Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रधानमंत्री अंबानी…!’ Elon Musk चा Mukesh Ambani यांच्यावर हल्लाबोल! एका पोस्टने उद्योग जगतात खळबळ

Elon Musk Attacks Mukesh Ambani : जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी भारताचे ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर अत्यंत धारदार शब्दांत निशाणा साधला आहे. एका पोस्टवर मस्क यांनी मुकेश अंबानी यांचा उल्लेख प्रधानमंत्री अंबानी असा करत मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 10, 2026 | 11:54 AM
Elon Musk चा Mukesh Ambani यांच्यावर हल्लाबोल! ( सौजन्य - Chatgpt )

Elon Musk चा Mukesh Ambani यांच्यावर हल्लाबोल! ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • Elon Musk चा Mukesh Ambani यांच्यावर हल्लाबोल!
  • एका पोस्टने उद्योग जगतात खळबळ
  • ‘प्रधानमंत्री अंबानी…!’ X पोस्टमध्ये काय म्हणाले?
Elon Musk Attacks Mukesh Ambani : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क आणि भारतातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यातील वाद आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकत्याच X वरील पोस्टने हा वाद आणखी चिघळतो की काय असा प्रश्न उभा राहिला आहे. एलॉन मस्क ने X वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी थेट अंबानींना पंतप्रधान अंबानी म्हणून संबोधत थेट टिका केली आहे. या टिकेचा देशातील राजकीय दृष्ट्याच नाही तर जागतिक दृष्ट्यादेखील बराच मोठा अर्थ होतो. मस्क यांचं हे विधान त्यांच्या स्टारलिंक कंपनीची सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतात सुरू होण्यास होणाऱ्या विलंबावरून आले आहे. नेमकं सगळं काय प्रकरण आहे? ( Elon Musk Attacks Mukesh Ambani ) 

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4-4 हजार रुपये; PM Kisan योजनेच्या हप्त्यापूर्वी मोठी बातमी! असे तपासा ताजे अपडेट 

एलॉन मस्कने थेट आरोप करत भारतातील मक्तेदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यांनी अंबानींवर थेट निशाणा साधत त्यांना आपली मक्तेदारी कायम ठेवायची आहे आणि त्यात त्यांच्या स्टारलिंकला भारतात स्पर्धा करण्याची संधी मिळत नाहीये असा थेट आरोप केला आहे.

मस्क यांनी X पोस्टवर काय लिहिलं?

एलॉन मस्कने त्यांच्या X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, “प्रिय पंतप्रधान अंबानी.” त्यानंतर त्यांनी उपहासाने म्हटले की, भारतातील खरी सत्ता अंबानींच्याच हातात आहे, हे समजायला थोडा उशीर झाला आहे. मस्क यांनी पुढे लिहिले की, अंबानींना साहजिकच आपली मक्तेदारी टिकवून ठेवायची असेल, पण ते स्टारलिंकला भारतात स्पर्धा करू देतील का?

Dear Prime Minister Ambani, Please accept my humble apologies for not realizing that you are the real boss of India. Naturally, you would prefer to maintain your monopolistic exploitation of the great people of India, but would you nonetheless consider allowing Starlink to compete? There are many areas of India, as there are in all countries, with no Internet access, which denies children the opportunity for education and for small businesses the opportunity to sell their goods to a global market. Starlink would change their lives for the better. Thank you 🙏 — Elon Musk (@elonmusk) October 9, 2026

मस्कची अंबानींवर थेट नाराजी

हा संपूर्ण वाद स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला झालेल्या विलंबामुळे निर्माण झाला आहे. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची सॅटेलाइट इंटरनेट सेवा, स्टारलिंक, भारतात आपला व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत बऱ्याच काळापासून आहे. कंपनीला आवश्यक परवाने मिळाले आहेत, परंतु व्यावसायिकरित्या सेवा सुरू करण्यापूर्वी आणखी काही मंजुऱ्या मिळणे बाकी आहे. त्यासाठी कंपनीकडून प्रयत्नही सुरु आहेत. पण काही कारणात्सव ही कामं अडकून राहत आहेत.

