष्ट आहे. या आधुनिक प्रकल्पामुळे डीपीएच्या सध्याच्या ड्राय कार्गो बर्थवरील अतिभार (सध्या ९०% पेक्षा जास्त वापर) कमी होऊन तो ७०% या आदर्श पातळीवर येईल. याशिवाय मोठ्या जहाजांच्या वापरामुळे मालवाहतूक आणि इंधनाचा खर्च कमी होऊन भारतीय निर्यातीची स्पर्धात्मकता वाढेल. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार असून कच्छ व संपूर्ण गुजरात क्षेत्रात लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग आणि संबंधित सेवा क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RBI Repo Rate: गृहकर्जाचा अदृश्य फटका! व्याजदरवाढीमुळे खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवीन मेगा टर्मिनल कुठे उभारण्यात येणार आहे?

    Ans: नवीन मेगा टर्मिनल डीपीए कंडला येथे उभारण्यात येणार आहे.

  • Que: मेगा टर्मिनलचा विकास कोण करणार आहे?

    Ans: एस्सार पोर्ट्स या प्रकल्पाचा विकास करणार आहे.

  • Que: या प्रकल्पासाठी किती रॉयल्टी निश्चित करण्यात आली आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी ६१ रुपये प्रति टन रॉयल्टीचा दर नमूद करण्यात आला आहे.

Web Title: Dpa kandla new mega terminal essar ports royalty sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • busniess news
  • india
  • Infrastructure

संबंधित बातम्या

Amazon Great Indian: अमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमध्ये लहान व्यवसायांची मोठी झेप; विक्रीत ३.५ पट वाढ
1

Amazon Great Indian: अमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमध्ये लहान व्यवसायांची मोठी झेप; विक्रीत ३.५ पट वाढ

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही
2

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही

India Diesel Demand : देशात नक्की घडतंय काय? डिझेलच्या मागणीत अचानक वाढ! 15 दिवसांत तब्बल 36.5 लाख टन इंधनाचा वापर
3

India Diesel Demand : देशात नक्की घडतंय काय? डिझेलच्या मागणीत अचानक वाढ! 15 दिवसांत तब्बल 36.5 लाख टन इंधनाचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.