Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही

PMRDA TP Scheme: पीएमआरडीएच्या वतीने विकसित केल्या जाणाऱ्या ६५ मीटर रुंदीच्या 'इनर रिंग रोड' आणि त्याअंतर्गत येणाऱ्या नगररचना योजनांबाबत मावळ तालुक्यातील बाधित गावांमधील शेतकरी, सरपंच आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक आकुर्डी येथील मुख्यालयात पार पडली.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 21, 2026 | 03:48 PM
Maval News, Pune News, Infrastructure, Inner Ring Road

Maval News, Pune News, Infrastructure, Inner Ring Road

Follow Us
Follow Us:
  • प्रस्तावित नगररचना योजनेला शेतकऱ्यांचा विरोध
  • आकुर्डी मुख्यालयात मावळ तालुक्यातील ६ गावांतील शेतकरी व लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक
  • ५० टक्के खातेदार शेतकऱ्यांचा विरोध असल्यास योजना रद्द करणार- अभिजीत चौधरी
 

PMRDA Inner Ring Road Maval TP Scheme: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) प्रस्तावित नगररचना योजनांना (टीपी स्कीम) ग्रामपंचायतींचे ठराव आणि किमान ५० टक्के खातेदार शेतकऱ्यांचा विरोध असल्यास, त्या योजना रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही योजना जबरदस्तीने लादली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

मावळच्या ६ गावांतील शेतकऱ्यांची ‘टीपी स्कीम’ रद्द करण्याची मागणी

पीएमआरडीएच्या वतीने विकसित केल्या जाणाऱ्या ६५ मीटर रुंदीच्या ‘इनर रिंग रोड’ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या नगररचना योजनांबाबत मावळ तालुक्यातील बाधित गावांमधील शेतकरी, सरपंच आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक आकुर्डी येथील मुख्यालयात पार पडली. यावेळी साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, परंदवाडी, धामणे आणि सांगवडे या सहा गावांतील प्रतिनिधींनी टीपी स्कीम रद्द करण्याची एकमुखी मागणी लावून धरली.

Delhi High Court Remarks On CJP: सौरव-आशुतोष यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे कायदेशीर प्रश्न; नेमकं घडलं काय?

या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा देताना डॉ. चौधरी म्हणाले, “संबंधित गावांतील खातेदारांनी स्वाक्षरीयुक्त अर्ज प्राधिकरणाकडे सादर केल्यास, नियमानुसार टीपी स्कीम रद्द करण्याची कायदेशीर कार्यवाही तत्काळ केली जाईल.”

रोख मोबदला आणि ६५ मीटरचाच सुधारित झोन दाखला

रिंग रोडच्या भूसंपादनाबाबत माहिती देताना आयुक्तांनी स्पष्ट केले की, प्रादेशिक आराखड्यानुसार (आरपी) अलाइनमेंट अंतिम करण्यात आली आहे. मूळ ११० मीटर रुंदीच्या मर्यादेतच ६५ मीटरचा रस्ता बसवण्यात आल्याने अतिरिक्त भूसंपादन टळले आहे. संपादित जमिनींचे योग्य मूल्यांकन करून शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला रोख स्वरूपात दिला जाईल; तसेच स्वेच्छेने संमती देणाऱ्या खातेदारांना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळेल.

 

याशिवाय, पीएमआरडीएचा ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ अंतिम झाल्यानंतर सध्या झोन दाखल्यांवर असलेला ११० मीटरचा जुना उल्लेख वगळला जाईल आणि ६५ मीटर रुंदीचे सुधारित झोन दाखले शेतकऱ्यांना दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले. रिंग रोडमुळे लगतच्या परिसराचा जलद विकास होणार असल्याने नव्या आराखड्यात स्थानिक नागरी सुविधांना प्राधान्य दिले जाईल.

Super Mayor Kalyan Dombivli: पत्नी महापौर कारभार पतीच्या हाती..; कल्याण-डोंबिवली आणि

या बैठकीस सहआयुक्त पूनम मेहता, उपायुक्त हिंमत खराडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी यांच्यासह महसूल व भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीएमआरडीए आयुक्तांनी टीपी स्कीम रद्द करण्याबाबत कोणती अट ठेवली आहे?

    Ans:   किमान ५० टक्के किंवा त्याहून अधिक खातेदार शेतकऱ्यांचे स्वाक्षरीयुक्त विर   टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल.

  • Que: ही बैठक कोणत्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती?

    Ans: ही बैठक कोणत्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती?

Web Title: Pune pmrda commissioner abhijit chaudhari assures tp scheme cancellation maval farmers as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Infrastructure
  • maval news
  • pune news

संबंधित बातम्या

बुद्धिबळाच्या पटावर महाराष्ट्राची चमक; सिद्धांत साळुंखेने पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद
1

बुद्धिबळाच्या पटावर महाराष्ट्राची चमक; सिद्धांत साळुंखेने पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्! माजी क्रिकेटपटू केदार जाधव RSS च्या पथसंचलनात सहभागी, फोटो Viral
2

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्! माजी क्रिकेटपटू केदार जाधव RSS च्या पथसंचलनात सहभागी, फोटो Viral

रील्सच्या वाटेने Tourism चे सीमोल्लंघन! इन्स्टाग्राम ‘रील्स’ ठरताहेत पुणेकरांच्या भटकंतीचा नवा पर्याय
3

रील्सच्या वाटेने Tourism चे सीमोल्लंघन! इन्स्टाग्राम ‘रील्स’ ठरताहेत पुणेकरांच्या भटकंतीचा नवा पर्याय

Purandar Airport News update: पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमीन आता सक्तीने भूसंपादन; पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
4

Purandar Airport News update: पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमीन आता सक्तीने भूसंपादन; पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.