Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dry Fruits: थंडीने सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम; ड्राय फ्रूटसच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ

दरवर्षी थंडीच्या दिवसात खोबरे आणि डिंकाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. थंडीत खोबरे, डिंक, मेथी आदींपासून तयार केलेल्या लाडूंना मागणी जास्त असते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 28, 2024 | 06:18 AM
Dry Fruits: थंडीने सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम; ड्राय फ्रूटसच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ

Dry Fruits: थंडीने सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम; ड्राय फ्रूटसच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: मागील दोन वर्ष सातत्याने सुकामेव्याचे दर कमी होते. परंतु, यंदा ग्राहकांना काही प्रमाणात सुकामेवा महाग खरेदी करावा लागत आहे. सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे. परंतु, यंदा थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत. राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे.

यंदा जगभरात बहुतांशी सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बाजारात बदाम, खोबरे, जर्दाळू, अक्रोड, मनुका, पिस्ता, काजू, डिंक, खोबरे, जर्दाळूच्या मागणीत वाढ झाली आहे. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. यामुळे शरीराची कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषकतत्त्व शरीराला उपयोगी पडतात. त्यामुळे थंडीच्या काळात सुकामेव्याला मागणी वाढते, असे मार्केट यार्डातील व्यापारी विनोद गोयल यांनी सांगितले.

दरवर्षी थंडीच्या दिवसात खोबरे आणि डिंकाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. थंडीत खोबरे, डिंक, मेथी आदींपासून तयार केलेल्या लाडूंना मागणी जास्त असते. हे पदार्थ बनविण्यासाठी ड्रायफ्रूट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ते, खारीक, खोबरे आदींना मागणी आहे.

यंदा जगभरात सततच्या वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट झाली आहे. मार्चमध्ये नवीन पीक आल्यानंतर दरात घट होईल. इराण युद्धामुळे खजूर, काळा मनुका, अंजीर, केसर, शहाजिरे दरात वाढ झाली आहे. दरात अंदाजे १५-२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

– नवीन गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड

हेही वाचा: हिवाळ्यामध्ये कुटुंबाला ठेवा निरोगी; ‘हे’ ५ स्वस्त ड्राय फ्रूट्स खाणे फायदेशीर ठरेल

आवक

खोबरे : तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक
काजू : गोवा, कर्नाटक,
कोकण, केरळ
मनुका : सांगली, विजापूर, नाशिक, पंढरपूर

विविध देशांतून आयात
खारा पिस्ता – इराण, अमेरिका, कॅलेफॉर्निया
बदाम – कॅलेफॉर्निया, ऑस्ट्रेलिया
पिस्ता – इराण, इराक
मॉमेरोन बदाम – इराण
अंजीर – इराण, अफगाणिस्तान
बेदाणा – अफगाणिस्तान, भारत
अक्रोड – अमेरिका, चिली, भारताच्या काही भागांतून

हेही वाचा: या ५ सोप्या पद्धतींनी ठेवा ड्रायफ्रुट्स वर्षानुवर्षे ताजे, जाणून घ्या या ५ सोप्या पद्धती

सुकामेव्याचे प्रतिकिलोचे भाव

सुकामेवा डिसेंबर २०२३ डिसेंबर २०२४
काजू ५५० ते ८५० ८०० ते १२००
अक्रोड बी ८०० ते १२०० १००० ते १५००
अक्रोड (अखा) ४५० ते ६०० ६०० ते ८००
बदाम ५०० ते ८०० ५०० ते ८००
अंजीर ७०० ते १००० १००० ते १५००
काळे मनुका ३०० ते ४०० ५०० ते ६००
बेदाणा (भारतीय) २०० ते ३०० २०० ते ३००
खारा पिस्ता ७०० ते १००० १००० ते १५००
जर्दाळू २०० ते ४०० ३०० ते ५००

Web Title: Dru fruits rate increase because of winter season pune market marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…
1

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं
2

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार
3

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद
4

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.