Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Embassy-Tower : अबब…! ‘या’ दिग्गज स्टॉकब्रोकर्सने 700 कोटींना विकत घेतले मुंबईतील आलिशान टॉवर, ठरला देशातील सर्वात मोठा व्यवहार

Embassy-Tower : एंजल वन या स्टॉक मार्केटमधील अॅपचे मालक दिनेश ठक्कर यांनी मुंबईतील समुद्र किनारी 711 कोटींचा एक आलीशान टॉवर खरेदी केला आहे. ठक्कर व विकासक कंपनीने मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 22, 2026 | 08:34 PM
Embassy-Tower : अबब...! 'या' दिग्गज स्टॉकब्रोकर्सने 700 कोटींना विकत घेतले मुंबईतील आलिशान टॉवर, ठरला देशातील सर्वात मोठा व्यवहार

Embassy-Tower : अबब...! 'या' दिग्गज स्टॉकब्रोकर्सने 700 कोटींना विकत घेतले मुंबईतील आलिशान टॉवर, ठरला देशातील सर्वात मोठा व्यवहार

Follow Us
Follow Us:
  • कोविडमध्ये ऑनलाईन ट्रेडिंगला चालना
  • लक्झरी घरांच्या बाजाराला तेजी
  • लक्झरी अपार्टमेंट्सना मोठी मागणी
 

भारतातील सर्वात मोठ्या रिटेल स्टॉकब्रोकर्सपैकी एक असलेल्या Angel One Ltd चे संस्थापक दिनेश ठक्कर यांनी मुंबईत तब्बल 711 कोटी ($74.3 दशलक्ष) किमतीला एक आलिशान निवासी टॉवर (Embassy-Tower) खरेदी केला आहे. हा देशातील एका स्वतंत्र निवासी घरासाठी झालेला सर्वोत मोठा व्यवहार देखील ठरला आहे.

Angel One हे सध्या स्टॉकब्रोकर्ससाठी वापरातील प्रसिद्ध अॅपपैकी एक आहे. या अॅपचे संस्थापक दिनेश ठक्कर असून त्यांनी आपल्या स्वप्नातील घरासाठी तब्बल 700 कोटींचा व्यवहार केला आहे. ठक्कर यांनी घेतलेला आलिशान टॉवरचे मुख्य द्वार समुद्राच्या दिशेने आहे. यात आठ मजले असून 63,000 चौरस फूट (5,853 चौरस मीटर) क्षेत्रफळात तो व्यापलेला आहे.
या मोठ्या व्यवहाराची माहिती टॉवरचे विकासक Embassy Developments Ltd आणि दिनेश ठक्कर यांनी मंगळवारी दिलेल्या संयुक्त निवेदनातून दिली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या माहितीनंतर Embassy Developments च्या शेअरच्या किमतीत सुरुवातीच्या व्यवहारात 8.3% पर्यंत वाढ झाली होती.

 

कोविडमध्ये ऑनलाईन ट्रेडिंगला  चालना

दिनेश ठक्कर यांचा ब्रोकिंग व्यवसाय 2020 मध्ये मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. कोविड-19 महामारीदरम्यान लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन ट्रेडिंगला मोठी चालना मिळाली होती. त्याचाच फायदा Angel One सारख्या कंपन्यांना झाला होता.

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

लक्झरी घरांच्या बाजाराला तेजी

ठक्कर यांनी केलेला व्यवहार हा भारतातील लक्झरी रिअल इस्टेट बाजारातील चढता आलेख दर्शवतो. देशातील वाढती संपत्ती आणि छोट्या शहरांमधून उदयास आलेल्या कंपन्यांच्या शेअर बाजारातील लिस्टिंगमुळे अतिश्रीमंत भारतीय नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.

गेल्या वर्षी USV Pvt Ltd च्या अध्यक्षा लीना गांधी तिवारी यांनी 639 कोटींचा अपार्टमेंट खरेदी केला होता. तसेच बँकर उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने समुद्रकिनाऱ्यालगतचा एक टॉवर 400 कोटींपेक्षा अधिक किमतीला खरेदी केला होता.

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

लक्झरी अपार्टमेंट्सना मोठी मागणी

भारतातील काही शहरांमध्ये लक्झरी अपार्टमेंट्सची विक्री काही तासांतच पूर्ण झाल्याची उदाहरणे आहेत. प्रीमियम अपार्टमेंट्सच्या किमती न्यूयॉर्कमधील काही भागांतील घरांच्या किमतींशीही स्पर्धा करू लागल्या आहेत.
Embassy Developments ने जानेवारीमध्ये मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात प्रवेश केला. कंपनीने शहरात निवासी टॉवर्स उभारण्यासाठी 4,500 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली होती.

ठक्कर यांनी ज्या आलिशान परिसरात घर खरेदी केले आहे, त्याच परिसरातील Embassy च्या एका प्रकल्पाची एकूण विकास क्षमता (Gross Development Value) 3000 कोटींपेक्षा जास्त आहे. या प्रकल्पात प्रत्येक मजल्यावर केवळ एकच निवासस्थान असून, तेथून समुद्राचे नयनरम्य दृश्य दिसते.

Web Title: Embassy tower for rs 711 crore in record home deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • Angel One
  • Luxury housing
  • real estate

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.