मस्क यांच्या मते, स्टारलिंक १६५ हून अधिक देशांमध्ये परवान्यांसह कार्यरत आहे आणि भारतातील नियमांचे पालन करण्यासाठी जवळपास पाच वर्षे प्रयत्न करत आहे. असे असूनही, सेवा सुरू करण्याची परवानगी मिळण्यास होणारा विलंब ही एक मोठी समस्या आहे. मस्क यांनी यापूर्वी आरोप केला आहे की, काही मोठे व्यावसायिक गट बाजारातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशात अडथळा आणत आहेत. पण, त्यांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ अद्याप कोणताही सार्वजनिक पुरावा सादर केलेला नाही.

स्टारलिंकची स्पर्धा कोणाशी असेल?

मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ हे भारतीय दूरसंचार बाजारातील एक मोठे नाव आहे. जिओची सॅटेलाइट इंटरनेट कंपनी, जिओसॅटकॉम, देखील या क्षेत्रात कार्यरत होण्याची तयारी करत आहे. अशा परिस्थितीत, स्टारलिंकच्या प्रवेशामुळे सॅटेलाइट इंटरनेट बाजारात स्पर्धा वाढू शकते. शिवाय, भारती ग्रुप-समर्थित युटेलसॅट वनवेब देखील याच क्षेत्रात आहे. याचा अर्थ असा की, केवळ स्टारलिंकच नाही, तर इतर कंपन्यादेखील भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी करत आहेत. मस्क यांचा विश्वास आहे की, ज्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी कमकुवत किंवा उपलब्ध नाही, तिथे इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी स्टारलिंकची सेवा मदत करू शकते. यामुळे दुर्गम भागातील मुलांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास आणि लहान व्यवसायांना त्यांची उत्पादने मोठ्या बाजारपेठांमध्ये विकण्यास मदत होऊ शकते.

या आरोपांवर सरकारकडून काय स्पष्टीकरण?

मस्क यांच्या आरोपांनंतर, भारत सरकारने स्पष्ट केले की देशात कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला प्रोत्साहन दिले जात नाही. केंद्रीय दळण-वळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, तीन कंपन्यांना सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी परवाने मिळाले आहेत. यामध्ये स्टारलिंक, जिओसॅटकॉम आणि युटेलसॅट वनवेब यांचा समावेश आहे. पण परवाने मिळाल्याचा अर्थ असा नाही की कंपन्या लगेच ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात करू शकतात. कंपन्यांना व्यावसायिक कामकाजासाठी सुरक्षाविषयक आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील. शिवाय, स्पेक्ट्रम वाटप आणि संबंधित व्यवस्था अद्याप प्रलंबित आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, तिन्ही परवानाधारकांबाबत सुरक्षा-संबंधित तपास सुरू आहे. त्यामुळे, सरकारने स्टारलिंकला हेतुपुरस्सर लक्ष्य केल्याचे किंवा त्यांच्यासोबत भेदभाव केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Amazon Great Indian Festival 2026 चा धमाका! दर मिनिटाला विकले गेले शेकडो आयफोन अन् कुर्ते; पाहा खरेदीचे भन्नाट ट्रेंड्स

Web Title: Elon musk attacks mukesh ambani calls him prime minister marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • businessman mukesh ambani
  • elon musk
  • prime minister

संबंधित बातम्या

Elon Musk: ‘अंबानीच आहेत का भारताचे खरे बॉस?’ स्टारलिंकवरून मस्क आणि Indian Gov. मध्ये जुंपली; सरकारच्या उत्तराकडे लक्ष
1

Elon Musk: ‘अंबानीच आहेत का भारताचे खरे बॉस?’ स्टारलिंकवरून मस्क आणि Indian Gov. मध्ये जुंपली; सरकारच्या उत्तराकडे लक्ष

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित
2

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका
3

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
4

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.