Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी पुण्यात NDPS कायद्यांतर्गत विशेष न्यायालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुण्यात सुमारे 1,425 NDPS प्रकरणे प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 07, 2026 | 06:32 PM
अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Follow Us
Follow Us:
  • अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी
  • पुणे येथे विशेष न्यायालयाची स्थापना
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुंबई: राज्यातील अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि अशा प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी विशेष नामनिर्देशित न्यायालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन ६ ऑगस्ट २०२६ रोजी नार्कोटिक ड्रग्स अँड सायको ट्रॉपिक सब स्टान्सेस ॲक्ट अंतर्गत पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री असताना पुढाकार घेतला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे सादर करण्याचे तसेच या प्रस्तावाचा वैयक्तिक स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते. अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी महाराष्ट्रात विशेष नामनिर्देशित न्यायालय स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री  फडणवीस यांनी निर्देश दिले होते.

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

या महत्त्वाच्या विषयावर कार्यवाहीला गती देण्यासाठी विशेष न्यायालयाच्या स्थापनेसंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, तो केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सादर करावा आणि प्रस्ताव मंजुरीसाठी आवश्यक तो पाठपुरावा वैयक्तिक स्तरावर सुनिश्चित करावा, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले.

विशेष न्यायालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रशासकीय, कायदेशीर आणि संस्थात्मक बाबींचा सविस्तर समावेश प्रकल्प अहवालात अपेक्षित आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाशी समन्वय साधून प्रस्तावाला पुढे नेत या विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.

अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची प्रकरणे संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची असतात. अशा प्रकरणांची सुनावणी प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने झाल्यास न्यायप्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यास मदत होईल. प्रस्तावित विशेष न्यायालयामुळे प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करणे, पुरावे आणि साक्षीदारांशी संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे तसेच दोषींविरुद्ध प्रभावी न्यायालयीन कार्यवाही करणे सुलभ होणार आहे.

युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून सुरक्षित ठेवणे, अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला प्रतिबंध करणे आणि अशा गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध जलद व प्रभावी कारवाई सुनिश्चित करणे, या व्यापक उद्देशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. विशेष न्यायालयाच्या स्थापनेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश हे त्याच प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे.

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट

विशेष न्यायालयाची स्थापना झाल्यामुळे अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांविरोधातील राज्याच्या लढ्याला अधिक बळ मिळणार आहे. तसेच तपास यंत्रणा, अभियोजन यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होऊन नागरिकांना वेगवान न्याय मिळण्यास मदत होईल. राज्यातील अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Web Title: Pune special ndps court for speedy trial of drug related cases devendra fadnavis initiative sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • crime
  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
1

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
2

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
3

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Poonam Estate Navratri: बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी
4

Poonam Estate Navratri: बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.